Pune Crime: पुण्यातील कात्रज घाटात पुन्हा गोळीबाराचा थरार! हल्ल्यात वॉर्डबॉय जखमी, आरोपी फरार
Pune Crime News : राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाल्याचे बोललं जात असताना पुण्यात पुन्हा गोळीबाराची घटना घडली आहे. पुण्यातील कात्रज घाटात गोळीबाराची घटना घडली आहे.
पुणे: राज्यातील वाढती गुन्हेगारी आणि हत्येच्या घटनेने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाल्याचे बोललं जात असताना पुण्यात पुन्हा गोळीबाराची घटना घडली आहे. पुण्यातील कात्रज घाटात गोळीबाराची घटना घडली आहे. यात कात्रज घाटामध्ये दोघांकडून फायरिंग करण्यात आली आहे. पुढे आलेल्या माहितीनुसार दीपक लोकर या एका हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या वॉर्डबॉयवर ही फायरिंग करण्यात आली आहे. या गोळीबारच्या घटनेमध्ये दीपक लोकर हा जखमी झाला आहे. काल रात्रीच्या सुमारास दीपक लोकर याला एका अज्ञाताने कात्रज घाटात नेत फायरींग केली आहे. यात दीपक यांच्या छातीमध्ये ही गोळी अडकली असून घटना स्थळावरती पिस्टल पोलिसांना मिळाली आहे. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत असून या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
वाल्मिक कराड पुण्यात CID ला शरण येणार?
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड हे फरार आहेत. ते सोमवारी संध्याकाळी किंवा मंगळवारी सकाळपर्यंत पोलिसांना शरण येतील, अशी चर्चा होती. मात्र, अद्याप वाल्मिक कराड पोलिसांना शरण आलेले नाहीत. मात्र, आता पुण्यातील सीआयडी मुख्यालयाबाहेरील हालचालींना वेग आल्याने वाल्मिक कराड सीआयडीसमोर शरणागती पत्कारण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यानंतर आता पुण्यातील सीआयडी मुख्यालयाबाहेर बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. स्थानिक पोलीसांची मदत मुख्यालयासमोर बंदोबस्तासाठी घेण्यात आली आहे. दरम्यान वाल्मिक कराड हा खंडणी प्रकरणातील आरोपी असला तरी केज पोलीस ठाण्यात दाखल असलेले तिन्ही गुण्याचा तपास सीआयडी करत आहे, त्यामुळे तो सीआयडी कडे समर्पण करत आहे, अशी माहिती समोर आली आहे.
वाल्मिक कराड यांचे शेवटचे मोबाईल लोकेशन मध्य प्रदेशात दिसून आले होते. वाल्मिक कराड हे उज्जैन येथील महाकाल मंदिर आणि मध्य प्रदेशातील पेच अभायारण्यात काही काळ मुक्कामाला असल्याची माहितीही समोर आली होती. मात्र, आता वाल्मिक कराड पोलिसांना शरण येतात का, हे पाहावे लागेल. सीआयडी कार्यालयात पुणे पोलीस दलातील पोलीस उपायुक्त सौदीपसींग गील आणि गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखील पिंगळे दाखल. वाल्मीक कराड सी आय डी ला शरण आल्यास त्यांच्या समर्थकांची गर्दी होऊ शकते हे लक्षात घेऊन पुणे पोलीसांकडून सी आय डी कार्यालयाबाहेर बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या