एक्स्प्लोर

Mumbai Crime News: मुंबईत रात्रीच्या पोलीस नाकाबंदीत पैशांचं घबाड सापडलं, गाडीचा दरवाजा उघडताच सगळेच चक्रावले

Maharashtra Politics:सध्या लोकसभा निवडणुकीचा काळा सुरु असल्याने या काळात मतदारांना पैसे वाटण्याचे किंवा मोठ्याप्रमाणावर रोख रक्कम सापडण्याचे प्रकार समोर येत आहेत. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शनिवारी रात्री एक चक्रावून टाकणारा प्रकार समोर आला.

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या काळात गैरप्रकार टाळण्यासाठी दक्ष असलेल्या निवडणूक भरारी पथकाकडून शनिवारी रात्री मुंबई उपनगर परिसरात मोठी कारवाई करण्यात आली. यावेळी पैशांचे मोठे घबाड त्यांच्या हाती लागले. भांडूप परिसरात शनिवारी रात्री निवडणूक भरारी पथकाकडून नाकेबंदी (Police Nakabandi) करुन गाड्यांची तपासणी सुरु होती. यावेळी सोनापूर सिग्नलवर एका गाडीत मोठ्याप्रमाणावर रोकड (Cash Seized) आढळून आली. गाडीत आढळून आलेली रक्कम ही जवळपास तीन ते साडेतीन कोटींच्या घरात असल्याचे समजते. 

गाडीत रोख रक्कम असल्याचे समजल्यानंतर ही गाडी तात्काळ भांडूप पोलीस ठाण्यात नेण्यात आली. याठिकाणी गाडीतील पैशांची मोजणी करण्यात आली. ही रक्कम जवळपास साडेतीन कोटींच्या घरात असल्याचे कळाल्यानंतर आयकर विभागाचे कर्मचारी पोलीस ठाण्यात दाखल झाले. आयकर खात्याचे कर्मचाऱ्यांनी पोलिसांकडून माहिती घेतल्यानंतर तपासाला सुरुवात केली आहे. 

नेमकं काय घडलं?

निवडणूक भरारी पथकाकडून भांडूपच्या सोनापूर सिग्नलजवळ नाकेबंदी करण्यात आली होती. यावेळी एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी वापरण्यात येणारी एक गाडी पोलिसांनी अडवली. या गाडीची तपासणी केली तेव्हा त्यामध्ये तीन ते साडेतीन कोटी रुपये आढळून आले. व्हॅनमधील सुरक्षा रक्षक आणि कर्मचाऱ्यांकडे अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता त्यांना या रोकड रक्कमेविषयी समाधानकारक स्पष्टीकरण देता आले नाही. त्यामुळे निवडणूक भरारी पथकाने ही व्हॅन भांडूप पोलिसांच्या ताब्यात दिली. ही रोकड रक्कम कुठून आणि कशी आली, याबाबत आयकर विभागाचे अधिकाऱ्यांना पोलीस ठाण्यात बोलवण्यात आले असून आयकर विभागाचे अधिकारी ,निवडणूक भरारी पथक अधिकारी आणि पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक एम.के. मढवींना आज न्यायालयात सादर करणार

कळव्यातील केबल व्यावसायिकाकडून खंडणी घेतल्याप्रकरणी शनिवारी रात्री नवी मुंबईतील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक एम के मढवी यांना अटक करण्यात आली होती. एक लाखांची खंडणी घेताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले होते. ठाण्यातील खंडणी विरोधी पथकाने एम के मढवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आज रविवार असल्याने सुट्टीच्या विशेष सत्र न्यायालयात एम के मढवी याना सादर करणार असून पोलीस अधिकची पोलीस कोठडी मागण्याची शक्यता आहे . अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये एम के मढवी आणि त्यांच्या चालकाचा समावेश आहे.

आणखी वाचा

100 कोटींचं घबाड, 40 लाखांची कॅश, किलोंमध्ये सोनं, नोटा मोजून थकले अधिकारी, कोण आहे हा 'कुबेर'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget