एक्स्प्लोर

Pune Crime : हिंजवडीत महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह झाडावर लटकलेला आढळला

पुण्यातील हिंजवडीत महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह माण गावाजवळ आढळला. मुळा नदी लगतच्या झाडावर हा मृतदेह लटकत होता.

पुणे : पुण्यातील आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीत झाडावर महिलेचा मृतदेह बुधवारी (30 मार्च) दुपारी आढळला. यामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. मुळा नदी पात्रात वाढलेल्या उंबराच्या झाडाला हा मृतदेह लटकलेला आहे. ही महिला इथे कशी पोहोचली, तिने आत्महत्या केली की तिची हत्या झाली? यासह अनेक प्रश्न पिंपरी चिंचवड पोलिसांसमोर उभे राहिले. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने आधी ओळख पटवणं गरजेचं आहे, तेव्हा सगळ्या प्रश्नांचा उलगडा होणार आहे.

आयटी हब हिंजवडी आणि त्यालगतच्या माण गावातून मुळा नदी वाहते. या मुळा नदी पात्रात उंबराचे झाड वाढलेलं आहे. याच उंबराच्या फांदीला हा महिलेचा मृतदेह एकाच्या नजरेस पडला. त्या व्यक्तीने हिंजवडी पोलिसांना कळवलं, तातडीने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हिंजवडी आणि माण गावापासून साधारण तीन किलोमीटर अंतरावर, झाडाझुडपात हा मृतदेह आढळला होता. पाहताच क्षणी ही आत्महत्या असावी असा अंदाज पोलिसांना बांधला. त्या अनुषंगाने पोलिसांनी पुरावे शोधण्यास सुरुवात केली. पण हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता, चार ते पाच महिन्यांपासून तो फांदीला लटकत असावा, शिवाय ही आत्महत्या नाही या निष्कर्षापर्यंत बुधवारी सायंकाळी पोलीस पोहोचले. मग ही हत्या असावी असा अंदाज बांधून पोलिसांनी तपासाची चक्र हलवली आहेत. मृतदेहाची अवस्था पाहता केवळ हाडं आणि महिलेचा गाऊन शिल्लक राहिला आहे. त्यामुळे मृतदेह हलवणे तपासाच्या दृष्टीने अडचणीचं ठरेल. आधी शवविच्छेदन करणं गरजेचं. मात्र रात्र झाल्याने गुरुवारी (31 मार्च) सकाळी जागीच शवविच्छेदन करण्याचं ठरलं आहे. यासाठी हिंजवडी पोलिसांचे कर्मचारी रात्रभर मृतदेह लटकत असलेल्या उंबराच्या झाडाजवळ तैनात होते. आता काही वेळात शवविच्छेदन करण्यासाठी डॉक्टरांचं पथक घटनास्थळी दाखल होणार आहे. नदीच्या प्रवाहावरच हा मृतदेह असल्याने अग्निशमन दलाची मदत ही घेतली जाणार आहे. 

मृतावस्थेत आढळलेली ही महिला कोण आहे? ती इथे कशी काय पोहोचली? तिची हत्या झाली आहे का? झाली असेल तर मारेकरी कोण आहेत? या सर्व प्रश्नांचा छडा हिंजवडी पोलिसांना लावायचा आहे. हत्या करुन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने हा मृतदेह मुळा नदी पात्रातील झाडावर लटकवून ठेवले, असा गुन्हा अज्ञात व्यक्तीविरोधात हिंजवडी पोलिसांनी दाखल केला आहे.

हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक (SPI) बाळकृष्ण सावंत यांच्या माहितीनुसार, "माण गावाच्या डोंगराळ भागात सहसा कोणीही फिरकत नाही. मात्र, बुधवारी तरुणांच्या टोळक्याने या ठिकाणी येऊन झाडावर मृतदेह पाहिला. त्यांनी ही माहिती पोलिसांनी दिली." ते पुढे म्हणाले की, "आम्हाला महिलेचं वय, नाव किंवा इतर कोणतीही माहिती अद्याप समजू शकलेली नाही. ही हत्या आहे की आत्महत्या हे देखील अजून स्पष्ट झालेलं नाही." 

संबंधित बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Kolhapur News : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
कोल्हापूर : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Bangar on Vidhan Sabha : 25 हजारांच्या फरकाने सीट निघेल, मतदानानंतर संतोष बांगर निवांतRajesaheb Deshmukh : धनंजय मुंडे यांच्या गुंडानी मतदानाच्या मशीन फोडल्य,देशमुखांचा हल्लाबोलSolapur Sharad Koli Crime : प्रणिती शिंदेंविरोधात आंदोलन करणाऱ्या कोळींविरोधात गुन्हा दाखलAvinash Jadhav Misal Pav : मतदानानंतर निवांत,अविनाश जाधवांनी लुटला मामलेदार मिसळीचा आस्वाद...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Kolhapur News : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
कोल्हापूर : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
Bharat Gogawale : मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
SSC & HSC Board Exam Time Table 2025 : मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-भाजपमधून आलेल्या नेत्यांवर मोठी जबाबदारी
सर्वांचं लक्ष महाराष्ट्राकडे लागलेलं असताना नवी दिल्लीत अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-आपमधून आलेल्या नेत्यांना संधी
मी 25 ते 30 मतदारसंघात फोन केले, फडणवीसांनी सांगितलं; वाढलेली टक्केवारी अन् लाडकी बहीणचा फायदा कोणाला
मी 25 ते 30 मतदारसंघात फोन केले, फडणवीसांनी सांगितलं; वाढलेली टक्केवारी अन् लाडकी बहीणचा फायदा कोणाला
Embed widget