Crime : धक्कादायक! चित्रपटांमध्ये काम देण्याचा बहाण्याने दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार
Maharashtra News : चित्रपटांमध्ये काम देण्याचा बहाण्याने दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची धक्कादयक घटना समोर आली आहे. आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पैशांची मागणीही करण्यात आली.
Vasai Crime News : दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना वसईमधून समोर आली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटांमध्ये काम देण्याचे आमीष दाखवत दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मीरा भाईंदर वसई विरार पोलीस नियंत्रण कक्षातील एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एका वर्षापूर्वी आरोपीने दोन अल्पवयीन मुलींना वसईमधील जंगलामध्ये नेले. जंगलात दोन्ही मुलींवर बलात्कार करण्यात आला. या दोन्ही अल्पवयीन मुलींचे वय 13 वर्ष आहे. पोलिसांनी अधिक माहिती देत सांगितले की, आरोपीने मुलींचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत 70 हजार रुपयांची मागणी केल्याचं पीडित मुलींनी सांगितलं आहे.
एका आरोपीवर गुन्हा दाखल
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलींच्या आईवडीलांनी या प्रकरणी तक्रा दाखल केली. यांतर नालासोपारा पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीवर भादंवि कलम 376 (बलात्कार), 377 (अनैसर्गिक लैंगिक संबंध), 384 (पैसे उकळणे/खंडणी) आणि 506 (धमकी) आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
यापूर्वी घडलेल्या घटना
याआधीही महाराष्ट्रातील साकीनाका येथे बलात्काराची घटना समोर आली होती. त्यामुळे महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्यात पत्रांद्वारे लढाही सुरू झाला होता.
महत्वाच्या बातम्या