एक्स्प्लोर

Pune News : घर देण्याच्या नावाखाली राज्यातील सात हजार पोलिसांची शेकडो कोटी रुपयांची फसवणूक

Police Mega City Project : राज्यातील सात हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची घर देण्याच्या नावाखाली शेकडो कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे.

Pune News : राज्यातील सात हजार पोलीस (Pune Police) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची घर देण्याच्या नावाखाली शेकडो कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे. 2009 साली सत्यपाल सिंग पुण्याचे पोलीस आयुक्त असताना राज्यातील पोलीस अधिकारी आणि कुटुंबांना पुण्याजवळ माफक दरात फ्लॅट देण्यासाठी तब्ब्ल 117 एकरांमध्ये 'पोलीस मेगा सिटी' (Police Mega City) उभारण्याची घोषणा करण्यात आली. राज्यभरातील पोलिसांनी त्यामध्ये पैसे गुंतवावेत यासाठी तसे सर्क्युलर काढण्यात आले. मात्र सात हजार पोलिसांनी आयुष्यभराची कमाई गुंतवलेल्या या प्रकल्पाची अवस्था भयाण झाली आहे. अर्धवट बांधलेल्या मोजक्या इमारती मोडकळीस आल्यात तर बांधकाम साहित्याला गंज लागला आहे. 

घर देण्याच्या नावाखाली पोलिसांनाच गंडा

तत्कालीन पुणे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांच्या आदेशाने सर्क्युलर काढण्यात आल्याने राज्यभरातील पोलिसांनी विश्वास ठेऊन पोलीस मेगा सिटीसाठी पैसे द्यायचं ठरवलं. बांधकाम क्षेत्राचा कोणताही अनुभव नसलेल्या बी. ई. बिलिमोरिया कंपनीला हा अवाढव्य प्रकल्प उभारण्याचं काम देण्यात आलं. मात्र प्रत्यक्षात या कंपनीकडे कोणतंही भांडवल नव्हतं. पोलिसांच्याच पैशातून ही 117 एकर जागा कंपनीच्या नावावर विकत घेण्यात आली होती. 

राज्यातील सात हजार पोलिसांची फसवणूक

या 117 एकरांमध्ये बारा मजल्यांच्या 60 इमारती उभारण्यात येतील आणि त्यातून सात हजार पोलिसांना घरे देण्यात येतील, असं चित्रं रंगवण्यात आलं होतं. त्यामुळं आय. पी. एस. दर्जाच्या अधिकाऱ्यांपासून ते पोलीस कॉन्स्टेबलपर्यंत सर्वांनी यात पैसे गुंतवले. पोलीस कर्मचारी असलेल्या राहुल पाटील यांच्या वाडिलांनी देखील इथे असेच दोन मुलांसाठी दोन फ्लॅट घेण्यासाठी तीस लाख रुपये गुंतवले. त्यासाठी कर्ज काढलं. मात्र आता बॅंँकचे हप्ते आणि  घरभाडं असा दुहेरी बोजा त्यांच्यावर पडत आहे. 

शेकडो कोटींची घोटाळा

ज्या बिल्डरला हा मेगा प्रकल्प उभारण्याचं काम देण्यात आलं त्यानं काही मोजक्या इमारती उभारल्या आणि त्याबदल्यात तो आणखी पोलीस कर्मचाऱ्यांकडून पैसे घेत गेला. 250 कोटी रुपयांहून अधिक रक्कम या बिल्डरने पोलिसांकडून गोळा केली. मात्र, स्वतःच भांडवल काहीच नसल्यानं हळूहळू हा प्रकल्प रखडायला लागला. बांधकामासाठी इथं आणण्यात आलेल्या यंत्राला गंज चढला आहे. या अवाढ्यव्य प्रकल्पासाठी लागणारं बांधकाम साहित्य तयार करण्यासाठी इथं उभारण्यात आलेला भला मोठा कारखानाही पुढे बंद पडला. आज इथल्या सगळ्या वस्तूंना गंज चढलाय . 

या बिल्डरला पोलीस दलातील वरिष्ठांच्या पाठींब्यानेच एवढा मोठा प्रकल्प उभारण्याचं कंत्राट देण्यात आलं होतं आणि वरिष्ठांच्या आशीर्वादाचे फसवणुकीचा हा प्रकार पुढं सुरु राहिला. इथं प्रकल्प पाहण्यासाठी आणि त्यामध्ये घर बुक करण्यासाठी येणाऱ्यांना या बिल्डरकडून या भव्य प्रकल्पाचं प्रारुप दाखवण्यात येत होतं. प्रकल्पच्या सुरुवातीलाच मांडलेलं हे चकचकीत प्रारूप इथं येणाऱ्या प्रत्येकाला भुरळ घालत होतं. मात्र, सात हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची अडीचशे कोटी रुपयांची फसवणूक होऊनही बी. इ. बिलिमोरिया कंपनीचा मालक आणि त्याला पाठीशी घालणारे पोलीस खात्यातील वरिष्ठ मोकाट आहेत. इतरांच्या अन्यायाविरोधात उभे टाकणारे हा पोलीस त्यांची आयुष्यभराची कमाई अशी मातीमोल असताना असहाय्यपणे बघण्याशिवाय दुसरं काहीही करू शकत नाही आहेत.

हेही वाचा-

Pune News : राज्यात लवकरच पालकमंत्र्यांच्या जिल्ह्यांची आदला बदल होणार? अजित पवार पुण्याचे पालकमंत्री होणार?; सुत्रांची माहिती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde Nanded Speech : एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो..नांदेडच्या सभेत शिंदेंचं तुफान भाषण1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
Embed widget