Mumbai News : धक्कादायक! इमारतीमध्ये राहणारा कुत्र्यावर गोळीबार; कारण अद्याप अस्पष्ट, आरोपीला अटक
मुंबईच्या जोगेश्वरी पश्चिमेत ओशिवरा परिसरात कुत्र्यावर गोळीबार करण्याचं धक्कादायक घटना घडली आहे. परिसरात शांतीवन इमारतीमध्ये मध्यरात्री एका व्यक्तीकडून बंदुकीने कुत्र्यावर गोळीबार केल्याचा घटना घडलीय.
Mumbai News मुंबई : मुंबईच्या जोगेश्वरी पश्चिमेत ओशिवरा परिसरात कुत्र्यावर गोळीबार करण्याचं धक्कादायक घटना घडली आहे. ओशिवरा परिसरात शांतीवन इमारतीमध्ये काल मध्यरात्री एका व्यक्तीकडून बंदुकीने कुत्र्यावर गोळीबार केल्याचा घटना घडली आहे. रात्री दोन ते अडीचशे सुमारास शांतीवन इमारतीमध्ये राहणारा एका व्यक्तीने इमारतीमध्ये एका कुत्रावर गोळीबार केली आहे. कुत्र्यावर केलेल्या या गोळीबारमध्ये कुत्रा गंभीर जखमी झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे कुत्र्याच्या शरीरातून बंदुकीची गोळी आर पार झाली आहे. सध्या कुत्र्यावर पशुवैद्यकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे.
मात्र इमारतीमध्ये राहणारा व्यक्तीने कुत्र्यावर का गोळीबार केला? यासंदर्भात ओशिवरा पोलीस घटनास्थळी दाखल होऊन इमारतीमध्ये असलेला सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून आरोपीचे शोध घेत त्याला अटक करण्यात आली आहे. मात्र या घटनेनंतर पशूप्रेमीकडून संताप व्यक्त केला जात आहे.
कुत्र्यावर गोळीबार करणाऱ्याला अटक
कुत्र्यावर गोळीबार करणारा आरोपीला ओशिवरा पोलिसांनी ताब्यात घेतेले आहे. सोबत ज्या बंदूकमधून गोळीबार करण्यात आली ते बंदूक सुद्धा ओशिवरा पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतली आहे. रात्री अडीच वाजता ओशिवरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत शांतीवन इमारतीमध्ये पहिला मजल्यावरून एका अज्ञात व्यक्तीकडून इमारतीच्या कंपाउंड मध्ये कुत्रावर गोळीबार करण्यात आला होता. गोळीबारात बंदुकीचे गोळी कुत्र्याच्या शरीरामधून आरपार गेल्यामुळे कुत्रा गंभीर जखमी झाला होता. तर घटनेत वापरलेली बंदूक ही एअर बंदूक असल्याची माहिती पुढे आली आहे. या एअर बंदूकमधून फायर केल्यामुळे एअर बंदूकची गोळी कुत्र्याच्या आर-पार गेली असल्याचे बोलले जात आहे.
बाप रे... 9 महिन्यात 18 हजार पुणेकरांना चावले भटके कुत्रे
पुण्यात गेल्या ९ महिन्यात १८ हजार जणांना कुत्र्यांनी चावा घेतला असून दर महिन्यात दोन हजार नागरिकांना चावा घेतल्याचं हे प्रमाण आकडेवारीतून समोर आलं आहे. त्यामुळे, पुण्यातून पादचारी मार्गाने किंवा गल्ली परिसरातून जाताना नागरिकांनी, पादचाऱ्यांनी अधिक काळजी घेणे गरजेचं असल्याचं लक्षात येईल. विशेष म्हणजे पुणे महापालिका या घटनांची गंभीर दखल कधी घेणार ? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. तर, पुणे शहरात गेल्या 9 महिन्यांमध्ये 18 हजाराहून अधिक नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. ही संख्या इतकी मोठी असली तरी सुद्धा दुसऱ्या बाजूला कुत्र्यांचे लसीकरण आणि नसबंदी करण्यात येत असल्याचा दावा पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने केला आहे.
कुत्र्यांनी चावा घेतलेली आकडेवारी (2024)
महिना : चावा घेतलेल्यांची संख्या
जानेवारी : 1973
फेब्रुवारी : 2093
मार्च : 1961
एप्रिल : 1920
मे : 2839
जून : 2199
जुलै : 2012
ऑगस्ट : 1937
सप्टेंबर : 2026
गेल्या 9 महिन्यातील ही आकडेवारी असून या सर्वच महिन्यांतील बाधित रुग्णांची संख्या 18 हजारांहून अधिक आहे.
वर्षभरात कुत्र्यांच्या हल्ल्यांची संख्या वाढली
एप्रिल 2023 ते जुलै 2024 या कालावधीत भिवंडीत तब्बल 14,216 लोकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे, ज्यामध्ये लहान मुलांचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे. दर महिन्याला शेकडो नागरिक या हल्ल्यांमध्ये जखमी होत आहेत. गेल्या वर्षभरात कुत्र्यांच्या हल्ल्यांची संख्या चिंताजनकपणे वाढली आहे. एप्रिल 2023 मध्ये 628 जणांना, मे महिन्यात 662, जुनमध्ये 504, जुलैमध्ये 987, ऑगस्टमध्ये 1400, सप्टेंबरमध्ये 680, ऑक्टोबरमध्ये 764, नोव्हेंबरमध्ये 746, डिसेंबरमध्ये 926, जानेवारी मध्ये 930, फेब्रुवारीत 956, मार्चमध्ये 1102, एप्रिल मध्ये 1100, मे महिन्यात 1045, जुनमध्ये 886 आणि जुलै मध्ये 900 नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे.या घटनेमुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आणि महानगरपालिका प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त होत आहे. कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर आणि त्यांच्या हल्ल्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी सर्वत्र होत आहे.
हे ही वाचा