Shilphata Rape Case : अक्षता म्हात्रे हत्याप्रकरण तापलं, तीन पुजाऱ्यांनी मंदिरात अत्याचार केलेलं नेमकं प्रकरण काय?
Shilphata Gngrape Murder Case : घरात वाद झाल्यामुळे विवाहित महिला शिळफाटा येथील एका मंदिरात बसली होती. त्यावेळी तिला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला होता.
Shilphata Gngrape Murder Case : शिळफाटा येथील डोंगरात तीन पुजाऱ्यांनी एका विवाहित महिलेवर अत्याचार करून तिची हत्या (Akshata Mhatre Murder Case) केली होती. मंदिरातील पुजारी असलेल्या तीन आरोपींनी विवाहित महिलेला चहामधून गुंगीचे औषध देत हा प्रकार केला होता. याप्रकरणी मूळच्या यूपीच्या असलेल्या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. दुसरीकडे विवाहित महिलेचा छळ केल्याप्रकरणी तिच्या सासरच्या लोकांवरही अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
कोपरखैरणे येथील माहेर आणि सीबीडी येथील सासर असलेल्या विवाहित महिलेची शिळफाटा मंदिरातील पुजाऱ्यांनी हत्या केल्याची धक्कादायक प्रकार घडला होता. 6 जुलै रोजी सीबीडीतून घर सोडून गेलेल्या महिलेची 10 जुलै रोजी शिळफाटा येथे हत्या झाल्याचे समोर आले.
Shilphata Gngrape Murder Case : घरात वाद झाल्यानंतर मंदिरात गेली
घरामध्ये भांडण झाल्यानंतर शिळफाटा येथील डोंगरात असलेल्या मंदिरात जाऊन ही विवाहित तरूणी बसली होती. बराच वेळ मंदिरात बसलेल्या तरूणीला एकटी पाहून मंदिरातील तीन पुजाऱ्यांनी तिला चहामधून गुंगीचे औषध दिले. यानंतर त्या तिघांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला.
अत्याचार केल्यानंतर पुजाऱ्यांनी हत्या केली
ती महिला शुद्धीवर आल्यानंतर आपले बिंग फुटेल या भीतीपोटी तिघांनी विवाहित महिलेची गळा दाबून हत्या केली आणि बॅाडी डोंगरात टाकली. त्यानंतर चार दिवसापासून मिसिंग असलेल्या या महिलेची हत्या झाल्याचे समोर आले.
मोबाईलचे कॅाल ट्रेसिंग आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून या प्रकरणाचा तपास करण्यात आला. त्याचबरोबर तिच्या संपर्कातील लोकांना विचारले असता संबंधित महिला शिळफाटा येथील मंदिरात गेल्याचं समोर आलं. त्या दरम्यान मंदिरातील तीन आरोपींपैकी एक आरोपी फरार झाला होता, तर दोघे जण तिथेच होते. या दोघांकडे कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबुल केला.
अत्याचार करणारे आरोपी पुजारी उत्तर प्रदेशातील
मंदिरात पुजारी असलेले तिघे आरोपी मूळचे उत्तर प्रदेशमधील आहेत. या तिघांनाही अटक करण्यात आली आहे. दुसरीकडे सासरी छळ केल्यानेच विवाहित महिला घर सोडून गेली होती. त्यामुळेच हा प्रसंग ओढवला असल्याने तिच्या घरचेही जबाबदार असल्याने नवरा, सासू, सासरे यांना पोलिसांनी अटक केली आहे.
या विवाहित महिलेला न्याय मिळावा, केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालावी आणि आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी रविवारी नवी मुंबईकरांनी कोपरखेरणे ते वाशी असा भव्य मोर्चा काढला होता.
ही बातमी वाचा: