एक्स्प्लोर

Nilesh Chavan Vaishnavi Hagawane Death Case: मैत्रिणीला सोबत ठेवलं अन्...; वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील निलेश चव्हाणच्या अटकेची Inside Story

Nilesh Chavan Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील निलेश चव्हाण हा त्याच्या मैत्रिणीमुळे पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती समोर आली आहे.

Nilesh Chavan Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील (Vaishnavi Hagawane Death Case) निलेश चव्हाण (Nilesh Chavan) हा त्याच्या मैत्रिणीमुळे पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती समोर आली आहे. निलेश चव्हाण पुण्यातून पसार झाला तेव्हापासून त्याची मैत्रीण त्याच्यासोबत होती. आपण फिरायला जाऊ असं त्याने त्याच्या मैत्रिणीला सांगून तिला सोबत ठेवलं आणि तिच्या फोनचा वापरही केला. 

पोलिसांचा एका व्यक्तीच्या फोनकडे लक्ष होतं आणि त्या व्यक्तीला निलेशने मैत्रिणीच्या नंबरवरून संपर्क साधला. त्यावेळी पोलिसांना निलेशच्या मैत्रिणीचा नंबर प्राप्त झाला. तेव्हा निलेश आणि त्याची मैत्रीण दिल्लीत होते. मात्र दिल्लीतून निलेश गोरखपूरच्या खासगी बसमध्ये बसला आणि त्याची मैत्रीण पुण्याला परतली. मग पिंपरी चिंचवड पोलिसांनी तिची चौकशी केली, परंतु तिचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचं आढळल्यानं तिला पोलिसांनी सोडून दिलं. मात्र तिच्याकडून दिल्लीतून गोरखपूरचा प्रवास केलेल्या खासगी बसची माहिती मिळाली आणि तिथेच पोलिसांनी निलेश चव्हाणला बेड्या घातल्या. 

निलेश चव्हाणला 3 जूनपर्यंत पोलीस कोठडी-

निलेश चव्हाणला 3 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बावधन पोलिसांनी निलेश चव्हाणच्या कर्वेनगरच्या घराची दीड तास झाडाझडती घेतली. तपासात शशांक, लता हगवणे आणि करिष्मा हगवणे यांचा मोबाईल बावधन पोलिसांनी जप्त केलं. एकूण तीन मोबाईलसह इतर काही इलेक्ट्रॉनिक गॅजेटदेखील बावधन पोलिसांनी जप्त केल्याची प्राथमिक माहिती मिळतेय.  तपासाचा भाग म्हणून निलेश चव्हाणचे कॉल रेकॉर्डदेखील पोलीस तपासणार आहेत. तसेच निलेशची परवानाधारक बंदूक आणि पासपोर्टही जप्त करण्यात आले आहे.

निलेश चव्हाणने पोलिसांना असा गुंगारा दिला?

- पैशांची देवाण-घेवाण करताना ऑनलाईन ट्रान्झिक्शन केलं तर पोलिसांना लोकेशन कळेल म्हणून पुणे सोडताना त्याने लाखो रुपयांची रोकड सोबत बाळगली.
- सोबत 4 ते 5 मोबाईल आणि सिम कार्ड बाळगले. काही मोबाईल आणि सिम कार्ड मित्रांकडून घेतले.
- नेपाळमध्ये ही स्वतंत्र सिम कार्ड खरेदी केले.
- प्रत्येकवेळी वेगवेगळ्या मोबाईलमध्ये वेगवेगळे सिमकार्ड घालून वापर करायचा.
- संपर्क साधण्यासाठी ऑनलाईन कॉलिंगचा आधार घेतला.
- ऑनलाईन कॉलिंगवरुन अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी काही वकिलांशी संवाद साधत होता.
- अनेकदा फोन बंद पडल्याचे बहाणे करत, त्या-त्या ठिकाणच्या व्यक्तींच्या फोनचा आणि वाय-फायचा वापर केला.
- सीसीटीव्हीच्या साह्याने पोलीस आपल्यापर्यंत पोहचतील, म्हणून स्वतःच्या ऐवजी खाजगी वाहनाने प्रवास केला.

वैष्णवीच्या लग्नात दीड लाखाचा रुखवत-

हगवणे कुटुंबाचा आणखी एक हावरटपणा समोर आला आहे. वैष्णवीच्या लग्नात दीड लाखाचा रुखवत देण्यात आला होता, अशी माहिती वडील अनिल कस्पटेंनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांना दिलीय. शशांक हगवणेची मामी अर्थात जालिंदर सुपेकरांच्या बायकोनेच हा रुखवत बनवल्याचं कस्पटेंनी सांगितलं. वैष्णवीची सासू लता आणि नणंद करिश्माने, आमच्या पाहुण्या सुपेकरांकडून रुखवत बनवून घ्या असं कस्पटेंना सांगितलं होतं आणि त्यानंतरच सुपेकरांच्या बायकोला रुखवताची ऑर्डर देण्यात आली होती. वैष्णवीच्या लग्नातील रुखवताचे 1 लाख रुपये चेकने, तर 50 हजार रोख देण्यात आले होते.

संबंधित बातमी:

Video: पुणे ते नेपाळ... निलेश चव्हाण पोलिसांना कसा सापडला; गोरखपूर ते दिल्ली ट्र्रॅव्हल्समधील व्हिडिओ फुटेज समोर

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh Case : मला दहावी-बारावीत चांगले गुण, B.Sc पदवी घेतलीय; जयराम चाटेचा जामीनासाठी जगावेगळा युक्तिवाद, संतोष देशमुख हत्याकांडात मोठी अपडेट
मला दहावी-बारावीत चांगले गुण, B.Sc पदवी घेतलीय; जयराम चाटेचा जामीनासाठी जगावेगळा युक्तिवाद, संतोष देशमुख हत्याकांडात मोठी अपडेट
Mumbai Crime : मुंबईत पोलीस स्टेशन शेजारीच थरार! दारूच्या नशेत पतीने पत्नीला दगडाने ठेचून संपवलं; ओशिवरा परिसरामध्ये खळबळ
मुंबईत पोलीस स्टेशन शेजारीच थरार! दारूच्या नशेत पतीने पत्नीला दगडाने ठेचून संपवलं; ओशिवरा परिसरामध्ये खळबळ
Navi Mumbai Crime : 11 महिन्यांनंतर ऐरोलीतील 'मर्डर मिस्ट्री' उघड! अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं; 40 सिमकार्ड बदलून मोठा खेळ खेळला
11 महिन्यांनंतर ऐरोलीतील 'मर्डर मिस्ट्री' उघड! अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं; 40 सिमकार्ड बदलून मोठा खेळ खेळला
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या

व्हिडीओ

Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE
Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : 'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
IND vs ENG : कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप, शुभमन गिल, श्रेयस अय्यरनं किल्ला लढवला
कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
Embed widget