एक्स्प्लोर

पुण्यात FC रोड ड्रग्जपार्टी प्रकरणी 5 जण ताब्यात ; अंधारेंनी नाव घेतलेले चरणसिंग राजपूत हॉटेलमध्ये दाखल

पुण्यातील एफसी रोडवरील हॉटेल, पबमध्ये तरुण-तरुणी एन्जॉयमेंटसाठी येथे येतात, ते ड्रग्ज व अंमली पदार्थांचे सेवन करत पार्टी करतात.

पुणे : शहरात एका आमदाराच्या पुतण्याने मध्यरात्री बेदरकारपणे गाडी चालवत एका दुचाकीला उडवल्याची भीषण घटना घडली. त्यानंतर, पुन्हा एकदा पुण्यातील मध्यरात्री सुरू असलेल्या पब्ज आणि बारचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यासोबत, पुण्यात अवैधपणे विक्री होत असलेल्या ड्रग्ज आणि अंमली पदार्थांच्या (Drugs) वापरावरुनही राजकीय वॉर सुरू झाल्याचं पाहायला मिळालं. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी ड्रग्जप्रकरणावरुन गंभीर आरोप केले आहेत. उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह संबंधित एक्साईज अधिकारी कोट्यवधींचा हप्ता घेतल असल्याचा आरोप सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केला आहे. त्यावर, शंभूराज देसाई यांनीही प्रतिक्रिया दिली असून आता कारवाईला गती मिळाली आहे. पुण्याच्या (Pune) एका हॉटेलमधील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिस (Police) व उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत 5 जणांना ताब्यात घेतलं आहे. 

पुण्यातील एफसी रोडवरील हॉटेल, पबमध्ये तरुण-तरुणी एन्जॉयमेंटसाठी येथे येतात, ते ड्रग्ज व अंमली पदार्थांचे सेवन करत पार्टी करतात. पुण्यातील अशाच एका हॉटेलमधील पार्टीत ड्रग्स घेणाऱ्या तरुणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामध्ये, चक्क हॉटेलमधील वॉश रुमममध्ये टॉयलेटजवळ बसून ते ड्रग्ज घेत असल्याचे दिसून येतात. या युवकांकडील हे ड्रग्ज, मॅफेनड्रग्स असल्याचं प्राथमिक माहितीमधून समोर आलं आहे. त्यामुळे, पुण्यातील ललीत पाटील प्रकरणात आलेले ड्रग्जप्रकरण अजून शांत नसल्याचं पुन्हा स्पष्ट झालं आहे. याप्रकरणी, पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरू आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आत्तापर्यंत 5 जणांना घेतलं ताब्यात असून या 5 जणांमध्ये हॉटेलचा मालक सुद्धा ताब्यात आहे. या व्यतिरिक्त याठिकाणी असलेला एक मॅनेजर आणि एक कर्मचारी सुद्धा ताब्यात घेण्यात आला आहे. दरम्यान, या हॉटेलचे 3 पार्टनर देखील पोलिसांच्या ताब्यात असून संतोष कामठे, रवी माहेश्वरी, मानस मलिक,  योगेंद्र आणि शर्मा असे ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.

आता, याप्रकरणावरुन राजकारण तापलं असून सुषमा अंधारे आणि आमदार रविंद्र धंगेकर आक्रमक झाले आहेत. त्यानंतर, पोलिसांनी कारवाईला वेगाने सुरुवात केली  असून ज्या हॉटेलमध्ये ही पार्टी सुरू होती, त्या हॉटेलच्या मॅनेजरसह एका कर्मचाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक संबंधित हॉटेलमध्ये दाखल झालं. त्यामध्ये, अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक विकास जाधव हेही उपस्थित होते. पोलिसांकडून संपूर्ण हॉटेलची तपासणी करण्यात आली असून ड्रग्ज प्रकरणासंदर्भात माहिती गोळा करण्यात आल्याची माहिती आहे. 

