एक्स्प्लोर

कपड्यात लपवून विदेशी मद्याच्या तस्करी, लाखो रुपयांच्या मद्यासह ठाण्यातून बीएमडब्लू कार जप्त

Thane Crime News : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ठाण्यात मोठी कारवाई केली आहे. कपड्यांच्या आडून बनावट विदेशी मद्याची तस्करी करणाऱ्या टोळीचा या पथकाने पर्दाफाश केलाय.

Thane Crime News : कपड्यांच्या आडून बनावट विदेशी मद्याची (Foreign Liquor) तस्करी करणाऱ्या टोळीचा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने (State Excise Department) पर्दाफाश केलाय. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने केलेल्या छापेमारीत कल्याण-पडघा मार्गावरील एका गोदामासह कल्याणमध्ये उभ्या असलेल्या एका बीएमडब्लू कारमधून लाखोंचा विदेशी मद्याचा साठा जप्त केलाय. याबरोबरच गोदाम सील करून बीएमडब्लू कार जप्त केली आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. हनुमंत दत्तू ठाणगे (वय, 62) आणि संदीप  रामचंद्र दावानी (वय, 34 ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. बीएमडब्लूचा मालक आणि या टोळीचा मोरक्या  दिपक  जियांदराम  जयसिंघानी हा फरार आहे. 

Thane Crime News :  'असं' उघड पडलं पितळ 

कल्याण-पडघा मार्गावरील देवरुंग गावातील एका गोदामात बनावटी विदेशी मद्याचा साठा लपवून ठेवल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना गुप्त बातमीदाराने दिली होती. मिळालेल्या माहितीनुसार  भरारी पथक, राज्य उत्पादन शुल्क कल्याण विभागाच्या पथकासह भिवंडी आणि उल्हासनगर निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्त कारवाई केली. संयुक्त कारवाईत दारूसाठी लपवून ठेवलेल्या गोदामावर छापेमारी केली. यावेळी गोदामात साठा केलेले दमण आणि हरीयाणा राज्य निर्मित तसेच महाराष्ट्र राज्यातील बनावट मद्याच्या साठ्याचे 266 बॉक्स जप्त करण्यात आले.

या छापेमारीनंतर तपास पथकाने  कल्याण पश्चिम भागातील एका हायप्रोफाईल सोसायटीच्या पार्किंगमध्ये  छापा टाकून त्या ठिकाणी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या बीएमडब्लू  कारमधून दमण राज्य निर्मित विदेशी मद्याचे  25 बॉक्स जप्त करण्यात आले. या दोन्ही छापेमारीत 291 बॉक्स आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. दोन्ही कारवाईत 56 लाख 75 हजार 640 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईनंतर तिघांवर  महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 65 (अ), (ई), 81, 83, 90 आणि 108 अन्वये गुन्हा  दाखल करण्यात आला.

छापेमारीत जप्त केलेला मुद्देमाल हा जुन्या कपड्यांच्या गोण्यामध्ये लपवून महाराष्ट्रात आणल्याचे उघडकीस आले आहे. तसेच फरार आरोपी दिपक जियांदराम जयसिंघानी याच्या नावे मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यामध्ये वाईन शॉप  असल्याचे समोर आले आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागाचे अधीक्षक डॉ. निलेश सांगडे यांनी दिली.  

महत्वाच्या  बातम्या 

Aurangabad News: शिवीगाळ करणारा मित्र डोक्यात बसला, म्हणून धारदार दगडाने मुंडके धडावेगळे करत त्याचा जीवच घेतला

महत्त्वाच्या बातम्या

Sangola Crime News: सांगोल्यात भाजप पदाधिकाऱ्याची गोळ्या घालून हत्या, 7 दिवसांनंतरही कारवाई होईना; कुटुंबीयांचा संताप, शिवसेनेच्या नेत्यावर आरोप
सांगोल्यात भाजप पदाधिकाऱ्याची गोळ्या घालून हत्या, 7 दिवसांनंतरही कारवाई होईना; कुटुंबीयांचा संताप, शिवसेनेच्या नेत्यावर आरोप
परफ्युम खरेदी न केल्याने फेरीवाल्यांकडून युवक-युवतीला मारहाण; तरुणीचा टी-शर्ट फाडून अश्लील शिवीगाळ, दोघांना अटक
परफ्युम खरेदी न केल्याने फेरीवाल्यांकडून युवक-युवतीला मारहाण; तरुणीचा टी-शर्ट फाडून अश्लील शिवीगाळ, दोघांना अटक
Thane Crime News: डोंबिवलीत मित्रानेच मित्राला संंपवलं, 20 दिवस बॉडी लपवली, पण मेलेल्या मित्राने स्वप्नात येऊन हैराण केलं, अखेर पोलिसांकडे जाऊन कबुली दिली
डोंबिवलीत मित्रानेच मित्राला संंपवलं, 20 दिवस बॉडी लपवली, पण मेलेल्या मित्राने स्वप्नात येऊन हैराण केलं, अखेर पोलिसांकडे जाऊन कबुली दिली
राम पूर्णेकरांच्या जिवीताला धोका, कुटुंबीयांना पोलीस संरक्षण वाढवून द्या; मिनाक्षी शिंदेंचंच पोलीस आयुक्तांना पत्र
राम पूर्णेकरांच्या जिवीताला धोका, कुटुंबीयांना पोलीस संरक्षण वाढवून द्या; मिनाक्षी शिंदेंचंच पोलीस आयुक्तांना पत्र

