![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Pune Crime : सोशल मीडियावर मुलीच्या नावे महिनाभर चॅट, मग भेटायला बोलावून कोयत्याने सपासप वार, पुण्यातील थरार
Pune Crime News: पुण्यात आज आणखी एका तरुणावर कोयत्याने हल्ला केल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळे पुण्याची ओळख आता गुन्हेगारांचा अड्डा बनत चालली आहे का? प्रश्न या निमित्याने विचारले जाऊ लागलाय.
![Pune Crime : सोशल मीडियावर मुलीच्या नावे महिनाभर चॅट, मग भेटायला बोलावून कोयत्याने सपासप वार, पुण्यातील थरार pune crime news fatally attacked on Young man in sinhagad road incident capture in cctv camera video viral Maharashtra marathi news Pune Crime : सोशल मीडियावर मुलीच्या नावे महिनाभर चॅट, मग भेटायला बोलावून कोयत्याने सपासप वार, पुण्यातील थरार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/04/3121abe8c9d1514b89be765a6f1a47c51725436263824892_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Pune Crime पुणे: पुण्यात दोन दिवसांपुर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर सासवड रस्त्यावर हडपसर भागामध्ये अगदी क्षुल्लक कारणास्तव म्हणजे हॉटस्पॉट न दिल्याने एका व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्या पाठोपाठ काल (मंगळवारी) रात्रीच्या सुमारास गुलटेकडी परिसरात जुन्या वादातून एका तरुणाची हत्या (Pune Crime News) करण्यात आल्याची धक्कादायक घटना ताजी असतानाच पुण्यातून आज आणखी एका तरुणावर कोयत्याने हल्ला केल्याची खळबळजनक बातमी समोर आली आहे.
त्यामुळे विद्येचे माहेरघर असलेली पुण्याची ओळख आता गुन्हेगारांचा अड्डा बनत चालली आहे का? की पुण्यात पोलीस आणि कायदा सुव्यवस्थेचा धाकच या गुन्हेगारांमध्ये उरला नाहीये का? असे एक ना अनेक प्रश्न या निमित्याने विचारले जाऊ लागले आहे.
सोशल मीडियावर मुलीच्या नावे महिनाभर चॅट
पुण्यात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढल्याचं चित्र दिसून येत आहे. पुणे शहर परिसरात रोज खुन, हत्या, बलात्काराच्या (Pune Crime News) घटना उघडकीस येत असतानाच पुण्यातील सिंहगड रस्त्यावर सकाळी कोयत्याने तरुणावर हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या घटनेचा थरारक व्हिडिओ समोर आला असून हा हल्ला पूर्ववैमान्यासातून हा हल्ला करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे.
सागर चव्हाण असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. मे महिन्यात पुण्यातील डहाणूकर कॉलनी परिसरात एकमेकांकडे बघितल्याच्या किरकोळ वादातून हे भांडण झाले होते. त्याचवेळी एका तरुणावर कोयत्याने वार करण्यात आला होता. दरम्यान, या हल्ल्यात श्रीनिवास वतसलवार नामक एका तरुणाचा त्यात मृत्यू देखील झाला होता. ज्या तरुणांनी श्रीनिवास वर हल्ला केला त्यापैकी सागर चव्हाण हा एक होता.
कट करण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी अनोखा मास्टर प्लॅन
मिळालेल्या माहितीनुसार, आज पुण्यातील किरकटवाडी भागात सागर चव्हाण याला एका मित्राने बोलवून घेतलेले असताना त्याच्यावरच हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये सागर चव्हाण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर आता रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर जखमी सागर चव्हाण याला मारण्यासाठी आरोपींनी एक अनोखा मास्टर प्लॅन तयार केला होता. यात गेल्या दोन महिन्यांपूर्वी आरोपींनी सोशल मीडियावर एका मुलीच्या नावाने अकाउंट तयार केलं होतं. या अकाउंटवरून सागरला अनेक मेसेज देखील करण्यात आले होते.
आपल्याशी रोज बोलत असल्यामुळे सागर या अकाउंटच्या प्रेमात पडला होता. मात्र, हे अकाउंट आरोपी चालवत असल्याची कुठलीही कुणकुण त्याला लागली नव्हती. महिनाभर चॅटींग केल्यानंतर आज आपण भेटू असं सागरला सांगण्यात आलं. आज सकाळी सागर याला भेटायला बोलावले आणि त्याच्यावर हा जीवघेणा हल्ला करण्यात आला असल्याची माहिती पुढे आली आहे.
हे ही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)