Pune Crime Deepak Mankar: शंतनू कुकडेसोबतचे आर्थिक व्यवहार लपवण्याचा प्रयत्न, दीपक मानकर पोलिसांनाच खोटी कागदपत्रं दाखवून गंडवायला गेले पण...
Pune Crime news: काही महिलांच्या बँक खात्यात कुकडेकडून पाच ते साडेसात लाख रूपये पाठवले असल्याचे पोलिस तपासात उघड झाले होते. दीपक मानकर आणि त्यांच्या मुलाच्या खात्यातही पैसे

Pune Crime news: अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दिपक मानकर यांच्यावर बनावट कागदपत्रे सादर करुन पोलीसांची दिशाभूल केल्याबद्दल गुन्हा (Pune Crime) दाखल करण्यात आला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्यांक विभागाचे राज्य उपाध्यक्ष असलेल्या शंतनू कुकडेला (Shantanu Kukde) पुणे पोलीसांनी काही महिलांच्या तक्रारीनंतर बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आली होती. या प्रकरणात अनेकांचा सहभाग आढळून आल्याने पोलीसांनी शंतनू कुकडे याच्या बँक खात्यांची पडताळणी केली. त्यावेळी शंतनू कुकडे आणि दिपक मानकर (Deepak Mankar) यांच्यात एक कोटी रुपयांची देवाणघेवाण झाल्याचे आढळून आले होते.
पोलिसांनी याबाबत दिपक मानकर यांना चौकशीला बोलावलं असता त्यांनी शंतनू कुकडे सोबत कोणतेही आर्थिक व्यवहार नसल्याचा दावा करत काही कागदपत्रे पोलीसांसमोर सादर केली. पोलीसांनी दिपक मानकरने सादर केलेल्या कागदपत्रांची सत्यता तपासली असता ती कागदपत्रे बनावट असल्याचे आढळून आले. त्यानंतर दिपक मानकरच्या विरोधात बनावट कागदपत्रे सादर करुन पोलीसांची फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिपक मानकर हे पुण्याचे उपमहापौर राहिले असले तरी नेहमीच वादग्रस्त ठरलेत. याआधी अनेक प्रकरणांमध्ये अटक झाल्याने त्यांना तुरुंगवारी घडली आहे.
आता दीपक मानकर यांच्या विरोधात समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपुर्वी वादग्रस्त शंतनू कुकडे प्रकरणात देखील दीपक मानकर यांची चौकशी झाली होती . आता बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने जमीन व्यवहार केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजित पवार पुण्याचे पालकमंत्री असताना त्यांच्या पक्षाच्या शहराध्यक्षावर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
पुण्यात काही दिवसांपूर्वी एका परदेशी महिलेवरती लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी शंतनू कुकडे याला अटक करण्यात आली होती. तपासादरम्यान शंतनू कुकडे याच्या बँक खात्यावरुन कोट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार झाल्याचे निदर्शनास आले होते. आरोपी शंतनू कुकडेचा जवळचा सीए रौनक जैन याच्या बँक खात्यामधून मानकर पिता-पुत्राच्या बँक खात्यामध्ये पावणेदोन कोटी रुपये आल्याची माहिती आहे. दरम्यान, पोलिस तपासात कुकडेच्या बँक खात्यात 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम पोलिसांना आढळून आली . त्यातील 40 ते 50 कोटी रुपये काहीच्या बँक खात्यावर पाठवण्यात आल्याचे निदर्शनास आले होते.
मात्र, दीपक मानकर यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. रौनक जैन याच्या बँक खात्यातून आमच्या बँक खात्यात पैसे आले आहेत. आमचा एका जमिनीचा व्यवहार आहे. तो रौनक याच्या सोबत झाला. त्याची कायदेशीर इसार पावती देखील झालेली आहे. शंतनू कुकडे याचे वैयक्तिक जीवन आणि त्याचे आर्थिक व्यवहार याच्याशी आमचा काहीही संबंध नाही, असे दीपक मानकर यांनी म्हटले होते.
शरद पवार आणि अजितदादा मुंबईत एकाच व्यासपीठावर
शरद पवार यांनी राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या केलेल्या विधाननंतर आज दोन्ही पवार एकाच मंचावर पाहायला मिळणार आहेत. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित असतील. राज्य सहकारी बँकेने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित केलेल्या सहकाराचे सक्षमीकरण आणि आणि राज्य शासनाचे धोरण या विषयवावरील परिसंवाद कार्यक्रमाला पवार शरद पवार आणि अजित पवार उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली हा परिसंवाद पार पडणार आहे. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार या कार्यक्रमाला हजर असतील.
आणखी वाचा




















