वाढदिवसाच्या पार्टीला बोलावलं नाही म्हणून भरदिवसा प्रेयसीची हत्या, नांदेडमध्ये प्रियकर गजाआड
Nanded Crime Updates : काल नांदेड शहरात प्रेम प्रकरणातून तरुणीचा भरदिवसा रहिवाशी वस्तीत निघृण हत्या झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Nanded Crime Updates नांदेड: रागाच्या भरात माणूस काय करील त्याचा नेम नाही. अगदी सर्वात जास्त प्रेम करणाऱ्या व्यक्तिलाही एखादी व्यक्ती रागाच्या भरात संपवून टाकते. अशीच एक धक्कादायक घटना नांदेडमध्ये घडली आहे. प्रेयसीची तिच्या वाढदिवसाच्या दिवशीच प्रियकरानं हत्या केली आहे. या घटनेने नांदेड शहरात खळबळ उडाली आहे. काल नांदेड शहरात प्रेम प्रकरणातून तरुणीचा भरदिवसा रहिवाशी वस्तीत निघृण हत्या झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रेमप्रकरणातून सुरेश शेंडगे या तरुणाने आपल्या मैत्रिणीचा गळा चिरून निघृण हत्या करण्यात आल्याची घटना काल नांदेड शहरात घडली होती.
नांदेड शहरातील येथील शारदा नगर परिसरात राहणाऱ्या 22 वर्षीय तरुणीचे पांगरी येथील 26 वर्षीय सुरेश देवदास शेंगडे यांच्यात मागील दोन चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र मित्र मैत्रिणींना वाढदिवसा निमित्त कॅफे सेंटरमध्ये दिलेल्या पार्टीला न बोलविल्याने व टाळत असल्याने सुरेश व त्याच्या मैत्रिण यांच्यात वाद झाला. यात सुरेश शेंडगे याने आपल्या प्रेयसीचा गळा चिरून हत्या केल्याची घटना विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलीय.
काल हत्या झालेल्या तरुणीचा वाढदिवस होता. त्यामुळे कुटुंबियासह मित्र मैत्रिणींमध्ये आनंदाचे वातावरण होते. परंतु त्याच दिवशी तिचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पाहण्याची वेळ कुटुंबियांना आली. भरदिवसा रहिवाशी वस्तीत झालेल्या या निघृण हत्येमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर पोलीस निरीक्षक अनिरुद्ध काकडे यांनी तपासाचे सूत्रे हलवून काही तासातच सुरेश शेंडगे यास अटक केली आहे.
Nagpur :प्रेमप्रकरणाचं बिंग फुटू नये म्हणून बहिणीकडून कथित प्रियकराच्या मदतीने 12वर्षीय भावाची हत्या