(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 6 AM : 1 डिसेंबर 2024 : ABP Majha
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 6 AM : 1 डिसेंबर 2024 : ABP Majha
भारताच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात मोठा छापा ओडिशामध्ये टाकण्यात आलाय. हा छापा 10 दिवस सुरु होता. या छाप्यात आयकर विभागातील अधिकाऱ्यांनी दारु बनवणारी कंपनी, बौध डिस्टिलरीज प्राइवेट लिमिटेडच्या अनेक विभागांमध्ये छापेमारी केली आहे. या दरम्यान, 352 कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. अधिकृत माहितीनुसार, हा छापा 10 दिवस चालला आणि मोठी रक्कम जप्त करण्यात आली. त्यामुळे याबाबत अनेक उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. आयकर विभागाकडून करण्यात आलेला हा आजवरचा सर्वात मोठा छापा आहे. नोटा मोजण्यासाठी 36 मशीनचा केला वापर छाप्या दरम्यान, प्राप्तीकर विभागाने जमिनीखाली दडलेल्या मौल्यवान वस्तू ओळखण्यासाठी स्कॅनिंग व्हील असलेल्या मशीनचा वापर केला आहे. याशिवाय या ऑपरेशनसाठी 36 नवीन मशीन्सची व्यवस्था देखील केली करण्यात आली होती. या मशीनचा वापर नोटा मोजण्यासाठी करण्यात आला होता. एवढी मोठी रक्कम मिळाल्यानंतर प्राप्तीकर विभागाने वेगवेगळ्या बँकांतील कर्मचाऱ्यांना मदतीसाठी बोलावले होते. ही मोठी रक्कम मोजण्यासाठी आणि पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासली होती.