संयुक्त कारवाईला सुरुवात 

सुषमा अंधारे यांनी ज्यांच्यावर बार मालकांकडून हफ्ते घेत असल्याचा आरोप केला, ते एक्साईज विभागाचे अधिकारी चरण सिंग राजपूत यांनीही पुण्यातील त्या हॉटेलला भेट दिली. आता, एक्साईज विभागाकडून देखील कारवाईला सुरुवात झाली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पोलीस सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर घटनास्थळी दाखल असून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.  पुणे पोलीस आणि गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाकडून या संपूर्ण पार्टीचे विश्लेषण सुरू आहे. दरम्यान, पार्टी झालेल्या लिक्विड लीजर लाउंज या हॉटेलमधील सीसीटीव्हीचे डीव्हीआर पुणे पोलिसांनी केले जप्त

पुणे पोलीस आयुक्त पत्रकार परिषद घेणार

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची माहिती गोळा केल्यानंतर मी एक पत्रकार परिषद घेईन आणि त्याच्यामध्ये सगळ्या विषयासंदर्भात बोलणार आहे. पुण्याच्या कायद्या आणि सुव्यवस्था प्रश्न बाबत सातत्याने तक्रारी येत आहेत याबाबत देखील या पत्रकार परिषदेत बोललं जाईल

