एक्स्प्लोर

Video: पुणे ते नेपाळ... निलेश चव्हाण पोलिसांना कसा सापडला; गोरखपूर ते दिल्ली ट्र्रॅव्हल्समधील व्हिडिओ फुटेज समोर

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी हगवणे कुटुंबातील सर्वच आरोपींना अटक केली असून सध्या ते पोलीस व न्यायालयीन कोठडीत आहेत.

पुणे : वैष्णवी हगवणे (Vaishnavi hagawane) प्रकरणात आरोपी असलेल्या बंदूकधारी निलेश चव्हाणला अटक करण्यात पिंपरी चिंचवड पोलिसांना यश मिळालं आहे. अँडी गुंडा स्क्वॉड आणि पुणे क्राइम ब्रांच यांनी संयुक्तपणे कारवाई करत निलेशला थेट नेपाळ बॉर्डरवरून ताब्यात घेतलं आहे. वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी त्याच्यावर बावधन पोलिसांत गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यानंतर तो पोलिसांना (police) शरण येण्याऐवजी फरार झाला होता. फरार झाल्यानंतर 21 मे रोजी निलेश चव्हाण पुणे (Pune) आणि महाराष्ट्रातून बाहेर गेला  अखेर 10 दिवसानंतर त्याला ताब्यात घेण्यात आलंय. वैष्णवीच्या आत्महत्येनंतर तिच्या बाळाचा ताबा निलेशकडे होता. मात्र, बाळाचा ताबा मागण्यासाठी वैष्णवीच्या आई-वडिलांनी त्याच्याकडे मागणी केली असता, निलेशने बंदुकीचा धाक दाखवून त्यांना हुसकावून लावले होते. अखेर, माध्यमांत हे वृत्त झळकल्यानंतर पोलिसांनी आरोपी निलेशवर देखील गुन्हा दाखल केला आहे.  

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी हगवणे कुटुंबातील सर्वच आरोपींना अटक केली असून सध्या ते पोलीस व न्यायालयीन कोठडीत आहेत. तर, या प्रकरणात वैष्णवीच्या बाळाची हेळसांड करणारा आरोपी निलेश चव्हाण गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. 21 मे रोजी निलेश महाराष्ट्राबाहेर केला होता. त्यानंतर,  25 मे रोजी खासगी ट्रॅव्हल्सने तो उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथून दिल्लीला गेला. ज्या बसने तो प्रवास करत होता, त्या वातानुकूलित बसमधील प्रवासाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून त्यात निलेश चव्हाण दिसून येत आहे. स्लीपर सीटवरुन उतरत असताना, हाती पाण्याची बाटली घेतलेला निलेश चव्हाण बिनधास्तपणे फिरताना पाहायला मिळत आहे. 

निलेश चव्हाणने पुणे, मुंबई, कर्जत, रायगड असा प्रवास केला, रायगडनंतर त्याने 21 मे रोजी महाराष्ट्राबाहेर म्हणजेच दिल्ली गाठली होती. 25 मे रोजी त्याने दिल्ली ते गोरखपूर प्रवास केला. त्यानंतर, सोनोली (उत्तरप्रदेश), भैरवा (नेपाळ) आणि काठमांडू येथे पोहोचला. नेपाळमधून भैरवा मार्गे सोनोलीमध्ये आल्यावर निलेश चव्हाणला अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे निलेश चव्हाण हा 25 मे रोजीच्या दुपारपासून 30 मे पर्यंत नेपाळमध्येच मुक्कामी होता. 

बाळाचा कायदेशीर ताबा आजीकडे

पुण्यातील स्वर्गीय वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूपश्चात त्यांचा 9 महिन्यांचा मुलगा जनक हगवणे याचा सांभाळ करण्यासाठी बाल कल्याण समितीने त्याच्या आजी व स्व. वैष्णवी हगवणे यांच्या आई श्रीमती स्वाती आनंद कस्पटे यांना योग्य व्यक्ती (Fit Person) म्हणून नियुक्त केले आहे. याबाबत जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या सामाजिक तपासणी अहवालानुसार श्रीमती स्वाती कस्पटे याच योग्य व्यक्ती असून त्यांचे सामाजिक, भावनिक व कौटुंबिक वातावरण बालकाच्या हितासाठी अनुकूल आहे. यापुढे स्व. वैष्णवी हगवणे यांचा मुलगा कु. जनक हगवणे याचा कायदेशीर ताबा स्वाती आनंद कस्पटे यांच्याकडे असेल. बालकाच्या शिक्षणाची, आरोग्याची व सर्वांगीण विकासाची संपूर्ण जबाबदारी स्वाती कस्पटे यांची असेल, असे समितीने म्हटलं आहे.

