उलटी केल्याच्या रागातून प्रेयसीच्या 4 वर्षांच्या चिमुकल्याचा घेतला जीव; आरोपीला 9 सप्टेंबरपर्यंत सुनावली पोलीस कोठडी
Nashik Crime News : प्रेयसीच्या चार वर्षांच्या चिमुकल्याने उलटी केल्याच्या रागातून त्याला प्रियकराने बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाला होता.
![उलटी केल्याच्या रागातून प्रेयसीच्या 4 वर्षांच्या चिमुकल्याचा घेतला जीव; आरोपीला 9 सप्टेंबरपर्यंत सुनावली पोलीस कोठडी Nashik Crime News Girlfriend s 4 year old child killed in anger over vomiting accused remanded in police custody till 9 September Maharashtra Marathi News उलटी केल्याच्या रागातून प्रेयसीच्या 4 वर्षांच्या चिमुकल्याचा घेतला जीव; आरोपीला 9 सप्टेंबरपर्यंत सुनावली पोलीस कोठडी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/06/c76bb7157a8216365d81937d608609111725611554378923_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नाशिक : प्रेयसीच्या चार वर्षांच्या चिमुकल्या मुलाने उलटी केल्याच्या रागातून त्याला प्रियकराने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना पंचवटीतील (Panchavati) श्रीकृष्णनगर (Krishna Nagar) परिसरात घडली होती. या घटनेत चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. आरोपीला पंचवटी पोलिसांनी (panchavati Police) अटक केली असून त्याला न्यायालयात (Court) हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला 9 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संशयित आरोपी महेश कुंभार व पल्लवी काळे ही पती पासून विभक्त होऊन रिलेशनशिपमध्ये राहत होते. 1 सप्टेंबर रोजी रात्री जेवण केल्यानंतर प्रेयसीचा मुलगा वेदांशने अचानक उलटी केली. त्यानंतर आरोपी महेश कुंभार चिडला. त्याने मुलाला हाताने आणि झाडूने बेदम मारहाण केली. तसेच सिलेंडरवर त्याचे डोकेही आपटले. मारहाणीमुळे चिमुकला बेशुध्द झाला.
बेदम मारहाणीत चिमुकल्याचा मृत्यू
आपला चार वर्षाचा मुलगा वेदांश खाटेवरून खाली पडल्याने बेशुद्ध झाल्याचा बनाव करत त्याची आई पल्लवीने मंगळवार पेठेतील कमला नेहरु रुग्णालयात त्याला उपचारांसाठी दाखल केले होते. शवविच्छेदन अहवालात वेदांशचा मृत्यू बेदम मारहाणीमुळे झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी नमूद केले. त्यानंतर पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला होता.
9 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी
पल्लवी तीन महिन्यांपासून बिबवेवाडीत राहत होती. तिचे नाशिकमधील महेश कुंभार याच्याशी प्रेमसंबंध असल्याचे तपासात समोर आले. पल्लवीचा प्रियकर महेश कुंभार याने गॅस टाकीवर पल्लवीच्या चार वर्षाच्या मुलाचे डोके आपटत त्याला मारहाण केली आणि त्यात चिमुकला बेशुद्ध झाला आणि त्याचा मृत्यू झाल्याचे पोलीस तपासात समोर आले. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी आरोपी महेश कुंभार यास अटक केली होती. महेश कुंभारला न्यायालयात हजर केले असता त्याला 9 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Nashik Crime News : मालेगावात 'चड्डी बनियान' गँगचा धुमाकूळ, एकामागे एक सहा दुकानं फोडली, शहरात खळबळ
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)