ड्रग्ज प्रकरणावरुन अंधारे-देसाईंमध्ये जुंपली

तब्बल आठ ते नऊ महिन्यापासून पुण्यातल्या ड्रग्ज  प्रकरणावर सातत्याने भूमिका मांडतेय. त्याही वेळेला जेव्हा कोट्यवधींचे ड्रग्जचे साठे आढळायला  लागले, तेव्हाही आम्ही शंभुराजे देसाई आणि गृहमंत्र्यांना प्रश्न विचारले. पण शंभूराज देसाई आरेरावीने बोलतात, त्यांना मला खास प्रश्न विचारायचाय,  हप्ता भरपूर मिळाला की आम्ही तरुणांच्या जीवनशी सुद्धा त्यांना खेळायचे. या सगळ्या प्रकरणांमध्ये शंभूराजे यांनी तात्काळ आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे. त्याशिवाय शंभूराजे देसाई यांच्यासाठी फक्त काम करणारे राजपूत यांचं निलंबन झालं पाहिजे. या दोन गोष्टी झाल्याशिवाय पुणे सुधारू शकत नाही. महाराष्ट्रातील ड्रग्जचा विळखा त्याशिवाय नष्ट होऊ शकत नाही. त्यामुळे माझी मागणी आहे की शंभूराजेंनी राजीनामा द्यावा आणि एक्साइस अधिकारी राजपूत यांचं निलंबन व्हावं, असे सुषमा अंधारे यांनी म्हटलं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Karanja Assembly Election : भाजप हॅट्रिक करणार की काँग्रेस बाजी मारणार? कारंजा मतदारसंघामध्ये बहुरंगी लढत
भाजप हॅट्रिक करणार की काँग्रेस बाजी मारणार? कारंजा मतदारसंघामध्ये बहुरंगी लढत
Uddhav Thackeray : पूर्वी भाव गद्दारांना होता, होय मी रस्त्यानेच आलो, कोकण दरोडेखोरांच्या हातात द्यायचं का? राणेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंचा कडक 'प्रहार'!
पूर्वी भाव गद्दारांना होता, होय मी रस्त्यानेच आलो, कोकण दरोडेखोरांच्या हातात द्यायचं का? राणेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंचा कडक 'प्रहार'!
...तर मला भरचौकात फाशी द्या, अजित पवारांच्या उमेदवाराचं भावनिक वक्तव्य; आंदोलनात घर जाळल्याचंही सांगितलं
...तर मला भरचौकात फाशी द्या, अजित पवारांच्या उमेदवाराचं भावनिक वक्तव्य; आंदोलनात घर जाळल्याचंही सांगितलं
NCP Crisis: घड्याळ चिन्हाच्या लढाईत अजित पवारांना मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाने शरद पवार गटाची 'ती' मागणी फेटाळली
निवडणुकीच्या तोंडावर अजितदादांना मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाने शरद पवार गटाची 'ती' मागणी फेटाळली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saleel Deshmukh :  हा रडीचा डाव; षडयंत्र रचणारा कोण आहे ? हे जनतेला माहित आहे - देशमुखDevendra Fadnavis on Chandiwal : मविआ काळातील भ्रष्टाचाराचे मोठे पुरावे समोर आले - फडणवीसTop 25 : टॉप 25 न्यूज : 2 PM :13 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaDilip Walse Patil : पवारांची तोफ आंबेगावमध्ये धडाडणार,मानसपुत्र दिलीप वळसे म्हणतात...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karanja Assembly Election : भाजप हॅट्रिक करणार की काँग्रेस बाजी मारणार? कारंजा मतदारसंघामध्ये बहुरंगी लढत
भाजप हॅट्रिक करणार की काँग्रेस बाजी मारणार? कारंजा मतदारसंघामध्ये बहुरंगी लढत
Uddhav Thackeray : पूर्वी भाव गद्दारांना होता, होय मी रस्त्यानेच आलो, कोकण दरोडेखोरांच्या हातात द्यायचं का? राणेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंचा कडक 'प्रहार'!
पूर्वी भाव गद्दारांना होता, होय मी रस्त्यानेच आलो, कोकण दरोडेखोरांच्या हातात द्यायचं का? राणेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंचा कडक 'प्रहार'!
...तर मला भरचौकात फाशी द्या, अजित पवारांच्या उमेदवाराचं भावनिक वक्तव्य; आंदोलनात घर जाळल्याचंही सांगितलं
...तर मला भरचौकात फाशी द्या, अजित पवारांच्या उमेदवाराचं भावनिक वक्तव्य; आंदोलनात घर जाळल्याचंही सांगितलं
NCP Crisis: घड्याळ चिन्हाच्या लढाईत अजित पवारांना मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाने शरद पवार गटाची 'ती' मागणी फेटाळली
निवडणुकीच्या तोंडावर अजितदादांना मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाने शरद पवार गटाची 'ती' मागणी फेटाळली
Kerala IAS Officer : एक मुस्लिम अन् एक हिंदू अधिकाऱ्यांचा व्हाॅट्सअॅप ग्रुप करून अधिकारीही अॅड केले; दोन वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांची तत्काळ उचलबांगडी
एक मुस्लिम अन् एक हिंदू अधिकाऱ्यांचा व्हाॅट्सअॅप ग्रुप करून अधिकारीही अॅड केले; दोन वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांची तत्काळ उचलबांगडी
मी भाजपसोबत कंम्फर्टेबल, राज ठाकरेंनी सांगितली 'मन की बात'; महायुतीसोबत जाण्याचं राज'कारण'
मी भाजपसोबत कंम्फर्टेबल, राज ठाकरेंनी सांगितली 'मन की बात'; महायुतीसोबत जाण्याचं राज'कारण'
Supreme Court on Bulldozer Action : घर पाडता, तर तो शेवटचा पर्याय होता हे सिद्ध करा, अधिकारी न्यायाधीश होऊ शकत नाही; सुसाट झालेल्या 'बुलडोझर' कारवाईवर सर्वोच्च 'बुलडोझर'!
घर पाडता, तर तो शेवटचा पर्याय होता हे सिद्ध करा, अधिकारी न्यायाधीश होऊ शकत नाही; सुसाट झालेल्या 'बुलडोझर' कारवाईवर सर्वोच्च 'बुलडोझर'!
महाराष्ट्र कोणाच्या बापाचा आहे का? माझं नाव घेतलं की हिंदू मुस्लीम करता येतं, मनोज जरांगे पाटलांचं नाव घ्या; ओवेसींचा फडणवीसांवर जोरदार पलटवार
महाराष्ट्र कोणाच्या बापाचा आहे का? माझं नाव घेतलं की हिंदू मुस्लीम करता येतं, मनोज जरांगे पाटलांचं नाव घ्या; ओवेसींचा फडणवीसांवर जोरदार पलटवार
Embed widget