Beed Police : सतीश भोसलेचा मोबाईल बीड पोलिसांकडून जप्त; फरारअसताना खोक्याला मदत करणारे ही रडारवर
Beed Police : बीड पोलिसांनी खोक्या उर्फ सतीश भोसलेचा मोबाईल जप्त केला असून तो फरार झाल्यापासून तो कोणाच्या संपर्कात होता, त्याला कुणी मदत केली, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

बीड: खोक्या उर्फ सतीश भोसलेच्या (Satish Bhosale) ग्लास हाऊसवर वनविभागाने कारवाई केली आहे. शिरूर कासार गावात असलेल्या त्याच्या अनधिकृत घरावर बुलडोझर फिरवण्यात आला आहे. ही घटना काल (गुरूवारी) रात्रीच्या सुमारास घडली. मात्र ही कारवाई झाल्यानंतर रात्रीच्या सुमारास अज्ञातांनी परिसर पेटविण्याचा प्रयत्न केलाय. या आगीत जनावरांसाठी ठेवण्यात आलेला चारा जळून नष्ट झालाय. तर काही पशूंचा देखील यात जळून मृत्यू झाला आहे. ही आग नेमकी कोणी लावली? याची माहिती अद्याप मिळालेली नाही.
दुसरीकडे बीड पोलीस खोक्याला घेऊन छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी प्रयागराजमध्ये त्याला अटक करण्यात आली होती. काल (13 मार्च) प्रयागराजमध्ये न्यायालयीन प्रक्रिया पार पाडल्यानंतर सतीश भोसलेचा ताबा बीड पोलिसांना मिळाला आहे. बीड पोलीस भोसलेला ताब्यात घेऊन आज पहाटे छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावर दाखल झाले आहेत. शिवाय आता खोक्याच्या फोन देखील जप्त करण्यात आला आहे. अशातच खोक्या फरार झाल्यापासून तो कोणाच्या संपर्कात होता, त्याला कुणी कुणी मदत केली, हे आता स्पष्ट होईल. सोबतच वैद्यकीय चाचणी पूर्ण झाल्यानंतर खोक्याला आता कोर्टात नेलं जाईल, अशी ही माहिती पुढे आली आहे. त्यामुळे बीडमधील भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता खोक्या उर्फ सतीश भोसलेचं इतर कोणाशी कनेक्शन उघड होतं का याचा तपासही पोलीस करत आहे.
खोक्याला आता कोर्टात नेलं जाणार
पुढे आलेल्या माहितीनुसार, वैद्यकीय चाचणी पूर्ण झाल्यानंतर खोक्याला आता कोर्टात नेले जात आहे. खोकला पुन्हा बीड पोलीस स्टेशनमध्ये आणलं असून पुढील प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. तर अटकेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुन्हा कोर्टामध्ये नेले जाणार आहे. सध्या खोक्याच्या हाताचे ठसे घेणे आणि इतर प्रक्रिया बीड पोलीस स्थानकात सुरू आहे. सुरवातीला आरोपी शिरूर पोलिसांच्याकडे हस्तांतरित करण्यात आला होता. मात्र आता खोक्या भोसलेला शिरूर पोलीस स्टेशनमध्ये आणले आहे.
हे ही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
