Nagpur Crime : नागपुरात हत्यासत्र सुरूच! भरदिवसा एकाची गोळ्या झाडून हत्या; सदर पोलीस स्टेशन हद्दीतील घटना
नागपूरच्या सदर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील राजनगर परिसरात काही आज्ञातांनी घरात घुसून एका व्यक्तीवर गोळ्या झाडल्या आहेत. दिवसाढवळ्या झालेल्या हत्येच्या घटनेने नागपूरात मोठी खळबळ उडाली आहे.
नागपूर: उपराजधानी नागपूरात हत्यांची (Nagpur Crime) मालिका सुरूच असल्याचे चित्र आहे. सध्या सुरू असलेल्या फेब्रुवारी महिन्याच्या 24 दिवसात शहरातील विविध भागात 16 हत्येच्या घटनांनी शहर हादरले आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिना नागपूरसाठी हत्त्यांचा (Nagpur) महिना ठरला आहे. अशीच एक हत्येची घटना आज दुपारी नागपूरच्या सदर पोलीस (Nagpur Police)स्टेशनच्या हद्दीतील राजनगर परिसरातून समोर आली आहे. अज्ञातांनी घरात घुसून एका व्यक्तीवर गोळ्या झाडल्या आहेत. विनय पोनेकर यांच्यावर हा हल्ला करण्यात आला असून त्यांचा या हल्ल्यात जीव गेला आहे. दिवसाढवळ्या झालेल्या हत्येच्या घटनेने नागपुरात पुन्हा मोठी खळबळ उडाली आहे.
गृहमंत्र्यांच्या नागपुरात हत्यासत्र सुरूच
उपराजधानी नागपुरात हत्यासत्र काही केल्या थांबायचे नाव घेत नाही. गेल्या 24 दिवसांत शहरातील विविध हत्येच्या घटनांनी शहराच्या कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गृहमंत्र्यांच्या नागपूरात होणाऱ्या हत्या आणि गोलीबारांच्या घटनांनी शहरातील गुन्हेगारी विश्वात पोलिसांचा धाक उरलेला नाही का? असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडला आहे. अशीच एक घटना आज नागपूरातील राजनगर परिसरात घडली आहे. काही आज्ञातांनी विनय पोनेकर या व्यक्तीच्या घारत शिरून त्यांच्यावर गोळीबार केला आहे. ही हत्या कोणी केली आणि त्यामागील नेमका उद्देश काय? याचा तपास सध्या पोलीस करत आहे. मात्र दिवसाढवळ्या झालेल्या हत्येच्या घटनेने परिसरात दहशत निर्माण झाली आहे. पोलिसांना माहिती मिळातच त्यांनी घटनास्थळी धाव घेत परिसराची पहाणी केली असता, परिसरातील सीसीटीव्हीत काही संशयित आरोपी दिसत असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र ही हत्या करण्यामागील नेमका उद्देश काय? याबाबतची माहिती अद्याप समजू शकलेली नाही.
हत्येच्या घटना रोखण्याचे पोलिसांपुढे आव्हान
प्राथमिक माहितीनुसार, विनय पुणेकर हे काही वर्षांपूर्वी प्रेसमध्ये फोटोग्राफर म्हणून काम करत होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या पत्नीपासून विभक्त होऊन ते एकटेच राहत होते. दुपारच्या वेळी परिसरात शांतता असतांना काही अज्ञातांनी त्यांच्या घरात प्रवेश करत गोळ्या झाडल्या. अचानक मोठा आवाज झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आणि परिसरातील शांतता क्षणात एका रक्तरंजीत हत्याकांडमध्ये रूपांतरित झाली. यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठत पुढील तपास सुरू केला. सदर परिसर हा कायम गजबजलेला आणि शहरातील एक उच्चभ्रू लोकांची वस्ती असलेला भाग आहे. मात्र अशा ठिकाणी हा हत्येचा थरार घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. फेब्रुवारी महिन्यात नवे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी पदभार स्वीकारताच नागपूरात एका पाठोपाठ एक हत्येच्या घटना घडत आहे. त्यामुळे नागपूर पोलिसांना या हत्येच्या घटना रोखण्याचे मोठे आव्हान असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या