हवेत गोळीबारप्रकरणी परळीत तिघांवर गुन्हा दाखल, व्हायरल व्हिडिओनंतर बीड पोलिसांना अखेर जाग आली
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या हवेत गोळीबार केल्याच्या व्हायरल व्हीडिओविरोधात पोलिसांनी कारवाई केली असून ग्रामीण पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हाही दाखल आलाय.
Beed: बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून वातावरण दिवसेंदिवस तापतच चाललंय. अशातच देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यात देण्यात आलेल्या शस्त्र परवान्याचा मुद्दा समोर आलाय. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करत हे सर्व प्रकरण समोर आणले आहे. एकट्या बीड जिल्ह्यात एक हजाराहून अधिक परवानाधारक पिस्टल आहेत. बीड जिल्ह्यात सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर कायदा व सुव्यवस्थेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. या घटनेनंतर बीडचा बिहार होतोय का? असं देखील सर्व स्तरातून बोलले जातंय. दरम्यान, आता सुरक्षेच्या बाबतीत प्रशासन अलर्टमोडवर आलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या हवेत गोळीबार केल्याच्या व्हायरल व्हीडिओविरोधात पोलिसांनी कारवाई केली असून ग्रामीण पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हाही दाखल आलाय. बीडच्या परळीत हवेत गोळीबार करत दहशत निर्माण केल्याचा आक्षेप घेत तीन जणांवरोधात परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देशमुख यांच्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंत्री धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते कैलास फड यांचा हवेत गोळीबार करताना व्हिडिओ ट्विट केला. आणि शस्त्र परवाना बाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.यानंतर परळीत तिघांविरोधात गुन्हा दाखल झालाय.
नक्की प्रकरण काय?
बीडच्या परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात हवेत गोळीबार करून सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणानुसार, माणिक हरिश्चंद्र फड याच्याकडे परवानाधारक पिस्टल आहे आणि त्याने पिस्टलसह फोटो काढून सोशल मीडियावर अपलोड करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परवान्यातील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलीस कर्मचारी विष्णू घुगे यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवला आहे.तसेच, जयप्रकाश उर्फ बाळू रामधन सोनवणे याने 14 सप्टेंबर 2023 रोजी पांगरी कॅम्प येथे परवानाधारक 12 बोअर बंदुकीतून हवेत गोळीबार केला. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.कुणाल श्रीकांत फड याने त्याच्याकडे पिस्टल परवाना नसताना पिस्टलसह फोटो काढून सोशल मीडियावर अपलोड केला. यावरही गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यात 1 हजार 281 पिस्तूल परवाने, तर 295 अर्ज फेटाळले
बीड जिल्ह्यात एक हजार 281 पिस्तूल परवाने आहेत. तर 295 जणांचे अर्ज फिटाळण्यात आले आहे. जिल्हाभरातून आलेल्या अर्जातून एकट्या परळी तालुक्यात 55 अर्ज फेटाळले गेलेत. दरम्यान पिस्तूल परवान्यासाठी कोणत्याही शिफारशीची गरज लागत नसून त्यासाठी अनेक नियमावली असल्याचं बीडमधील पिस्तूल परवानाधारक पत्रकार भागवत तावरे यांनी सांगितले आहे.
बीडचा बिहार झाला आहे का?
मागच्या काही दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये घडणाऱ्या गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना त्या इतक्या वाढल्यात की बीड जिल्ह्यात कायद्याचा धाक आहे किंवा नाही? असा प्रश्न उपस्थित व्हावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आता या परिस्थितीला केवळ एक जण दोषी आहे असेही म्हणता येणार नाही. ज्यावेळी एखाद्या जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण होते त्यावेळी या व्यवस्थेतील प्रत्येक घटक त्याला थोड्याफार प्रमाणामध्ये जबाबदार असतो. त्यामुळे बीडचा बिहार झाला आहे का नाही याची चर्चा करण्यापेक्षा बीडची ही परिस्थिती सुधारण्यासाठी कोणी पुढे येणार आहे की नाही हा खरा प्रश्न आहे.
हेही वाचा: