एक्स्प्लोर

सोनमचा प्रियकर राज कुशवाहच्या आजीचा हार्ट अटॅकने मृत्यू, अखेरच्या घटकेपर्यंत घोकत होती, माझ्या राजला..

राजा रघुवंशीची हत्या करणाऱ्या सोनमच्या प्रियकराची आजी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाल्याचं समोर आलं आहे.

Sonam Raghuvanshi: मेघालयात मधुचंद्रासाठी गेलेल्या सोनम आणि राजा रघुवंशी हत्या प्रकरणात दररोज मोठे खुलासे होत आहेत. राजा रघुवंशीची पत्नी सोनमने प्रियकर राज कुशवाहाच्या साथीने हत्या केली .  या प्रकरणात राज कुशवाह विनाकारण गोवल्याचा आरोप त्याचे कुटुंबीय करत आहेत .राज कुशवाहाच्या अटकेच्या धक्क्यामुळे त्याच्या आजीला हृदयविकाराचा तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याचं समोर येत आहे .

राज कुशवाहच्या आजीचं निधन

राज कुशवाहाच्या कुटुंबाने आरोप केलाय की राजा रघुवंशी हत्या प्रकरणात आमच्या मुलाला विनाकारण गोवण्यात आला आहे .राजला झालेल्या अटकेमुळे त्याच्या आजीला दुःख सहन झाले नाही .त्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याने तिचं निधन झालं .माझ्या राजला फसवलं आहे . त्याला या प्रकरणात मुद्दाम गोवलं आहे . असं शेवटच्या क्षणापर्यंत त्याची आजी बोलत होती असंही राज कुशवाहाच्या कुटुंबीयांनी सांगितलं .

शेवटपर्यंत ती घोकत राहिली, राज निर्दाेष आहे...

राज कुशवाह याची आजी राम लल्ली (74) यांचं फतेहपूर जिल्ह्यातील गाजीपुर येथे रामपूर गावात त्यांच्या घरी निधन झाले .त्यांचे पती दरबारी सिंग यांनी पत्रकारांना सांगितले,' राजा रघुवंशी यांच्या हत्येत प्रमुख आरोपी म्हणून त्यांच्या नातवाचे म्हणजे राज कुशवाहाचे नाव समोर आल्यापासून राज निर्दोष आहे .या प्रकरणात त्याला अडकवले जात असल्याचं त्याची आजी घोकत असल्याचं त्यांनी सांगितलं .

राज कुशवाहच्या आजोबांनी सांगितलं...

एका आठवड्यापूर्वीच राज कुशवाहाच्या आजीने माध्यमांसमोर येऊन त्यांच्या नातवाची बाजू मांडली होती .राज कुशवाह चे कधीही कोणाशीही प्रेमसंबंध नव्हते .सोनमने तिच्या पतीची हत्या घडवून आणली आणि ती आता राजला या प्रकरणात ओढत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं . 

राज कुशवाहाच्या आजोबांनी दरबारी सिंग यांनी माध्यमांना सांगितलं,' राज हा मृदुभाषी कर्तव्यदक्ष माणूस आहे .कोरोना महामारीत त्याच्या वडिलांच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर पडली .आर्थिक संकटामुळे राजचे वडील सुमारे पंधरा वर्षांपूर्वी इंदौरला गेले . आणि त्यांनी फळांचा व्यवसाय सुरू केला .कुटुंबाची परिस्थिती सुधारल्यावर राज देखील दशक भरापूर्वी त्याच्या आई आणि दोन बहिणींसह इंदौरला आला .केवळ बारावी उत्तीर्ण असल्याने गोविंद नगर खर्चा परिसरातील रहिवासी असलेल्या सोनमच्या कुटुंबाच्या मालकीच्या फर्निचर शीट युनिटमध्ये तो अकाउंटंट म्हणून कामाला लागला . '

पोलीस तपासात राज कुशवाहच दोषी

पोलिसांच्या तपासात राजा रघुवंशी हत्या प्रकरणात सोनमचा प्रियकर  राज कुशवाह हाच दोषी असल्याचे समोर आले .या प्रकरणात सोनमसह पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे . लग्नापूर्वीपासूनच राजा रघुवंशी च्या हत्येचा कट दोघांनी रचला असा आरोप आहे .या हत्येचे प्लॅनिंग करण्यासाठी दोघेही शंभरहून अधिक वेळा फोनवर बोलत असल्याचे समोर आले आहे .

हेही वाचा:

मुंबईत नोकऱ्या शोधताय? AI नं सगळा गेम बदललाय, आता उमेदवार निवडण्यासाठी कंपन्यांचं 70% बजेट AI टूल्सवर, Linkdin चा नवा रिपोर्ट

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray : संयुक्त सभेआधी ठाकरे बंधूंचा शाखा भेटीचा सपाटा सुरुच, शिवसैनिक-मनसैनिकांत मोठा उत्साह
संयुक्त सभेआधी ठाकरे बंधूंचा शाखा भेटीचा सपाटा सुरुच, शिवसैनिक-मनसैनिकांत मोठा उत्साह
Election : बापाची चप्पल पायात आली म्हणून महेश लांडगेंनी स्वतःला शहाणं समजू नये; अजितदादांच्या शिलेदाराचा इशारा
बापाची चप्पल पायात आली म्हणून महेश लांडगेंनी स्वतःला शहाणं समजू नये; अजितदादांच्या शिलेदाराचा इशारा
शिवसेना उमेदवाराच्या बापाचा प्रताप; लेकाच्या हातात 10 लाखांचं घड्याळ, पण घरभाडे मागितल्याने प्रकल्पबाधितांना दमदाटी
शिवसेना उमेदवाराच्या बापाचा प्रताप; लेकाच्या हातात 10 लाखांचं घड्याळ, पण घरभाडे मागितल्याने प्रकल्पबाधितांना धमकी
Indore Accident: घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार

व्हिडीओ

Aaditya Thackeray Speech Dadar : आदित्य ठाकरेंचं दादरमध्ये दणदणीत भाषण, मुख्यमंत्र्‍यांवर टीका
Raj Thackeray Nashik Speech : तपोवन ते फडणवीस, जनसंघ ते भाजप ; राज ठाकरेंचे नाशिकमधील घणाघाती भाषण
Uddhav Thackeray Speech Nashik : भाजपने झेंड्यावरील हिरवा रंग काढावा ; उद्धव ठाकरे भाजपवर बरसले
Coffee With Kaushik : Nilesh Rane, Yogesh Kadam, शिंदेंची यंग ब्रिगेड EXCLUSIVE
Raj Thackeray Majha Katta : मुंबई कुणाच्या बापाची? राज ठाकरेंची 'माझा कट्टा'वर सर्वात स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : संयुक्त सभेआधी ठाकरे बंधूंचा शाखा भेटीचा सपाटा सुरुच, शिवसैनिक-मनसैनिकांत मोठा उत्साह
संयुक्त सभेआधी ठाकरे बंधूंचा शाखा भेटीचा सपाटा सुरुच, शिवसैनिक-मनसैनिकांत मोठा उत्साह
Election : बापाची चप्पल पायात आली म्हणून महेश लांडगेंनी स्वतःला शहाणं समजू नये; अजितदादांच्या शिलेदाराचा इशारा
बापाची चप्पल पायात आली म्हणून महेश लांडगेंनी स्वतःला शहाणं समजू नये; अजितदादांच्या शिलेदाराचा इशारा
शिवसेना उमेदवाराच्या बापाचा प्रताप; लेकाच्या हातात 10 लाखांचं घड्याळ, पण घरभाडे मागितल्याने प्रकल्पबाधितांना दमदाटी
शिवसेना उमेदवाराच्या बापाचा प्रताप; लेकाच्या हातात 10 लाखांचं घड्याळ, पण घरभाडे मागितल्याने प्रकल्पबाधितांना धमकी
Indore Accident: घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
पुण्यात पद्मभूषण माधव गाडगीळांच्या अंत्यविधीला अवघे 50 लोक, एकही स्थानिक नेता नाही; समाज कुठं चाललाय?
पुण्यात पद्मभूषण माधव गाडगीळांच्या अंत्यविधीला अवघे 50 लोक, एकही स्थानिक नेता नाही; समाज कुठं चाललाय?
मुंबईतील मसिना हॉस्पिटलची माणुसकी मेली, 8 तास मृतदेह अडवून ठेवला, ट्रस्टच्या हॉस्पिटलचा भ्रष्ट कारनामा!
मुंबईतील मसिना हॉस्पिटलची माणुसकी मेली, 8 तास मृतदेह अडवून ठेवला, ट्रस्टच्या हॉस्पिटलचा भ्रष्ट कारनामा!
अजित पवार अन् महेश लांडगेंच्या वादात फडणवीसांची उडी; दादांना शायरीतून टोला, आमदारालाही सल्ला
अजित पवार अन् महेश लांडगेंच्या वादात फडणवीसांची उडी; दादांना शायरीतून टोला, आमदारालाही सल्ला
Charter Plane Crash: 9 आसनी चार्टर्ड विमान कोसळले, पायलटसह 6 जण गंभीर जखमी; भीषण अपघात नेमका घडला तरी कसा?
9 आसनी चार्टर्ड विमान कोसळले, पायलटसह 6 जण गंभीर जखमी; भीषण अपघात नेमका घडला तरी कसा?
Embed widget