(Source: ECI/ABP News/ABP Majha)
धक्कादायक! अंधारात महिलेचा विनयभंग, ब्लेडने वार करत केले जखमी, CCTV समोर, सराईत गुन्हेगाराला अटक
Mumbai crime:मुंबईतील या घटनेने शहरात खळबळ उडाली असून उरण, शिळफाटा घटनेनंतर वाढणाऱ्या गुन्हेगारीमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Mumbai Crime: राज्यात सध्या रायगडमधील उरण येथील तरुणीच्या निघृण हत्येने (Uran crime) देश हादरला असताना शिळफाटा येथे पुजाऱ्यांनी विवाहित महिलेवर केलेले प्रकरणही ताजे आहे. मुंबईतील गुन्हेगारी दिवसेंदिवस भयानक वळण घेत असल्याचे दिसून येत असताना भाईंदरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अंधाराचा फायदा घेत एका महिलेचा विनयभंग करत ब्लेडने वार करत जखमी केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर तरुणीवर हल्ला करणाऱ्या या आरोपीस पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दीपक माळी असे आरोपीचे नाव आहे. २३ जुलै रोजी रात्री ११ च्या दरम्यान ही घटना घडली होती.
कामावरून घरी येत असताना भररस्त्यात विनयभंग
दिनांक २३ जुलैला रात्री ११ च्या दरम्यान तरुणी कामावरून घरी येत होती. चालताना एका अज्ञात इसमाने तिचा पाठलाग करत भररस्त्यात तिची छेड काढली होती. तरुणीने स्वतःच्या बचावा करता विरोध केल्याने तिच्यावर तिला मारहाण करत ब्लेडने वार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात विविध कलमाअंतर्गत २५ जुलैला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठाच्या आदेशानुसार समांतर तपास गुन्हे शाखा -१ यांच्या मार्फत करण्यात येत होता. घटनास्थळी मिळालेले सिसिटीव्ही व सुत्रांकडून प्राप्त माहितीनुसार हा इसम बोरिवली परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याला घटनास्थळी जात ताब्यात घेण्यात आले होते. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने या गुन्ह्याची कबुली दिली आहे.
खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी
अंधाराचा फायदा घेत ३३ वर्षीय इसमाला बोरिवली वेस्ट परिसरातून ताब्यात घेतले आहे.त्याच्यावर नवघर पोलीस ठाण्यात कलम ७४,७५,७६,७८,११८(१),११५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अंधाराचा फायदा घेऊन महिलेचा विनयभंग करून जखमी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक करण्यात गुन्हे शाखा कक्ष -१ यांना यश मिळाले आहे. शहरातील महिलांकडून सदरचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा अशी मागणी करण्यात येत आहे.
हेही वाचा: