एक्स्प्लोर

Mumbai Crime : मुंबईत गार्डनमध्ये खेळताना खड्ड्यात पडून 2 मुलांचा मृत्यू, बॅरिकेटिंग नसल्यानं जीव गमावला

Mumbai Crime News : मुंबईच्या अॅन्टॉप हिल परिसरात गार्डनमध्ये खेळताना 2 चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. बॅरिकेटिंग नसल्यानं या चिमुकल्यांना जीव गमवावा लागला आहे.

Mumbai Crime News : मुंबईच्या अॅन्टॉप हिल परिसरात गार्डनमध्ये खेळत असताना खड्ड्यात पडून 2 लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. अॅन्टॉप हिलमधल्या सेक्टर 7 परिसरात ही घटना घडली आहे. इथं पाईपलाईनचं टाकण्याचं काम सुरु होतं, मात्र त्यावेळी तिथं बॅरिकेटिंग न केल्यानं दुर्घटना घडल्याचं बोललं जातं आहे. 12 वर्षीय यशकुमार चंद्रवंशी आणि 9 वर्षीय शिवम जैस्वाल अशी मृत मुलांची नावं आहेत. हे दोघं उद्यानात खेळत होते, त्यावेळी पाईपालाईन दुरुस्तीकरीता खणण्यात आलेल्या खड्ड्यात पडून त्यांचा मृत्यू झाला.  

मुंबईतल्या ॲन्टॉप हिल परिसरातल्या सेक्टर 7 मधल्या उद्यानात पाइपलाइन दुरुस्तीचं काम सुरु होते. त्यासाठी खड्डा खोदण्यात आला होता. मोठ्या प्रमाणात खड्ड्यात पाणी साचल्यानं दोन मुलांचा यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यासंबंधी पोलिसांनी कॉन्ट्रॅक्टरला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरु असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान, याप्रकरणी नातेवाईकांकडून आता सीपीडब्लूडीचे अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. 

ॲन्टॅाप हिल सी. जी. एस कॉलनी, सेक्टर 07 येथील उद्यानात पाईपलाइन दुरुस्तीकरता खणण्यात आलेल्या खड्ड्यात पाणी साचून तिथं पाण्याचं डबकं बनलं होतं. सदर मैदानात खेळणारी दोन मुलं पाण्याच्या डबक्यात पडली असल्याचं आढळून आल्यानं सदर मुलांना तात्काळ पाण्यातून बाहेर काढून सायन रुग्णालय, मुंबई येथे उपचाराकरता नेण्यात आलं. परंतु, रुग्णालयात जाण्यापूर्वीच या चिमुकल्यांचा मृत्यू झाला होता. 

मुलांना उपचारासाठी रुग्णालत दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी दोन्ही मुलांना मयत घोषित केलं. घडल्या प्रकाराची माहिती पोलिसांना कळताच पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरु केला आहे. तसेच, घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या मुलांच्या नातेवाईकांचा शोध घेतल्यानंतर या मुलांची ओळख पटली.  दरम्यान, सदर प्रकरणी अॅन्टॉप हिल पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसचे चिमुकल्यांचा शवविच्छेदन अहवान प्राप्त झाल्यानंतर घटनास्थळी पाईपलाईन दुरुस्तीचे काम करताना योग्य त्या सुरक्षिततेच्या उपायोजना केल्या नसल्यानं ही दुर्घटना घडल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे. यासंबंधी पोलिसांनी कॉन्ट्रॅक्टरला ताब्यात घेतलं आहे. तसेच याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Worli Hit and Run Car CCTV | वरळी हिट अँड रन प्रकरणी सीसीटीव्ही समोर ABP MajhaNilesh Lanke Tractor Rally | खासदार निलेश लंकेंच्या नेतृत्वात शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर रॅली!  ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 05PM TOP Headlines 05PM 07 July 2024Raju Waghmare : Worli Hit and Run प्रकरण दुर्दैवी, CM Eknath Shinde कुणाला पाठीशी घालणार नाहीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Embed widget