एक्स्प्लोर

मुंबईत नोकऱ्या शोधताय? AI नं सगळा गेम बदललाय, आता उमेदवार निवडण्यासाठी कंपन्यांचं 70% बजेट AI टूल्सवर, Linkdin चा नवा रिपोर्ट

जगातील सर्वात मोठे प्रोफेशनल नेटवर्क LinkedInच्‍या नवीन संशोधनामधून निदर्शनास येते की, रिक्रूटर्स हायरिंग यशाचा दर वाढवण्‍यासाठी जवळपास 70% बजेट तंत्रज्ञान आणि एआयसारख्‍या टूल्‍समध्‍ये गुंतवत आहेत.

Mumbai: मुंबईत रिक्रूटर्स आता फक्त रेज्युमे वाचून किंवा फोनवरून मुलाखती घेऊन उमेदवार निवडत नाहीत, तर AI टूल्स वापरून स्मार्ट पद्धतीने आणि जलद हायरिंग करत आहेत. LinkedIn च्या अभ्यासानुसार, मुंबईतील तब्बल 83% रिक्रूटर्स त्यांच्या एकूण भरती बजेटपैकी 70% रक्कम AI आणि टेक टूल्सवर खर्च करत आहेत. 10 शहरांतील 1,300 पेक्षा जास्त HR प्रोफेशनल्सनी दिलेल्या उत्तरांच्या आधारे तयार झालेल्या या रिपोर्टमध्ये सांगितलं आहे की, मुंबईतले रिक्रूटर्स आता फक्त "जलद हायरिंग" नव्हे, तर "दर्जेदार हायरिंग" वर भर देत आहेत. मुंबईतील 67% रिक्रूटर्सच्या मते, उमेदवारांची निवड करताना आता डिग्रीपेक्षा स्किल्स (प्रॅक्टिकल व ट्रान्सफर होणारी कौशल्यं) महत्त्वाची वाटतात.

अ‍ॅडेको इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर सुनिल चेमनकोटील म्हणतात, “आम्‍हाला टॅलेंट समूहामध्‍ये, तसेच त्‍यांच्‍या भूमिकांच्‍या स्‍वरूपामध्‍ये मुलभूत बदल होताना दिसत आहे. जॉब फंक्‍शन्‍स बदलण्‍यासह हायब्रिड प्रोफाइल्‍स प्रमाणित होत असताना समकालीन जॉब टायटल्‍स उमेदवारांच्‍या संपूर्ण क्षमता दाखवण्‍यामध्‍ये अक्षम ठरत आहेत. लिंक्‍डइन रिक्रूटर २०२४ सारख्‍या प्रगत टूल्‍ससह आम्‍ही आता महत्त्वपूर्ण कौशल्‍यांमधील पदे ओळखू शकतो, जी महत्त्वाची आहेत. यामुळे आम्‍हाला योग्‍य टॅलेंटचा शोध घेण्‍यास मदत होते, ज्‍यांच्‍याकडे पूर्वी दुर्लक्ष करण्‍यात आले असावे. भारतासारख्‍या डायनॅमिक बाजारपेठेत यासारखी एआय-संचालित माहिती उपयुक्‍त असण्‍यासोबत धोरणात्‍मक फायदा देते."

टॅलेंट मिळवणं अजूनही एक मोठं आव्हान

देशभरात उत्पादन (66%) आणि IT क्षेत्र (62%) स्किल्सवर भर देत असताना, अनेक कंपन्यांना "योग्य टेक्निकल आणि सॉफ्ट स्किल्स असलेले" लोक शोधणं कठीण जातं. IT क्षेत्रात 69% कंपन्यांना चांगले उमेदवार लवकर मिळवण्यात अडचणी येत आहेत. मुंबईतील ग्लोबल कंपन्यांच्या ऑफिसेसना (GCCs) स्थानिक स्तरावर टॅलेंट हायर करताना कमी ट्रेनिंग संधी (56%) आणि टॉप टॅलेंटसाठी वाढती स्पर्धा (55%) या गोष्टी त्रासदायक ठरत आहेत. LinkedIn Talent Solutionsच्या प्रमुख रूची आनंद म्हणतात, “भारतातील रिक्रूटर्स आता केवळ AI शी जुळवून घेत नाहीत, तर त्याचा सक्रिय वापर करून व्यवसायात खऱ्या अर्थाने परिणाम घडवत आहेत. मुंबईसारख्या वेगाने बदलणाऱ्या टॅलेंट मार्केटमध्ये हे अधिक स्पष्ट दिसत आहे. इथले रिक्रूटर्स पदव्या नाही, तर कौशल्यांना आणि संख्येपेक्षा मूल्याला प्राधान्य देतात. LinkedIn च्या AI टूल्स आणि धोरणात्मक पद्धतीच्या सहाय्याने, मुंबईतील रिक्रूटर्स अचूकतेने आणि उद्दिष्टपूर्ण हायरिंग करून मोठं यश मिळवत आहेत."

AI वापरून वेळ वाचतोय, फोकस योग्य ठिकाणी जातोय

मुंबईतील 65% रिक्रूटर्स AI-आधारित स्क्रिनिंग टूल्स वापरतात. 62% लोक डेटा अ‍ॅनालिसिसचा वापर करून झटपट निर्णय घेतात. यामुळे वेळही वाचतो आणि निर्णय जास्त योग्य होतात. देशभरातही IT, BFSI आणि उत्पादन क्षेत्रात हेच चित्र आहे. मुंबईत 45% रिक्रूटर्सना वाटतं की AI मुळे त्यांचं काम वेगवान आणि परिणामकारक होतंय. 41% रिक्रूटर्स सांगतात की AI मुळे वेळखाऊ कामं कमी झाली असून ते आता उमेदवार अनुभव आणि स्टेकहोल्डरशी संवाद यावर लक्ष केंद्रित करू शकतात.  92% रिक्रूटर्सना विश्वास आहे की ते "धोरणात्मक करिअर सल्लागार" बनतील. 94% रिक्रूटर्स AI वापरून वैयक्तिक माहिती व कंटेंटच्या आधारे उमेदवारांशी चांगलं कनेक्ट होण्याचं नियोजन करत आहेत.

LinkedIn चं AI टूल्स कसं काम करतं?

  • LinkedIn चं Recruiter 2024 हे जनरेटिव्ह AI टूल रिक्रूटर्सला जलद आणि दर्जेदार उमेदवारांशी संपर्क साधायला मदत करतंय. यामधून पाठवलेले मेसेजेस 44% प्रतिसाद दर मिळवत आहेत – हे पारंपरिक पद्धतींपेक्षा 11% जलद आहे.
  • Hiring Assistant नावाचं टूल रिक्रूटर्सचं सोर्सिंग आणि स्क्रिनिंग सारखं वेळखाऊ काम ऑटोमेट करतं. त्यामुळे रिक्रूटर्स हायरिंग मॅनेजर्सना मार्गदर्शन देणं, मुलाखती घेणं, आणि उत्तम टॅलेंट निवडणं यासारख्या महत्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित करू शकतात.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray And Uddhav Thackeray Alliance: उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंच्या ऐतिहासिक पत्रकार परिषदेतील 10 महत्वाचे मुद्दे, ठाकरे बंधूंनी सगळं सांगितलं!
उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंच्या ऐतिहासिक पत्रकार परिषदेतील 10 महत्वाचे मुद्दे, ठाकरे बंधूंनी सगळं सांगितलं!
Raj Thackeray: कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठाय; आमची युती झालीय हे आम्ही जाहीर करतोय, मुंबईत महापौर मराठीच होणार आणि आमचाच होणार! उद्धव साक्षीने राज ठाकरेंची 'मनसे' गर्जना
कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठाय; आमची युती झालीय हे आम्ही जाहीर करतोय, मुंबईत महापौर मराठीच होणार आणि आमचाच होणार! उद्धव साक्षीने राज ठाकरेंची 'मनसे' गर्जना
आमचं ठरलंय नंतर आता कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं! सतेज पाटलांकडून हलगी तापवायला सुरुवात, प्रचारात 100 कोटींचे रस्तेच केंद्रस्थानी राहण्याची चिन्हे
आमचं ठरलंय नंतर आता कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं! सतेज पाटलांकडून हलगी तापवायला सुरुवात, प्रचारात 100 कोटींचे रस्तेच केंद्रस्थानी राहण्याची चिन्हे
Kalyani Komkar: 'प्लिज असं नका करू, त्यांना तिकीट देऊ नका', आयुष कोमकरच्या आईचा 'तो' भावनिक VIDEO समोर, आंदेकर टोळीला पक्षाकडून तिकीट मिळणार की नाही?
'प्लिज असं नका करू, त्यांना तिकीट देऊ नका', आयुष कोमकरच्या आईचा 'तो' भावनिक VIDEO समोर, आंदेकर टोळीला पक्षाकडून तिकीट मिळणार की नाही?

