(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sangli : आई-वडिलांसमोरच सांगलीत 17 वर्षाच्या मुलीची कॉलेजच्या इमारतीवरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू, कारण अद्याप अस्पष्ट
Sangli Crime : सांगली जिल्ह्यातील कुपवाडमधील नामांकित इंटरनॅशनल शैक्षणिक संकुलमधील ही घटना घडली आहे. या मागचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस तपास सुरू आहे.
सांगली : कुपवाडमधील 17 वर्षीय मुलीने आई वडिलांसमोरच कॉलेजच्या इमारतीवरुनच उडी मारली आणि मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेवेळी
मुलीचे आई वडील देखील कॉलेज कॅम्पसमध्ये होते.सांगलीच्या कुपवाडमधील (Sangli Kupwad) नामांकित इंटरनॅशनल शैक्षणिक संकुल मध्ये ही घटना घडली.
कॉलेज सुटताना आई वडील कॉलेजमध्ये आलेले पाहून मुलीने पुन्हा कॉलेजच्या दुसऱ्या मजल्यावर जात उडी मारली होती.या मृत्यूची कुपवाड पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. या घटनेचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस तपास सुरू आहे.
उपचारादरम्यान मृत्यू
कुपवाड हद्दीतील कॉलेज इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून एका अल्पवयीन विद्यार्थिनीने उडी घेतल्याची मंगळवारी संध्याकाळी घडली. साक्षी रवींद्र जाधव (रा.मिरज) असे तिचे तिचे नाव आहे. घटनेनंतर तिला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे.
शरीराला इजा झाल्याने तेथून त्या मुलीला तशा जखमी अवस्थेत जवळच्याच एका रुग्णालयात उपचारासाठी नेले. अतिदक्षता विभागात तिच्यावरत उपचार सुरू होते. घडलेल्या घटनेचे कारण अस्पष्ट आहे. याची माहिती मंगळवारी रात्री उशिरा कुपवाड ठाण्यास प्राप्त झाली.
स्कूल बॅग गाडीत ठेवली आणि उडी मारली
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली आणि पोलिसांनी दिलेली माहिती अशी की , सदर विद्यार्थिनी ही अल्पवयीन आहे. कुपवाड हद्दीतील बामणोलीतील झिल इंटरनॅशनल स्कूल व कॉलेजमध्ये सध्या ती महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. मंगळवारी सायंकाळी 5 वाजता शाळा सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी ती शाळेबाहेर आली. तिने आपली स्कूलबॅग ही शाळेच्या बसमध्ये ठेवली.
अंदाजे पावनेपाच वाजता तिचे पालकही शाळेमध्ये आले होते. ते कॅपसमध्ये हजर होते. आपली स्कूल बॅग बसमध्ये ठेवून विद्यार्थिनी पुन्हा शाळेच्या दिशेने पळाली. दुसऱ्या मजल्यावर जात अंदाजित चाळीस ते पंचेचाळीस फूटाच्या अंतरावरून तिने जमिनीच्या दिशेने उडी घेतली. घटनेनंतर शाळा प्रशासन अधिकारी आणि पालकांनी तिला उपचारासाठी एका स्थानिक खासगी रुग्णालयात दाखल केले.
परिस्थिती पाहता डॉक्टरांनी दुसरीकडे तात्काळ उपचारासाठी नेण्याचा सल्ला दिला. त्यानंतर जवळच्याच दुसऱ्या एका खासगी रुग्णालयात तात्काळ नेण्यात आले. तेथे अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले. घडलेल्या घटनेचे कारण अस्पष्ट आहे. याबाबतची माहिती मंगळवारी रात्री उशिरा कुपवाड ठाण्यास प्राप्त झाली.
ही बातमी वाचा: