Pune Crime : पुरंदरमधील रावडेवाडीत दोन गटात तुफान राडा, एकाचा खून तर तीन जण जखमी
Pune Crime : पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यातील रावडेवाडी इथे दोन गटात तुफान वाद झाला. धक्कादायक बाब म्हणजे या वादातून एकाचा खून करण्यात आला.
पुणे : पुणे (Pune) जिल्ह्याच्या पुरंदर (Purandar) तालुक्यातील रावडेवाडी इथे दोन गटात तुफान वाद झाला. धक्कादायक बाब म्हणजे या वादातून एकाचा खून (Murder) करण्यात आला. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतलं आहे.
वादाचं कारण अस्पष्ट
हा वाद नेमका काय आणि कशावरुन झाल याचे कारण अस्पष्ट आहे. पण या वादात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. या भांडणात सचिन दिलीप रावडे या 32 वर्षीय तरुणाचा जागेवर मृत्यू झाला. तर यश राजेंद्र रावडे, तानाजी निवृत्ती रावडे आणि ओमकार रावडे हे तिघे जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
आरोपींना पकडण्यासाठी पोलीस पथक रवाना
या प्रकरणी तीन जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. तर इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने विविध ठिकाणी आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आले आहेत. दोन गटात वाद का झाला याचे कारण अस्पष्ट आहे. हत्येचं कारण अद्यापही कळून आले नसून यासंदर्भात सासवड पोलीस अधिकचा तपास करत आहेत.
पुण्यात विसर्जन मिरवणुकीदरम्यान दोन गटात राडा
दुसरीकडे पुण्यात गणपती मिरवणुकीदरम्यान दोन गटात राडा झाल्याची घटना घडली. यावेळी झालेल्या दगडफेकीत महिला आणि मुलं जखमी झाले आहेत. पुण्यातील सहकारनगर इथल्या तळजाईमध्ये दोन गटात वाद झाला. यानंतर दोन्ही गटाकडून एकमेकांवर तुफान दगडफेक करण्यात आली, ज्यात काही महिला आणि मुलं जखमी झाले आहेत.
सांगलीतील इस्लामपुरात दोन गटात तुंबळ हाणामारी, 22 जण जखमी
तर सांगलीमधील इस्लामपूर शहरातील (Islampur) माकडवाले गल्लीतील दोन गटात जुन्या भांडणाच्या रागातून तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये दोन्ही गटांतील 22 जण जखमी झाले. या हाणामारीत लोखंडी गज, झांज पथकातील टाळ, काठ्या, दगड आणि विटांचा वापर करण्यात आला. परस्परांच्या घरांची नासधूस करण्यात आली. या हाणामारीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. दोन्ही गटांनी पोलिसांत परस्परविरोधी फिर्यादी दिल्या आहेत. विनोद वसंत पवार (वय 34, माकडवाले गल्ली) आणि दशरथ राजू पवार (वय 34, माकडवाले गल्ली) अशा दोघांनी फिर्यादी दिल्या आहेत. दोन्ही गटांच्या 76 जणांविरुद्ध गंभीर दुखापतीसह एकमेकांच्या घरावर चाल करुन जात नासधूस करणे आणि बेकायदा जमाव जमवून गर्दी मारामारी केल्याचे गुन्हे पोलिसांनी नोंद केले आहेत.
हेही वाचा
धक्कादायक! पोटच्या गोळ्याला संपवण्यासाठी बापानं दिली 70 हजारांची सुपारी, तिघांनी मिळून काटा काढला!