आईने मोबाईल घेतल्याने मुलीनं उचललं टोकाचं पाऊल; दुसऱ्या घटनेत 11 वर्षीय मुलाने संपवलं जीवन
डोंबिवलीतील मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या हेमांगी झोरे ह्या त्यांची मुलगी आणि मुलासोबत राहतात.
ठाणे : अलिकडील काळात मोबाईलचा वापर हा गरजेचा बनलाय, मात्र तरुण पिढीकडून या मोबाईलचा दुरुपयोग होत असल्याच्याही तक्रारी पालकांकडून होत आहेत. सोशल मीडियावर तरुणाई आणि मोबाईल हा विषय नेहमीच चर्चेत असतो. त्यातच, मोबाईलवर विविध अॅपच्या माध्यमातून तरुणाई या सोशल जाळ्यात अडकत असल्याचे चित्र आहे. अनेकदा प्रेमसंबंधाचे कारणही मोबाईल ठरत आहेत. त्यातच, आता ठाणे जिल्ह्यातील प्रेमसंबंधातून (Lovestory) दोघा तरुणाईने आपलं जीवन संपवलं आहे. कल्याण डोंबिवलीत दोन वेगवेगळ्या घटना घडल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. कल्याणमध्ये एका 19 वर्षीय तरुणीला आईने मोबाईल वापरण्यास नकार दिल्यामुळे त्या तरुणीने आत्महत्या केली, तर कल्याणमध्ये (Kalyan) एका 11 वर्षीय मुलाला भेटण्याकरीता त्याची अल्पवयीन मैत्रीण घरात आली असता तिच्या आई-वडिलांनी मुलीची चौकशी करुन तिला तिच्या घरी सोडले. मात्र, आई-वडिल मुलीला तिच्या घरी सोडायला जाताच, इकडे मुलाने मुलाने घरातच आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलीस (Police) तपास सुरू आहे.
कल्याणमध्ये एका 11 वर्षीय मुलाच्या घरी भेटण्यासाठी 13 वर्षाची मैत्रीण आली होती. मात्र, त्या मैत्रीणीला तिच्या घरी सोडण्यासाठी मुलाचे आई वडिल गेले असता, घरात गळफास घेऊन मुलाने आपले जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात एका 11 वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. कोळसेवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुलाला भेटण्यासाठी त्याची 13 वर्षांची मैत्रिण घरी आली होती. त्या मुलीला घरात पाहून मुलाच्या आईवडिलांनी तिची चौकशी केली. त्यानंतर मुलीला सोबत घेऊन ते तिच्या टिटवाळ्यातील घरी गेले. टिटवाळ्यातून आई-वडील घरी आल्यावर मुलानं आत्महत्या केल्याचं त्यांना दिसलं. मुलाने नक्की कोणत्या कारणामुळे जीव दिला त्याचा पोलीस तपास करत आहेत.
डोंबिवलीत मुलीने संपवले जीवन
डोंबिवलीतील मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या हेमांगी त्यांच्या मुलगी आणि मुलासोबत राहतात. त्यांच्या मुलीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मानपाडा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मुलगी एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती, तिच्या आईला असा संशय होता की, आपली कन्या ही काही मुलांसोबत चॅटिंग करते. त्यामुळे आईने तिच्याकडून मोबाईल हिसकावून घेतला. यापूर्वी आईने तिच्याकडून मोबाईल हिसकावून घेतला होता, तेव्हा मुलीने आईला आत्महत्या करणार अशी धमकी दिली होती . शुक्रवारी तिच्या आईने पुन्हा तिचा मोबाईल हिसकावून घेतला. रागाच्या भरात तिने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास मानपाडा पोलिस करीत आहेत.