Sex Racket : शहरातील पॉश भागात 'स्पा' च्या आड देहव्यापार; 3 पीडित महिलांची सुटका तर दोन महिलेला अटक
Crime News : सध्या नागपुर शहरात देखील देहव्यापाराचे लोन पसरत असल्याचे चित्र आहे. अशीच एक कारवाई करत नागपूर पोलिसांनी स्पा आणि सलूनच्या आड सुरू असलेल्या देहव्यापाऱ्याच्या अड्ड्याचा पर्दाफाश केला आहे.
नागपूर : सध्या नागपुर (Nagpur News) शहरात देखील देहव्यापाराचे लोन पसरत असल्याचे चित्र आहे. अशीच एक कारवाई करत नागपूर पोलिसांनी स्पा आणि सलूनच्या आड सुरू असलेल्या देहव्यापाऱ्याच्या (Sex Racket) अड्ड्याचा पर्दाफाश केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे धरमपेठ येथील वेस्ट हायकोर्ट मार्गावरील कायम गजबजलेल्या परिसरात ही कारवाई (Crime) करण्यात आली आहे. या कारवाईत गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने दोन संशयित आरोपी महिलेला अटक करून तीन पिडीत युवतीची सुटका केली आहे. मसाजच्या नावावर पीडित युवतींना अधीक पैसे कमविण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून देहव्यापार करून घेतल्या जात असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. मात्र या कारवाईमुळे परिसरात मात्र एकच खळबळ उडाली आहे.
पीडित युवतींना अधीक पैसे कमविण्याचे आमिष दाखवून देहव्यापार
नागपूर शहरातील धरमपेठ परिसरातून शंकर नगरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर असलेल्या आनंद भंडार दुकानाच्या तिसऱ्या मजल्यावर नेचर स्पा नावाने सलून आणि स्पाचे दुकान आहे. गेल्या काही दिवसांपासून या स्पा सेंटरमध्ये महिलांकडून देह व्यवसाय करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी अधिकची माहिती मिळवून रेड कारवाई करण्यात आली. त्यात फंटर आणि पंचांच्या समक्ष ही कारवाई करण्यात आली. त्यामध्ये तीन पीडित महिला मिळून आले आहे. तर या स्पाच्या ज्या मालक सोफिया शेख आहेत त्या गरोदर असल्याने त्या या महिलांकडून देव व्यवसाय करून घेत होत्या. यात आकांशा मेश्राम नामक मॅनेजर यांचा देखील सहभाग असून या दोन्ही आरोपी आहेत.
प्राथमिक माहितीनुसार सापडून आलेल्या तिन्ही पीडित युवती या गरीब कुटुंबातल्या असून साधारण शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. स्पा च्या कामात त्यांना सात ते आठ हजार रुपये पगार देण्यात येत होता. मात्र या कामाव्यतिरिक्त देहव्यवसाय केल्यास त्यांना प्रत्येकी ग्राहकाकडनं हजार ते पंधराशे रुपये अतिरिक्त देण्यात येत होते. याच पैशांच्या आमिषातना त्यांच्याकडून हे काम करून घेतल्या जात असल्याचे तपासात उघड झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
3 पीडित महिलांची सुटका तर दोन महिलेला अटक
विशेष म्हणजे नव्याने लागू झालेल्या कायद्यानुसार भारतीय साक्ष समितीनुसार 176(3) कलम आहेत ज्यात सात वर्षांपर्यंतची शिक्षा असू शकते. न्यायालयीन तज्ञांना देखील बोलवण्यात आला असून अधिक चौकशी अंती याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. गेल्या एक वर्षापासून या स्पा सेंटरमध्ये हा व्यवसाय सुरू असल्याची माहिती आहेत. यातील तिन्ही पीडित महिला या नागपूर शहरातलेच असून कौटुंबिक जबाबदारीमुळे त्यांनी हा मार्ग स्वीकारल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.