Uran Crime Case : उरणमधील 25 जुलैच्या दिवशीचं CCTV फुटेज समोर, आधी हातात काळी छत्री घेऊन यशश्री गेली, पाठोपाठ दाऊद शेख दिसला
Uran Yashshree Shinde Case: 25 जुलैचा 'तो' दिवस, आधी हातात काळी छत्री घेऊन यशश्री गेली, तिच्या पाठोपाठ 10 मिनिटांतच दाऊद शेख जाताना CCTV मध्ये कैद
Uran Crime Case : नवी मुंबईतील (Navi Mumbai Crime) घटनेनं संपूर्ण देश हादरला आहे. उरणमधील यशश्री शिंदे (Yashashri Shinde) या 22 वर्षीय तरुणीची निर्घृणपणे हत्या (Uran Murder Cae) करण्यात आल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. एका नराधमानं यशश्रीवर अत्यंत क्रूरपणे वार करुन तिला ठार केलं. दाऊद शेख नावाचा इसम गेल्या अनेक वर्षांपासून यशश्रीला त्रास देत होता, असं यशश्रीच्या वडीलांनी तक्रारीत म्हटलं आहे. त्यानुसार, पोलिसांनी दाऊदचा कसून शोध घेण्यास सुरुवात केली आहे. अशातच आता एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. पोलीस तपासात समोर आलेल्या एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये दाऊद शेख यशश्रीच्या मागे जाताना दिसत आहे.
नवी मुंबईतील यशश्री शिंदे हत्या प्रकरणी पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी दाऊद शेखचा पोलीस शोध घेत आहे. अशातच एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. आरोपी दाऊद शेख एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. नवी मुंबई पोलिसांनी तपास करत असताना पनवेल रेल्वे स्टेशन आणि आसपासच्या भागांतील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. यापैकी एका कॅमेऱ्यात यशश्री शिंदे आणि दाऊद शेख कैद झाल्याचं पाहायला मिळत आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन फोटो समोर आले आहेत. त्यापैकी पहिल्या सीसीटीव्ही ग्रॅबमध्ये यशश्री शिंदे हातात छत्री घेऊन जाताना दिसत आहे. तर तिच्या मागे तब्बल 10 मिनिटांनी दाऊद शेख जात असल्याचं पाहायला मिळत आहे. पहिल्या फोटोमध्ये 25 जुलैच्या दिवशी दुपारी 2 वाजून 14 मिनिट 35 सेकंदांनी यशश्री एक काळ्या रंगाची छत्री घेऊन जाताना दिसत आहे. तर त्याच दिवशीच्या दुसऱ्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये, आरोपी दाऊद शेख यशश्रीनंतर 10 मिनिटांनी म्हणजेच, 2 वाजून 22 मिनिटांनी तिच्या मागे जात आहे. पोलीस तपासात समोर आलेलं हे सीसीटीव्ही फुटेज त्याच दिवशीचं आहे, ज्या दिवशी यशश्रीची हत्या करण्यात आली होती. तेव्हापासूनच आरोपी दाऊद शेख फरार आहे आणि पोलीस त्याच्या मागावर आहेत.
संपूर्ण शरीरावर वार, ओळख पटू नये म्हणून शरीराची विटंबना; यशश्रीसोबत नेमकं काय घडलं?
उरणमधील यशश्री शिंदे या 22 वर्षीय तरुणीची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. एकतर्फी प्रेमातून गेल्या अनेक वर्षांपासून तिच्या मागावर असलेल्या नराधमाने यशश्रीला अक्षरश: हालहाल करुन ठार मारल्याची (Uran Murder Cae) माहिती समोर आली. यशश्रीच्या मारेकऱ्यानं निर्दयीपणे तिच्यावर वार केले, तिच्या शरीराची अक्षरशः विटंबना केली. तिच्या गुप्तांगावर आणि पोटावर अनेक वार करुन यशश्रीचा मृतदेह छिन्नविछिन्न करण्यात आला होता. त्यानंतर उरणमधील सगीर ब्रदर्स पेट्रोल पंपामागील मैदानावरील झुडुपांमध्ये तिचा मृतदेह फेकून देण्यात आला.
यशश्रीच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात एका दाऊद शेख नामक व्यक्तीचा उल्लेख केला. त्याच्याकडून मृत्यूपूर्वी यशश्रीवर बलात्कार करण्यात आला होता का? याची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली. या घटनेनंतर दाऊद शेख या आरोपीला पकडण्यासाठी नागरिकांनी पोलिसांवर प्रचंड दबाव निर्माण केला आहे. दाऊद शेख यानं यशश्री शिंदे 15 वर्षांची असतानाही तिच्यावर अत्याचार केले होते. दाऊद शेख हा एक ट्रक ड्रायव्हर आहे. त्याने 2018 साली पहिल्यांदा यशश्री शिंदे हिला पाहिले. त्यावेळी यशश्री 15 वर्षांची होती. दाऊद शेखनं त्यावेळी यशश्रीला आपल्या जाळ्यात ओढले आणि 2019 साली त्यानं तिच्यावर अत्याचार केले होते. त्यावेळी यशश्री शिंदे हिच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनुसार दाऊद शेख याच्यावर पॉक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन त्याची तुरुंगातून रवानगी करण्यात आली होती. अलीकडेच तो तुरुंगातून सुटला होता. यानंतर त्यानं पुन्हा यशश्रीचा पाठलाग करायला सुरुवात केली. दाऊद शेख सतत यशश्रीला फोन करायचा. अखेर 25 जुलैला ती घराबाहेर पडल्यानंतर दाऊद शेखनं तिला गाठून तिची हत्या केल्याचा संशय आहे. गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास मैत्रिणीच्या घरी जाण्यासाठी यशश्री पनवेल स्टेशनकडे गेली. सायंकाळी साधारण साडेचारनंतर तिचा फोन बंद झाला. त्यानंतर यशश्री कोणालाच दिसली नाही. पोलिसांकडून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
कर्नाटकातून एकजण पोलिसांच्या ताब्यात
उरणमधील यशश्री शिंदे या 22 वर्षीय तरुणीची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना नुकतीच उघडकीस आली होती. एकतर्फी प्रेमातून गेल्या अनेक वर्षांपासून तिच्या मागावर असलेल्या नराधमानं यशश्रीला अक्षरश: हालहाल करुन ठार मारल्याची माहिती समोर आली होती. याप्रकरणी पोलिसांनी मोहसिन नावाच्या तरुणाला कर्नाटकातून ताब्यात घेतलं आहे. मोहसिनला पुढील चौकशीकरता महाराष्ट्रात आणलं जाणार आहे. यशश्री बेपत्ता झाल्याची तक्रार कुटुंबियांनी दिल्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रं वेगानं हलवली. त्यावेळी यशश्रीच्या कॉल रेकॉर्ड्सवरुन एका नंबरवर तिचं सातत्यानं बोलणं होत असल्याचं समोर आलं होतं. पोलिसांनी तपासाची दिशा त्यानुसार वळवली आणि तो नंबर ज्याच्या नावावर होता, त्याचा कसून शोध घेण्यास सुरुवात केली. अखेर पोलिसांच्या हाती यश आलं असून पोलिसांनी तो नंबर ज्या व्यक्तीचा होता, त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
पाहा व्हिडीओ : Uran Case : यशश्री शिंदेची स्टेशनजवळच्या निर्जनस्थळी हत्या, तपास कुठपर्यंत आला?
महत्त्वाच्या इतर बातम्या :