धक्कादायक ! महिलेचा खून करून मृतदेह फेकला ब्लॅकेटमध्ये गुंडाळून गटारात
Crime News : भिवंडीमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 30 ते 35 वर्षीय अनोळखा महिलेचा मृतदेह ब्लॅकेटमध्ये गुंडाळूलेल्या अवस्थेत गटारात आढळून आला.
Thane Bhiwandi Latest Crime News : भिवंडीमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 30 ते 35 वर्षीय अनोळखा महिलेचा मृतदेह ब्लॅकेटमध्ये गुंडाळूलेल्या अवस्थेत गटारात आढळून आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस याप्रकरणी चौकशी करत आहे.
ही धक्कादायक घटना भिवंडी तालुक्यातील वळपाडा हद्दीतील पारसनाथ कंपाऊंड मधील एका मोठ्या गटारात उघडकीस आली आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात हत्येसह पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा नारपोली पोलीस ठाण्यात दाखल करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
भिवंडी तालुक्यातील गोदाम पट्टा समजल्या जाणाऱ्या वळपाडा हद्दीतील पारसनाथ कंपाऊंड मधील दोन इमारतीच्या गोदामामध्ये मोठे गटार आहे. या गटारीच्या बाजूला बुधवारी रात्रीच्या सुमारास गावातील एका प्लंबरला महिलेचा मृतदेह ब्लॅकेटमध्ये गुंडाळूलेल्या अवस्थेत दिसला होता. त्याने तात्काळ या घटनेची माहिती वळपाडा हद्दीतील श्रीमती सुनंदा पाटील (वय ४८) यांना दिली. माहिती मिळताच पोलीस पाटील यांनी नारपोली पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी भिवंडीतील स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात रवाना केला. तर पहाटेच्या सुमारास पोलीस पाटील श्रीमती सुनंदा पाटील यांच्या तक्रारीवरून नारपोली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात भादंवि कलम ३०२, २०१ प्रमाणे गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरु केला. या गुन्हाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेश वाघमारे करत आहेत. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
Swapna Patkar: पत्राचाळ घोटाळा प्रकरण: स्वप्ना पाटकर यांना जीवे मारण्याची धमकी; राऊतांविरोधातला जबाब मागे घेण्यासाठी दबाव
Nagpur Crime : संतापजनक! नागपुरात 11 वर्षीय चिमुरडीवर 10 नराधमांकडून दिड महिने अत्याचार
Buldhana News : 'गुड बाय...आम्ही जग सोडून जातोय,' मेसेज करत करडी धरणात विवाहितेने दोन मुलांसह उडी मारुन आयुष्य संपवलं