(Source: ECI/ABP News/ABP Majha)
यवतमाळमधील शिकाऊ डॉक्टर हत्या प्रकरण, मारेकरी अजूनही मोकाट, विद्यार्थ्यांचं दुसऱ्या दिवशीही आंदोलन
यवतमाळमध्ये बुधवारी रात्री डॉक्टर अशोक पाल या डॉक्टरची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. आरोपींना अद्याप अटक न झाल्यानं आज दुसऱ्या दिवशी शिकावू आंदोलक डॉक्टरांनी आंदोलन पुकारले आहे.
यवतमाळ : यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये बुधवारी रात्री डॉक्टर अशोक पाल या एमबीबीएसला शिकणाऱ्या डॉक्टरची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्यानंतर शिकाऊ डॉक्टर यांनी एकत्र येत इथं डॉक्टर अशोक पाल यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करा अशी मागणी केली होती. पोलिसांनी या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. तरी डॉक्टर अशोक पाल यांची कुठल्या कारणाने हत्या झाली ते नेमकं कारण अजुनही पुढं आलं नाही. मारेकऱ्यांना 24 तासात अटक करू असे पोलिस अधीक्षक यांनी काल म्हटले होते मात्र अजूनही 24 तास झाल्यानंतरही अजूनही मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली नाही. त्यामुळे आज दुसऱ्या दिवशीही शिकावू आंदोलक डॉक्टर यांनी आंदोलन पुकारले आहे. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रमुख गेटच्या समोर धरणे आंदोलन पुकारले आहे.
अशोक पाल यांना मरणोत्तर डॉक्टर पदवी देण्यात यावी
मृतक डॉक्टर अशोक पाल यांना मरणोत्तर डॉक्टर पदवी देण्यात यावी, तसेच त्याच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात यावी. शिवाय वैद्यकीय महाविद्यालयातील सुरक्षा यंत्रणा सुसज्ज करावी नीटनेटके करावी अशीही मागणी आंदोलन डॉक्टर यांनी केली आहे. त्याच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
जिल्हाप्रमुखांच्या वर्तनाबद्दल संजय राठोड यांची दिलगिरी
यवतमाळचे माजी पालकमंत्री आणि शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांनी आंदोलनकर्त्या डॉक्टरांची भेट घेऊन डॉक्टर अशोक पाल यांच्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत आणि या प्रकरणी मुख्य आरोपीला अटक केली पाहिजे, असं म्हटलं. या प्रकरणाची फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालवावे, अशीही मागणी संजय राठोड यांनी यावेळी केली आहे. या प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्याशी संवाद साधला. त्यांनीही घटनेची गंभीर दखल घेतल्याचे आमदार संजय राठोड यांनी सांगितले आहे. शिवाय काल शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संतोष ढवळे यांनी डॉक्टरांसोबत जो वाद घातला त्या बद्दल त्यांच्या वर्तनाबद्दल आमदार संजय राठोड यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली आहे.डॉ अशोक पाल यांच्या कुटुंबियांना सुरवातीला शासनाकडून 5 लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्यात येतील. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मानेवर उपचार सुरू असून त्यातून ते बाहेर येताच या सहायता निधीत वाढ केली जाईल असे आमदार संजय राठोड यांनी सांगितले.