9 लाखांचे कर्ज अन् व्याज भरले तब्बल 50 लाख, नाशिकमध्ये सावकारी जाचाची संतापजनक घटना
Nashik: व्याजाने घेतलेल्या नऊ लाख रुपयांच्या मोबदल्यात 50 लाख रुपये परत देखील परत करून देखील वीस लाखांची मागणी सावकाराकडून केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
Nashik Latest News update: काही दिवसांपूर्वी सावकारी जाचाला कंटाळून नवदाम्पत्याने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेने अनेकांकडून रोष व्यक्त करण्यात आला होता. आता पुन्हा सावकारी जाचाची घटना समोर आली आहे. व्याजाने घेतलेल्या नऊ लाख रुपयांच्या मोबदल्यात 50 लाख रुपये परत देखील परत करून देखील वीस लाखांची मागणी सावकाराकडून केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या काही वर्षांपासून नाशिक शहरात खासगी सावकाराचे मोठे पेव फुटले असून 10 ते 30 टक्के दराने पैसे देऊन त्यानंतर सावकारी पद्धतीने वसुली केली जात असल्याने अनेक कर्जदार त्रासले आहेत. अशा सावकाराच्या जाचाला कंटाळून काही दिवसांपूर्वी पाथर्डी परिसरातील गौरव जगताप व नेहा जगताप या नव दांपत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. तसेच पंचवटी परिसरात महिलेच्या घरात घुसून तिच्या नवऱ्याचे अपहरण करतेत महिलेचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना देखील या निमित्ताने उघडती झाली होती. पोलीस ठाण्यात नोंद झाल्यामुळे सावकारांच्या जाताला कुठेतरी वाचा फुटण्यास सुरुवात झाली आहे.
दरम्यान अशीच एक घटना मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे. याबाबत पीडित सुरेश पोराला पुजारी यांनी दिलेला फिर्यादीनुसार संशयित खासगी सावकार विजय शंकरराव देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी सुरेश पुजारी यांनी जानेवारी 2007 मध्ये संशयित विजय देशमुख यांच्याकडून पाच टक्के व्याजाने नऊ लाख रुपये घेतले होते. फिर्यादी पुजारी यांनी या नऊ लाखांच्या मोबदल्यात 2007 ते 2022 पर्यंत वेळोवेळी व्याजापोटी 44 लाख 90 हजार रुपये रोख आणि सहा लाख रुपये बँकेतून ट्रान्सफर करून असे 50 लाख 90 हजार रुपये दिले होते. तरी देखील सावकार वीस लाख रुपयांची बाकी असल्याचे सांगत पुजारी आणि त्यांच्या मुलीला वारंवार फोनवरून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या सर्व गोष्टींना कंटाळलेल्या पुजारी यांनी थेट पोलिसात धाव घेत खाजगी सावकारा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात तरुणांनी दाखल केली आहे या घटनेमुळे पुन्हा एकदा शहराला खाजगी सावकारीचा विवेक घट्ट झाल्याचे चित्र दिसून आले आहे. एकूणच नाशिक पोलिसांनी याकडे विशेष लक्ष देऊन यावर वेळीच आवर घालणे गरजेचे असल्याचे या घटनांवरून दिसून येते.