Nagpur Crime News: अवैधरित्या रेतीची चोरी करून वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक; दोन टिप्परसह लाखोंचा माल जप्त
Nagpur Crime News: अवैधरित्या रेतीची चोरी करून वाहतूक करणाऱ्या दोघांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत रेती वाहतूक करणाऱ्या दोन टिप्परसह 12 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Nagpur News नागपूर : वाळू (Sand)सरकारच्या नजरेतून गौण खनिज आहे. मात्र, तस्करांच्या नजरेतून हीच वाळू (Sand) सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे. मध्यप्रदेश आणि विदर्भातील जंगलातून वाहून येणाऱ्या अनेक नद्यांमध्ये वाळूचे प्रमाण प्रचंड आहे. हीच वाळू सध्या तस्करांसाठी सोन्याची खाण बनली आहे. म्हणूनच या रेती माफियांचा(Sand Mafia) सध्या सर्वत्र सुळसुळाट बघायला मिळत आहे. अशीच छुप्या आणि अवैध्यरित्या रेतीची चोरी करून वाहतूक करणाऱ्या टोळीचा नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) छडा लावत कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी रेती वाहतूक करणाऱ्या चालक, मालकावर गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली आहे. सोबतच दोन टिप्परसह 12 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
दोन टिप्परसह लाखोंचा माल जप्त
विदर्भात, खासकरून नागपूर शहराच्या अवती भोवतीच्या नद्यांतून सध्याघडीला जोरात वाळू उत्खनन सुरू असल्याचे चित्र आहे. याविरोधात पोलीस देखील सतर्क राहून अवैध्यरित्या रेतीची चोरी अथवा वाहतूक करणाऱ्याच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. दरम्यान उमरेड पोलीसांचे गस्ती पथक पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असताना माहीती मिळाली की, काही टीप्पर रेती भरुन उमरेडकडे येत आहेत. अश्या विश्वसनीय माहिती वरून पोलीसांनी सापळा रचत मांगरुळ फाटा येथे पिवळया रंगाचा टीप्पर (वाहन क्र. एमएच 40 बीजी 9216 मध्ये) ची अडवणूक केली. दरम्यान त्यांना विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडावीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी जरा दम देताच त्यांनी सत्य सांगण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनी रेती वाहतूक करणाऱ्या टीप्परची पाहणी केली असता त्यात 5 ब्रास रेतीची अवैध्यरीत्या वाहतूक होत असल्याचे दिसून आले.
अवैधरित्या रेतीची चोरी आणि वाहतूक प्रकरणी गुन्हा दाखल
या प्रकरणी पोलिसांनी टिप्परचा चालक सुनील दयाराम गजभे, (वय 32 वर्ष रा. मोहाळी तह. नागभीड जि. चंद्रपुर) आणि टीप्परचा मालक अमोल दिलीप जांभुळकर (वय 34 वर्ष, रा. विर्ली तह.उमरेड जि. नागपूर) यांच्या विरूध्द उमरेड पोलीस स्टेशन येथे अप.क्र. 40/2024 कलम 379, 109 भा.द.वी., सहकलम 48 (7), 48 (8) महाराष्ट्र जमीन महसुल अधिनीयम 1966, सहकलम 4, 21 खाण आणि खनिज अधिनियम 1957 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.12 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधिक्षक रमेश धुमाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार, उमरेड जिल्हा, नागपूर यांच्या मार्गदर्शानाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल रामटेके, पोलीस अमंलदार प्रदिप चवरे, राधेश्याम कांबळे, पंकज बट्टे, तुषार गजभीये, सर्व पोस्टे उमरेड यांनी यशस्वी रित्या पार पडली.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
