Mumbai Speed Boat : रेस्क्यू ऑपरेशन संपलं, तीन बेपत्ता प्रवाशांचा युद्धपातळीवर शोध सुरु
Mumbai Speed Boat : रेस्क्यू ऑपरेशन संपलं, तीन बेपत्ता प्रवाशांचा युद्धपातळीवर शोध सुरु
मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळ (Gateway Of India Boat Accident) एलिफंटाला जाणारी एक प्रवासी बोट बुडाल्याची धक्कादायक घटना घटना घडली. या घटनेमध्ये तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे. या बोटीमध्ये एकूण 80 प्रवासी होते. त्यापैकी 77 प्रवाश्यांना वाचवण्यात यश आलं आहे. एका स्पीड बोटने या प्रवासी बोटीला धडक दिली आणि हा अपघात झाला आहे. नेमकं त्याक्षणी काय घडलं? बोट नेमकी कशी बुडाली? याबद्दल एका प्रत्यक्षदर्शीने एबीपी माझाला सांगितलं आहे. या बोटीमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. सध्या या घटनास्थळावरचं संपूर्ण बचावकार्य पूर्ण झालयं. पण अनेक गोष्टींचा उलगडा प्रत्यक्षदर्शीने एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. या बोटीमध्ये अनेक लहान लहान मुलं होती, बोटीत पाणी आलं तेव्हा आम्हाला लाईव्ह जॅकेट देण्यात आलं, असं सगळं या प्रत्यक्षदर्शीने सांगितलं आहे. 'मी 15 मिनिटं पोहोत होतो' एबीपी माझासोबत बोलताना त्या प्रत्यक्षदर्शीने म्हटलं की, 'मी गेटवे ऑफ इंडियावरुन 3.30 वाजता ही बोट पकडली. जवळपास आम्ही 10 किलोमीटरचा प्रवास केला होता. तेवढ्यात ती स्पीड बोट आली आणि आमच्या बोटीला धडक दिली. तेवढ्यात आम्हाला ड्रायव्हरनेही लाईव्ह जॅकेट घालायला सांगितलं. मी बोटीच्या वर होतो, खाली येऊन लाईव्ह जॅकेट घालेपर्यंत संपूर्ण बोटीमध्ये पाणी आलं. बोट उलटली होती. मी पुन्हा बोटीच्या वर गेलो. जवळपास 15 मिनिटं पोहत होतो. तोपर्यंत दुसरी बोट आली आणि त्या बोटीने मला वाचवलं.'