व्हिडीओ

Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report
Dia Mirza vs BMC on Diwali Pollution : व्हिडीओवरून कुरबूर बीएमसीत 'मिर्झा'पूर Special Report
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supreme Court: एकाच ठिकाणी अनिश्चित काळासाठी आंदोलने करता येणार नाहीत, सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी
एकाच ठिकाणी अनिश्चित काळासाठी आंदोलने करता येणार नाहीत, सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी
District Bank Election Result 2026 पडळकर, लंकेंनी गुलाल उधळला, शंभुराजेंचाही जल्लोष; तीन जिल्हे, तीन बँका, सांगली, सातारा, अहिल्यानगरमध्ये कोणाची सत्ता?
पडळकर, लंकेंनी गुलाल उधळला, शंभुराजेंचाही जल्लोष; तीन जिल्हे, तीन बँका, सांगली, सातारा, अहिल्यानगरमध्ये कोणाची सत्ता?
Gokul Election: गोकुळ अध्यक्ष निवडी बाबतीत वाढलेल्या घडामोडीनंतर महायुतीमधील अंतर्गत नाराजी उफाळली
गोकुळ अध्यक्ष निवडी बाबतीत वाढलेल्या घडामोडीनंतर महायुतीमधील अंतर्गत नाराजी उफाळली
Satara District Bank Election Result 2026: राज्यात महायुती, साताऱ्यात सत्तासंघर्ष कायम; 21 पैकी कोणत्या पक्षाला किती मिळाल्या जागा? DCC बँकेच्या अध्यक्षपदासाठी नवं राजकीय गणितं
राज्यात महायुती, साताऱ्यात सत्तासंघर्ष कायम; 21 पैकी कोणत्या पक्षाला किती मिळाल्या जागा? DCC बँकेच्या अध्यक्षपदासाठी नवं राजकीय गणितं
पुणे महापालिकेत गिफ्टच्या बॉक्सची पिशवी घेऊन अज्ञात व्यक्तीचा शिरकाव, व्हिडिओ व्हायरल; आयुक्तांकडे कारवाईची मागणी
पुणे महापालिकेत गिफ्टच्या बॉक्सची पिशवी घेऊन अज्ञात व्यक्तीचा शिरकाव, व्हिडिओ व्हायरल; आयुक्तांकडे कारवाईची मागणी
Sangola Crime News: सांगोल्यात भाजप पदाधिकाऱ्याची गोळ्या घालून हत्या, 7 दिवसांनंतरही कारवाई होईना; कुटुंबीयांचा संताप, शिवसेनेच्या नेत्यावर आरोप
सांगोल्यात भाजप पदाधिकाऱ्याची गोळ्या घालून हत्या, 7 दिवसांनंतरही कारवाई होईना; कुटुंबीयांचा संताप, शिवसेनेच्या नेत्यावर आरोप
सोलापूर जिल्हा बँक निवडणूक, अकलूजला धक्का; रणजिसिंह मोहिते पाटलांसह भाजपच्या प्रशांत परिचारकांचाही अर्ज बाद
सोलापूर जिल्हा बँक निवडणूक, अकलूजला धक्का; रणजिसिंह मोहिते पाटलांसह भाजपच्या प्रशांत परिचारकांचाही अर्ज बाद
शासन नियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार देत संख्याबळ फिरवणार असतील, तर मग निवडणुका घ्यायच्या कशाला? लोकांच्या मताचा काय अर्थ? गोकुळमध्ये मागच्या दारानं सत्ता काबीज करण्यावर सतेज पाटलांची थेट विचारणा
शासन नियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार देत संख्याबळ फिरवणार असतील, तर मग निवडणुका घ्यायच्या कशाला? लोकांच्या मताचा काय अर्थ? गोकुळमध्ये मागच्या दारानं सत्ता काबीज करण्यावर सतेज पाटलांची थेट विचारणा
Embed widget