हेही वाचा 

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 मे 2025 | शुक्रवार 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Satara crime news: साताऱ्यातील लव्ह ट्रँगलची रक्तरंजित कहाणी, महिलेने EX अन् नवऱ्याच्या मदतीने दुसऱ्या प्रियकराला मारलं, तुकडे शेततळ्यात फेकले
साताऱ्यातील रक्तरंजित लव्ह ट्रँगल, महिलेने EX अन् नवऱ्याच्या मदतीने दुसऱ्या प्रियकराला मारलं, तुकडे शेततळ्यात फेकले
Vikas Gogawale Mahad crime: भरत गोगावलेंच्या मुलाचं महाड पोलिसांसमोर आत्मसमर्पण, विकास गोगावलेंच्या अटकपूर्व जामीनावर आज सुनावणी
भरत गोगावलेंच्या मुलाचं महाड पोलिसांसमोर आत्मसमर्पण, अटकपूर्व जामीनावर आज सुनावणी
Devendra Fadnavis On MNS Shivsena Shinde Group Yuti: मनसे आणि शिंदे गटाची कल्याण-डोंबिवलीत युती; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
मनसे आणि शिंदे गटाची कल्याण-डोंबिवलीत युती; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Accident In Jalgaon: इनोव्हा कारचा भीषण अपघात, तरुणीचा जागीच मृत्यू; कारचालक गंभीर जखमी, जळगावमधील घटना
इनोव्हा कारचा भीषण अपघात, तरुणीचा जागीच मृत्यू; कारचालक गंभीर जखमी, जळगावमधील घटना

व्हिडीओ

Vikas Gogawale Arrested : विकास गोगावले अखेर महाड पोलिसांना शरण
Badlapur Crime News :  लैंगिक शोषणाच्या घटनेनं बदलापूर पुन्हा हादरलं, मोठी माहिती समोर
Keral Crime News : सोशल मिडियावरच्या व्हिडीओने घतला जीव, व्हायरल व्हिडिओ ठरला आत्महत्येचं कारण
Anant Ambani Watch : अनंत अंबानींसाठी तब्बल १४ कोटींंचं घड्याळ, काय आहे वैशिष्ट्य? Special Report
Shanivarwada:पेशव्यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या ऐतिहासिक शनिवारवाड्याचा वर्धापनदिन Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satara crime news: साताऱ्यातील लव्ह ट्रँगलची रक्तरंजित कहाणी, महिलेने EX अन् नवऱ्याच्या मदतीने दुसऱ्या प्रियकराला मारलं, तुकडे शेततळ्यात फेकले
साताऱ्यातील रक्तरंजित लव्ह ट्रँगल, महिलेने EX अन् नवऱ्याच्या मदतीने दुसऱ्या प्रियकराला मारलं, तुकडे शेततळ्यात फेकले
Vikas Gogawale Mahad crime: भरत गोगावलेंच्या मुलाचं महाड पोलिसांसमोर आत्मसमर्पण, विकास गोगावलेंच्या अटकपूर्व जामीनावर आज सुनावणी
भरत गोगावलेंच्या मुलाचं महाड पोलिसांसमोर आत्मसमर्पण, अटकपूर्व जामीनावर आज सुनावणी
Devendra Fadnavis On MNS Shivsena Shinde Group Yuti: मनसे आणि शिंदे गटाची कल्याण-डोंबिवलीत युती; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
मनसे आणि शिंदे गटाची कल्याण-डोंबिवलीत युती; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Accident In Jalgaon: इनोव्हा कारचा भीषण अपघात, तरुणीचा जागीच मृत्यू; कारचालक गंभीर जखमी, जळगावमधील घटना
इनोव्हा कारचा भीषण अपघात, तरुणीचा जागीच मृत्यू; कारचालक गंभीर जखमी, जळगावमधील घटना
Akola : अकोल्यात भाजपविरोधात सर्वपक्ष एकत्रित, बहुमताचा 41 चा आकडा गाठल्याचा दावा; महापौरपद ठाकरेंची शिवसेना किंवा वंचितकडे
अकोल्यात भाजपविरोधात सर्वपक्ष एकत्रित, बहुमताचा 41 चा आकडा गाठल्याचा दावा; महापौरपद ठाकरेंची शिवसेना किंवा वंचितकडे
Badlapur : बदलापूर पुन्हा हादरले, 4 वर्षांच्या चिमुकलीचं शाळेच्या व्हॅन चालकाकडून मारहाण करत लैंगिक शोषण, जमाव संतप्त 
बदलापूर पुन्हा हादरले, 4 वर्षांच्या चिमुकलीचं शाळेच्या व्हॅन चालकाकडून मारहाण करत लैंगिक शोषण, जमाव संतप्त 
Kolhapur : कोल्हापुरात राज्य उत्पादन शुक्लची मोठी कारवाई, 1.30 कोटींची गोवा बनावटी विदेशी दारू जप्त
कोल्हापुरात राज्य उत्पादन शुक्लची मोठी कारवाई, 1.30 कोटींची गोवा बनावटी विदेशी दारू जप्त
Badlapur crime news: नराधमाला पाहताच चिमुरडी भेदरुन आई-बाबांच्या मागे लपली, बदलापूरच्या शाळेत लैंगिक अत्याचार, नेमकं काय घडलं?
नराधमाला पाहताच चिमुरडी भेदरुन आई-बाबांच्या मागे लपली, बदलापूरच्या शाळेत लैंगिक अत्याचार, नेमकं काय घडलं?
Embed widget