पॅन-आधार कार्ड कुठेही देताय तर सावधान! परभणीतील व्यावसायिकाचं पॅनकार्ड वापरून 78 कोटींचे व्यवहार
Parbhani : फसवणूक झाल्याचं लक्षात येताच परभणीतल्या तरुणाची पोलीस आयकर विभागाकडे धाव
Parbhani Crime News : आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे दोन कागदपत्र असे आहेत की कुठेही लागतातच. मात्र हे दिल्यांनतर त्याचा गैरवापर होऊ नये, याची काळजी घेतली जावी. अन्यथा काय होते याचं उदाहरण परभणीत पाहायला मिळाले आहे. एका तरुण व्यावसायिकाचे पॅन कार्ड वापरून तब्बल 77 कोटींचे GST चे व्यवहार केल्याचे समोर आले आहे. ज्याने हा तरुण व्यावसायिकाच्या पायाखालची जमीनच सरकलीय...
परभणीतील तरुण व्यावसायिक निखिल तारे यांचं पॅन कार्डवापरुन कोट्यवधींचे व्यवहार करण्यात आले. निखिलच्या वडिलांचा बॅटरी, इन्व्हर्टर सेल्सचा व्यवसाय आहे. निखिलनेही स्वतःचा नवीन व्यवसाय सुरु करण्याचे ठरवले, नवीन व्यवसायासाठी GST चे रजिस्ट्रेशन करण्यासाठी निखिल त्यांच्या टॅक्स कन्सल्टंटकडे गेले. त्यांना आयकर विभागाच्या पोर्टलवर त्यांच्या पॅन कार्डवर व्यवहार झाल्याचे निदर्शनास आले. हे व्यवहार तब्बल ७८ कोटींचे असल्याचे समजल्यावर त्यांना धक्काच बसला.. त्यांनी याबाबत अधिक महिती घेतली असता सनवारिया इस्पात इंडस्ट्री या नावाने निखिल तारे यांचे पॅन कार्ड वापरण्यात आले. निखिलच्या नावाने पुण्यातील लाईट बिल व इतर कागतपत्रांचा वापर करत बनावट GST नोंदणी क्रमांक तयार करून हे सर्व व्यवहार करण्याचे आल्याचे यातून समोर आले. त्यांनी तात्काळ शहरातील नवा मोंढा पोलसांत गुन्हा दाखल केला आहे. आयकर विभाग,अर्थमंत्री यांच्याकडे ही दाद मागितली आहे.
सनवारिया इस्पात इंडस्ट्री कडून असे झाले व्यवहार
२०१९-२० मध्ये ४ कोटी ७५ लाख २१ हजार ९४३
२०२०-२१ मध्ये ३१ कोटी २६ लाख ६५ हजार ४४८
२०२१-२२ मध्ये ४२ कोटी १६ लाख ८९ हजार २४०
तीन वर्षात एकुण ७८ कोटी १८ लाख ७३ हजार ७५५ रुपये जेव्हा व्यवहार झालाय..
निखिलचे शिक्षण पुण्यात झाले, ते जवळपास पाच ते सहा वर्ष पुण्यात होते. त्यांनतर त्यांनी परभणीत वडिलांना व्यवसायात मदत केली. मात्र त्यांनी पुण्यात किंवा इतर ठिकाणी दिलेल्या पॅन कार्ड गैरवापर झाला. शिवाय लाईट बिल असो अथवा ई-मेल आयडी यातही निखिलचे नाव टाकून तेही बनावट तयार करण्यात आले. जिथे आपण सहजपणे आपले कागदपत्र देऊन टाकतो. मात्र हे देत असताना काळजी घेतली तर असले प्रकार टाळता येऊ शकतात, असे एक्सपर्ट सांगतात..
या प्रकरणात निखिल तारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात नवा मोंढा पोलिसात कलम ४१९,४६३,४६४,४६८,४६९,४७०,४७१,४१६,माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ७२,७२A नुसार गुन्हा दाखल झाला आहे. हे प्रकरण आता आर्थिक गुन्हे शाखेकडे गेलंय. ज्यात आर्थिक गुन्हे शाखेकडून प्रकरणाची सखोल माहिती घेणं सुरु आहे.