Mumbai Crime News : निवडणुकीदरम्यान मुंबईत सापडलं पैशाचं घबाड, भांडुपमधील पैशाने भरलेल्या गाडीबाबत मोठा खुलासा
Lok Sabha Election 2024 : निवडणुकीच्या काळात पैशांचा गैरवापर होण्याची शक्यता असते. त्यामुळे मुंबईच्या भांडुपमध्ये पैशाने भरलेली गाडी सापडल्याने मोठी खळबळ उडाली होती.
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर पैशाचा गैरव्यवहार होऊ नये यासाठी पोलीस आणि तपास यंत्रणा अलर्टवर आहेत. निवडणुकीच्या काळात पैशांचा गैरवापर होण्याची शक्यता असते, अशातच मुंबईच्या (Mumbai) भांडुपमध्ये (Bhandup) पैशाने भरलेली गाडी सापडल्याने मोठी खळबळ उडाली होती. आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. भांडुपच्या सोनापूर विभागात मध्यरात्री निवडणूक भरारी पथकाने सुमारे तीन कोटी रुपये ताब्यात (Cash Seized) घेतले होते आणि त्याचा तपास सुरु होता, आता या प्रकरणी मोठी खुलासा झाला आहे.
भांडुपमध्ये सापडली पैशाने भरलेली गाडी
भांडुप पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय खंडागळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाने शनिवारी रात्री सिक्युर (Secure) कंपनीची गाडी (Van) जप्त केली होती. पोलिसांना संशय आल्यामुळे ती व्हॅन ताब्यात घेण्यात आली होती. गाडीमध्ये पैसे होते आणि त्यासंदर्भातील कागदपत्रे कमी होती. पोलीस तपासानंतर आढळलं आहे की, ही गाडी रोज एटीएम मध्ये पैसे भरण्यासाठी जात असते, ही गाडी घाटकोपर, मानखुर्दपर्यंत जाते. त्यात एकूण 2 कोटी 25 लक्ष 3 हजार रुपये सातशे रक्कम आढळली. यासंदर्भात पुढील चौकशी सुरु आहे.
3 कोटी 93 लाख रुपयांहून रोख रक्कम जप्त
भांडुपच्या सोनापूर विभागात मध्यरात्री निवडणूक भरारी पथकाने सुमारे तीन कोटी रुपये ताब्यात घेतले, हे पैसे नक्की कुणाचे, याचा मालक कोण याचा अजूनही ही तपास सुरू आहे. आतापर्यंत निवडणूक भरारी पथकाने ईशान्य मुंबईमध्ये 3 कोटी 93 लाख रुपयांहून अधिक संशयित रक्कम जप्त करत मुलुंड, भांडुप, मानखुर्द, घाटकोपर विभागात कारवाई करण्यात आली आहे. सध्या संशयित व्हॅन आणि त्यातील कर्मचारी यांची पोलीस चौकशी करीत आहेत. ही गाडी एटीएममध्ये पैसे भरण्यास जात असल्याचं सांगितलं जात आहे, मात्र पूर्ण चौकशी होत नाही, तोपर्यंत हे पैसे संशयाच्या घेऱ्यात असून पोलिसांच्या ताब्यात आहेत.
नाकाबंदी दरम्यान निवडणूक भरारी पथकाची कारवाई
भांडुपमध्ये मध्यरात्री सापडलेली कॅशनने भरलेली व्हॅन पोलिसांच्या ताब्यात आहे. भांडुप येथील सोनापूर सिग्नलवर कॅशने भरलेली व्हॅन भांडुप पोलिसांनी ताब्यात घेतली होती. शनिवारी रात्री उशिरा सोनापूर सिग्नल येथे नाकाबंदी सुरू असताना निवडणूक भरारी पथकाने कॅशने भरलेली व्हॅन पकडली. मिळालेल्या माहितीनुसार, या व्हॅनमध्ये तीन ते साडे तीन कोटी रुपये असल्याची माहिती आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :