(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ट्युशन क्लासला जाणाऱ्या विद्यार्थिनीला लुटले, गोरेगाव पोलिसांनी 24 तासात आरोपींना ठोकल्या बेड्या
Crime News : ट्युशन क्लासला निघालेल्या विद्यार्थिनीला लुटणाऱ्या दोन सोन साखळी चोरांना गोरेगाव पोलिसांनी 24 तासात जेरबंद केले आहे. मुंबईच्या गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली होती.
Crime News : मुंबईच्या गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत क्लासला निघालेल्या विद्यार्थिनीला लुटणाऱ्या दोन सोन साखळी चोरांना गोरेगाव पोलीसांनी 24 तासात जेरबंद केले आहे. सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात मालाड, दहिसर, बांगूर नगर आदी पोलीस ठाण्यात घरफोडी, लूट सारखे डझनभर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेऊन मुद्देमाल हस्तगत केला आहे. जनेंद्र नरसिंगराव कोया उर्फ जानी ( वय, 22) आणि ऋषिकेश प्रकाश दळवी उर्फ बाबू काल्या (वय, 22) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, 22 फेब्रुवारी रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास एक विद्यार्थिनी ट्युशनसाठी जात होती. त्यावेळी रस्त्यावरून जात असताना दोन तरुण आले आणि तिच्या गळ्यातील आठ ग्राम वजनाची सोन्याची चैन खेचून पळाले. विद्यार्थिनीने विरोध केला. मात्र, त्यांनी तिला धक्का देऊन ते पळून गेले. या घटनेनंतर विद्यार्थिनीने सर्व हकीगत आपल्या आईला सांगितली. यानंतर आईने गोरेगाव पोलीस ठाण्यात दोन अज्ञात चोरांविरोधात तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून पोलिसांनी कलम 392 नुसार गुन्हा नोंद करून तपासास सुरुवात केली.
गोरेगाव पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी शिवाजी जाधव, नीलिमा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सुदर्शन पाटील, पोलीस हवालदार सावंत, वारंगे, शेख, पाटील, चव्हाण या सर्वांची टीम घटनास्थळावर पोहोचून परिसरातील 30 पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून आरोपीची ओळख पटवली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन तरुण बाईक वरून मुलीच्या मागे मागे येत असल्याचे आढळून आले. तांत्रिक बाबींचा तपास करून आरोपीला 23 फेब्रुवारी रोजी गोरेगाव परिसरात अटक करून कोर्टात हजर केले असता आरोपीला 27 फेब्रुवारी पर्यंत पोलीस पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
सध्या गोरेगाव पोलीसांनी या आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद केला असून मुंबई परिसरात आणखी काही नवीन गुन्हा या आरोपींनी केला आहे का या संदर्भात अधिक तपास गोरेगाव पोलीस करत आहेत, अशी माहिती गोरेगाव पोलीस ठाण्याचे
सहायक पोलीस निरीक्षक सुदर्शन पाटील यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या