![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Pune Crime : कात्रजमध्ये हत्या करुन मृतदेह लोखंडी पाईपला लटकावला
पुण्यातील कात्रज परिसरात एका व्यक्तीची हत्या करुन मृतदेह लोखंडी पाईपला लटकावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
![Pune Crime : कात्रजमध्ये हत्या करुन मृतदेह लोखंडी पाईपला लटकावला Pune Crime news 42 years old man killed and hanged from iron pipe to pass it off as suicide in Katraj Pune Crime : कात्रजमध्ये हत्या करुन मृतदेह लोखंडी पाईपला लटकावला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/04/f9f2cc1762d53994a27830cdc78fda1a_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : पुण्यात खून, अत्याचार आणि हाणामाऱ्यांच्या घटनांमध्ये काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. कात्रज परिसरात एका व्यक्तीची हत्या करुन मृतदेह लोखंडी पाईपला लटकावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रकाश किसन जाधव असं (वय 42 वर्षे) खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. कात्रज इथल्या सुंधामातानगर परिसरात शुक्रवारी (1 एप्रिल) संध्याकाळच्या सुमारास ही घटना समोर आली.
लक्ष्मी माता मंदिराजवळ 1 एप्रिल रोजी संध्याकाळी पाचच्या सुमारास मृतदेह सापडला. त्यानंतर मृतदेहाची ओळख पटवण्यात आली. प्रकाश जाधव असं मृत व्यक्तीचं नाव असल्याचं समोर आलं. यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. प्रथमदर्शनी ही आत्महत्या असावी असा अंदाज वर्तवण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह खाली काढून पोस्टमॉर्टमसाठी ससून रुग्णालयात पाठवला. शवविच्छेदन अहवालात संबंधित व्यक्तीचा गळा दाबल्याने आणि डोक्यात मारहाण झाल्याने मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं.
सुरुवातील ही आत्महत्या असावी अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली होती. परंतु शवविच्छेदन अहवालात प्रकाश जाधव यांची हत्या केल्याचं उघड झालं आहे. घरात प्रॉपर्टीवरुन वाद सुरु होता. त्या वादातूनच प्रकाश जाधव यांची हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. प्रकाश किसन जाधव हे मजूर होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं आणि इतर नातेवाईक असा परिवार आहे.
दरम्यान भारती विद्यापीठ पोलिसांनी याप्रकरणी अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा नोंदवला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.
आयटी हब हिंजवडीलगत झाडावर महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ
काही दिवसांपूर्वी पुण्यातील आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीत झाडावर महिलेचा मृतदेह आढळला होता. मुळा नदी पात्रात वाढलेल्या उंबराच्या झाडाला हा मृतदेह लटकलेला होता. हिंजवडी आणि माण गावापासून साधारण तीन किलोमीटर अंतरावर, झाडाझुडपात हा मृतदेह आढळला होता. पाहताच क्षणी ही आत्महत्या असावी असा अंदाज पोलिसांना बांधला. त्याअनुषंगाने पोलिसांनी पुरावे शोधण्यास सुरुवात केली. पण हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता, चार ते पाच महिन्यांपासून तो फांदीला लटकत असावा, शिवाय ही आत्महत्या नाही या निष्कर्षापर्यंत पोलीस 30 मार्च रोजी संध्याकाळी पोहोचले. मग ही हत्या असावी असा अंदाज बांधून पोलिसांनी तपासाची चक्र हलवली आहेत. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने आधी ओळख पटवणं गरजेचं आहे, तेव्हा सगळ्या प्रश्नांचा उलगडा होणार आहे.
हे ही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)