व्हिडीओ

Uddhav Thackeray Matoshri : उद्धव ठाकरे दादरच्या दिशेने रवाना, बाळासाहेबांना अभिवादन करणार
Sudhir Mungantiwar : जादू झाली, नाराजी गेली; सुधीरभाऊंना पक्ष ताकद कशी देणार? Special Report
Lote Parshuram MIDC : इटलीचा कारखाना, कोकणात कारमाना; लक्ष्मी ऑरगॅनिक लि. कंपनी वादात Special Report
Thackeray Brother Alliance : ठाकरेंच्या युतीचा नारा, वेळ दुपारी बारा Special Report
Mumbai Air Pollution : प्रदूषणाचा विषय खोल, कोर्टाचे खडे बोल; हवा प्रदूषण कसं रोखणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray And Uddhav Thackeray Alliance: उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंच्या ऐतिहासिक पत्रकार परिषदेतील 10 महत्वाचे मुद्दे, ठाकरे बंधूंनी सगळं सांगितलं!
उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंच्या ऐतिहासिक पत्रकार परिषदेतील 10 महत्वाचे मुद्दे, ठाकरे बंधूंनी सगळं सांगितलं!
Raj Thackeray: कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठाय; आमची युती झालीय हे आम्ही जाहीर करतोय, मुंबईत महापौर मराठीच होणार आणि आमचाच होणार! उद्धव साक्षीने राज ठाकरेंची 'मनसे' गर्जना
कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठाय; आमची युती झालीय हे आम्ही जाहीर करतोय, मुंबईत महापौर मराठीच होणार आणि आमचाच होणार! उद्धव साक्षीने राज ठाकरेंची 'मनसे' गर्जना
आमचं ठरलंय नंतर आता कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं! सतेज पाटलांकडून हलगी तापवायला सुरुवात, प्रचारात 100 कोटींचे रस्तेच केंद्रस्थानी राहण्याची चिन्हे
आमचं ठरलंय नंतर आता कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं! सतेज पाटलांकडून हलगी तापवायला सुरुवात, प्रचारात 100 कोटींचे रस्तेच केंद्रस्थानी राहण्याची चिन्हे
Kalyani Komkar: 'प्लिज असं नका करू, त्यांना तिकीट देऊ नका', आयुष कोमकरच्या आईचा 'तो' भावनिक VIDEO समोर, आंदेकर टोळीला पक्षाकडून तिकीट मिळणार की नाही?
'प्लिज असं नका करू, त्यांना तिकीट देऊ नका', आयुष कोमकरच्या आईचा 'तो' भावनिक VIDEO समोर, आंदेकर टोळीला पक्षाकडून तिकीट मिळणार की नाही?
Rohit Pawar: मुंबईत एकत्र लढण्याबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 'वेट अँड वॉच'; दोन दिवसात निर्णय न झाल्यास...; रोहित पवार स्पष्टच बोलले
मुंबईत एकत्र लढण्याबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 'वेट अँड वॉच'; दोन दिवसात निर्णय न झाल्यास...; रोहित पवार स्पष्टच बोलले
'उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे' हे भाजप-शिंदे गटाचं काम, भाजप आमदार पराग शहानं भर रस्त्यात मराठी रिक्षावाल्याला मारलं ते दिसत नाही का? संजय राऊतांचा हल्लाबोल
'उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे' हे भाजप-शिंदे गटाचं काम, भाजप आमदार पराग शहानं भर रस्त्यात मराठी रिक्षावाल्याला मारलं ते दिसत नाही का? संजय राऊतांचा हल्लाबोल
BlueBird Block 2 Satellite: 'इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
'इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
Thane Mahangarpalika Election 2026: ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार, ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला; ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार
Embed widget