वांद्रे येथील माऊंट मेरी चर्चवर दहशतवादी हल्ल्याची धमकी, सुरक्षा यंत्रणा अलर्ट
Mumbai Crime News : मुंबईतील वांद्रे येथील माऊंट मेरी चर्चवर (Mount Mary Church) लष्कर-ए-तैयबा ही दहशतवादी संघटना हल्ला (Terrorist Attack) करणार असल्याची धमकी देण्यात आलीय.
Mumbai Crime News : मुंबईतील वांद्रे येथील माऊंट मेरी चर्चवर (Mount Mary Church) दहशतवादी हल्ला (Terrorist Attack) करण्याची धमकी देण्यात आलीय. एका मेलवरून ही धमकी देण्यात आली असून लष्कर-ए-तैयबा (Lashkar E Taiba) ही दहशतवादी संघटना या चर्चवर हल्ला करणार असल्याचे मेलमध्ये म्हटले आहे. terrorist@gmail.com या मेलवरून ही धमकी आली आहे. या हल्ल्यानंतर मुंबई पोलिस (Mumbai Police) यंत्रणा अलर्ट झाली आहे.
वांद्रे येथील माऊंट मेरी हा हायप्रोफाईल परिसरातील चर्च प्रसिद्ध चर्च आहे. या परिसरात कायम गर्दी असते. त्यातच धमकीचा मेल आल्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मुंबई पोलिस झोन-9 चे डीसीपी अनिल पारसकर यांनी एबीपी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, चर्चवर हल्ला करण्याची धमकी देण्यासाठी आलेल्या मेलनंतर आणखी एक मेल मिळाला. या मलमध्ये दावा करण्यात आलाय की, ज्या मेलवरून चर्चवर दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे तो मेल करणाऱ्या मुलाची मी आई आहे. चर्चवर हल्ला करणार असल्याचा मेल माझ्या मुलाने पाठवला होता.
दुसऱ्यांदा आलेल्या मेलमध्ये आपल्या मुलाची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे सांगत त्या आईने माफी मागितली आहे, अशी माहिती डीसीपी अनिल पारसकर यांनी दिली आहे. परंतु, माफी मागितली असली तरी या मेलमुळे पोलिस यंत्रणा याबाबतचा कसून तपास करत आहेत. कारण नव्या वर्षाच्या तोंडावर असे धमकीचे मेल येणे हे धोकादायक आहे. लोक नव्या वर्षाच्या स्वागताची तयारी करत आहेत. त्यामुळे मार्केटमध्ये आणि रस्त्यांवर लोकांची गर्दी आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस या धमकीच्या मेलचा कसून तपास करत आहेत.
Mumbai Crime News : अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
नव्या वर्षाच्या तोंडावरच असा धमकीचा मेल आल्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून हा मेल करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात आयपीसी कलम 505 (03) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान हा ईमेल एक प्रकारची फसवणूक असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. असे असले तीर तपासानंतरच या प्रकरणाचे पूर्ण सत्य समोर येईल, असे पोलिसांचे मत आहे.
महत्वाच्या बातम्या
Nagpur News : एमकेसीएलच्या कारभारामुळे नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना मनस्ताप: तिसरे सेमिस्टर संपले मात्र पहिल्या सेमिस्टरची गुणपत्रिका मिळेना