एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

सांगलीत सख्ख्या बहिणींवर काळाचा घाला! अपघातात एकीचा मृत्यू तर एक गंभीर जखमी

Sangli News : सांगलीतील जत तालुक्यात दोन सख्या बहिणींना भरधाव कारने धडक दिली. या अपघातामध्ये एका बहिणीचा मृत्यू झाला तर दुसरी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आलीये.

सांगली : सांगली जिल्ह्यातील (Sangli) जत तालुक्यात (Jat) दोन बहिणींच्या अपघातामुळे (Accident) एकच खळबळ व्यक्त केली जातेय. शुक्रवार 5 जानेवारी रोजी दुपारी तीनच्या सुमारास दोन शाळकरी सख्ख्या बहिणींना भरधाव कारने धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की, यामध्ये एकीचा मृत्यू झाला तर एक जण गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती समोर आली. या घटनेने उमदी, उटगी परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय. 

 या दोन्ही बहिणी उमदी मधील समता नगर येथील डेफोडीयल  इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षण घेत होत्या. इयत्ता चौथी आणि इयत्ता दुसरीत या बहिणी शिकत होत्या. अपघात झाल्यानंतर दोघींनाही तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु यामध्ये श्रावणी उमेश लिगाडे वय 10 हिचा उपचारादम्यान मृत्यू झाला. तर तिची लहान बहिण श्रद्धा उमेश लिगाडे वय 8 वर्ष ही जखमी झाली आहे.   . या दोघीही उटगी येथील रहिवाशी असून, त्या प्राथमिक शिक्षक उमेश लिगाडे यांच्या मुली आहेत. 

नेमकं काय घडलं?

उमदी येथील डेफोडीयल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये या मुली शिकत होत्या. शाळा सुटल्यानंतर श्रावणी लिगाडे आणि श्रध्दा लिगाडे या शाळा सुटल्यानंतर दुपारी तीन वाजताच्या सुमारास उटगी पासुन उमदीकडे काही अंतरावर असलेल्या लिगाडे यांच्या शेताजवळ स्कूल बसमधून उतरत होत्या. स्कूल बसमधून उतरुन आपल्या शेतातील घराकडे जात असताना त्यांचा अपघात झाला. उटगी कडुन उमदीकडे जात असलेल्या भरधाव कारने त्यांना जोरात धडक दिली. यामध्ये दोन्ही बहिणींना गंभीर दुखापत झाली. 

हा अपघात होताच त्यांना तात्काळ उपचाराकरिता त्यांना जत तालुक्यात नेण्यात आले. त्याचवेळी श्रावणीचा मृत्यू झाला तर श्रद्धा ही गंभीर जखमी झालीये. तिला पुढील उपचारांकरिता मिरज येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातातील कारचालकाचे नाव मात्र उशिरापर्यंत समजू शकले नाही. तसेच रात्री उशिरापर्यंत उमदी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली नव्हती.  त्यामुळे या कारचालकचा अद्यापही काही तपास लागला नसल्याची माहिती देण्यात आलीये. तसेच यामध्ये पोलिसांच्या तपासातून कोणती माहिती समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 

हेही वाचा : 

Nagpur Crime : पुणे हटिया एक्सप्रेसमध्ये तृतीयपंथीयांच्या वेशातील दरोडेखोरांचा हैदोस; चालत्या ट्रेनमध्ये प्रवाशांची लूटमार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Oath Ceremony: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स संपला; अजित पवारांनी सगळंच सांगून टाकलं
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स संपला; अजित पवारांनी सगळंच सांगून टाकलं
दादांच्या कोट्यात मराठवाड्यातून 8 आमदार, कुणाच्या गळ्यात पडणार मंत्रीपदाची माळ? 'या' नावांची चर्चा
दादांच्या कोट्यात मराठवाड्यातून 8 आमदार, कुणाच्या गळ्यात पडणार मंत्रीपदाची माळ? 'या' नावांची चर्चा
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
Supreme Court : 104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  7 AM : 1 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMaitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रीजी यांच्या प्रवचनाची पर्वणी : 1  December 2024Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  1 डिसेंबर 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM : 1 डिसेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Oath Ceremony: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स संपला; अजित पवारांनी सगळंच सांगून टाकलं
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स संपला; अजित पवारांनी सगळंच सांगून टाकलं
दादांच्या कोट्यात मराठवाड्यातून 8 आमदार, कुणाच्या गळ्यात पडणार मंत्रीपदाची माळ? 'या' नावांची चर्चा
दादांच्या कोट्यात मराठवाड्यातून 8 आमदार, कुणाच्या गळ्यात पडणार मंत्रीपदाची माळ? 'या' नावांची चर्चा
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
Supreme Court : 104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
SKOCH Award :'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
नाकात नथ अन् पिवळी साडी; मंगलस्नान विधीत हळदीनं माखलेला शोभिता धुलिपालाचा लूक व्हायरल
नाकात नथ अन् पिवळी साडी; मंगलस्नान विधीत हळदीनं माखलेला शोभिता धुलिपालाचा लूक व्हायरल
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
Embed widget