मंगळसूत्रानं कसं उलगडलं मारेकरी सोनमचं रहस्य? मेघालय पोलिसांनी सांगितले राजा रघुवंशी हत्या प्रकरणातील अनेक मोठे खुलासे
Raja Raghuvanshi Murder Case:राजा रघुवंशी हत्या प्रकरणात सोनमच्या मंगळसूत्राने खूप महत्त्वाची भूमिका बजावली होती. मेघालय पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे.

Raja Raghuvanshi Murder Case: राजा रघुवंशी हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना शिलाँग न्यायालयात हजर करण्यात आले. यानंतर, सोनम रघुवंशी आणि इतर चार आरोपींना शिलाँग सदर पोलिस स्टेशनच्या वेगवेगळ्या कोठडीत ठेवण्यात आले. राजा हत्याकांडात अनेक महत्त्वाचे खुलासे झाले आहेत. दरम्यान, मेघालय पोलिसांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. सोनमच्या मंगळसूत्रामुळे या हत्याकांडाची उकल कशी झाली हे पोलिसांनी सांगितले. मेघालय पोलिसांचे डीआयजी डीएनआर मार्क यांनी सोनमच्या मंगळसूत्राबद्दल महत्त्वाची माहिती दिली.
त्यांनी सांगितले की सोनमने तिचे मंगळसूत्र हॉटेलमध्ये सोडले होते. एक वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, डीआयजी म्हणाले, "होमस्टेच्या खोलीत ठेवलेल्या सुटकेसमध्ये अंगठी आणि मंगळसूत्र सापडले. यामुळे आम्हाला संशय आला. नवविवाहित महिलेने मधुचंद्राच्या वेळी तिचे मंगळसूत्र का काढले?" सोनमचे कथित प्रेमी राज कुशवाह आणि आकाश राजपूत यांना सदर पोलिस ठाण्याच्या एका कोठडीत ठेवण्यात आले आहे, तर विशाल सिंग चौहान आणि आनंद सिंग कुर्मी यांना दुसऱ्या कोठडीत ठेवण्यात आले आहे. पोलिसांनी सोनमला जेवण दिले आणि तिने ते खाल्लेही. न्यायालयात हजर होण्यापूर्वी आणि नंतर ती खूप शांत दिसत होती. आरोपींच्या वर्तनावर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांनी सदर पोलिस स्टेशन आणि सर्व कक्षात अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत.
पाचही आरोपी पोलिस कोठडीत
सोनम रघुवंशीवर तिच्या पतीच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. तिने तिचा प्रियकर राज कुशवाहासोबत मिळून तिचा पती राजा रघुवंशीच्या हत्येचा कट रचला आणि नंतर मेघालयातील शिलाँगमध्ये त्याला मारण्यासाठी तीन कॉन्ट्रॅक्ट किलरना कामावर ठेवले. सोनमने हा संपूर्ण प्लॅन तिच्या पती राजासोबत हनिमूनसाठी शिलाँगला गेल्यावर बनवला होता. पाचही आरोपी आता मेघालय पोलिसांच्या ताब्यात आहेत. दरम्यान, मेघालय पोलिसांनी सोनमचे कॉल रेकॉर्ड्स तपासले असून ती आरोपींसोबत बोलत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे पोलिसांचा संशय अधिक गडद झाला आणि त्यांनी सोनमवर विशेष लक्ष ठेवायला सुरुवात केली आहे.
प्रियकर राज कुशवाहासोबत मिळून राजा रघुवंशीच्या हत्येची योजना
खरं तर सोनम लग्नानंतर चार दिवसांतच सासरहून माहेरी परत गेली होती. तिथे जाऊन तिने तिचा प्रियकर राज कुशवाहासोबत मिळून राजा रघुवंशीच्या हत्येची योजना आखायला सुरुवात केली. अचानक शिलाँगचं तिकीट काढून तिने राजाला हनिमूनसाठी तयार केलं. त्याचवेळी तिने राज कुशवाहासोबत मिळून तीन जनांना 14 लाख रुपयांची सुपारी दिली. जर राजाची हत्या केली तर १४ लाख रुपये देईल. त्यासोबतच जर पकडले नाही गेलात, तर भावाच्या कंपनीत नोकरीला लावू, असं त्यांना सांगितलं गेलं.
इतर महत्वाच्या बातम्या
























