सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील आरोपी जेलमध्येच भिडले, चकमकीत दोन गुंडांची हत्या
Sidhu Moose Wala murder case : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील आरोपींमध्ये झालेल्या चकमकीत दोन गुंडांची हत्या झाली आहे.
Sidhu Moose Wala murder case : पंजाबी गायक सिद्धू मूसवाला खून प्रकरणातील आरोपी मनदीप तुफान, मनमोहन आणि केशव या गुंडांमध्ये रविवारी संध्याकाळी जोरदार चकमक झाली. यात गँगस्टर मनदीप तुफान आणि मनमोहन ठार झाले आहेत. तर गुंड केशव गंभीर जखमी झाला आहे. उचारासाठी त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सिद्धू मूसवाला हत्याकांडातील तीन आरोपी पंजाबमधील गोइंदवाल कारागृहात आहेत, तेथे त्यांच्यात हाणामारी झाली.
प्राथमिक माहितीनुसार, गुंड मनदीप सिंग तुफानची कारागृहातील कैद्यांशी काही कारणावरून भांडण झाले होते. यानंतर कैद्यांनी त्याला बेदम मारहाण केली. या हाणामारीत अन्य तीन ते चार कैदीही जखमी झाल्याची माहिती आहे. मनदीप तुफान, मनमोहन आणि केशव हे देखील या मारहाणीत गंभीर जखमी झाले होते. जखमींना तुरूंग प्रशासनाने तात्काळ रूग्णालयात दाखल केले. परंतु, रूग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मनदीप आणि मनमोहन यांचा मृत्यू झाला. तर गंभीर जखमी असलेल्या केशव याच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास तरनतारन येथील गोइंदवाल मध्यवर्ती कारागृहात आरोपी एकमेकांशी भिडले. यावेळी जोरदार चकमक झाली. यात अनेक आरोपींना गंभीर दुखापत झाली आहे. तर दोन गुंडांचा मृत्यू झाला, अशी माहिती डीएसपी जसपाल सिंह ढिल्लन यांनी दिली.
मृत तूफान हा सिद्धू मूसवाला खून प्रकरणातील आरोपी होता. याच प्रकरणी मनदीप तुफान याला पोलिसांनी गँगस्टर मनी रियासह अटक केली होती. तुफानला तरनतारनच्या वैरोवाल ठाणे अंतर्गत खाख गावातून अटक करण्यात आली होती. गँगस्टर मनदीप तुफान जग्गू हा भगवानपुरिया टोळीचा शार्प शूटर होता. जग्गू भगवानपुरियाची चौकशी केल्यानंतर त्याचे नाव मूसवाला खून प्रकरणात समोर आले होते. गँगस्टर मनमोहन आणि केशव हेही मूसवाला खून प्रकरणात मुख्य आरोपी आहेत. याच प्रकरणातील आरोपींना देखील पोलिसांनी अटक केली असून तपास सुरू आहे.
Sidhu Moose Wala murder case : सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या घालून हत्या
सिद्धू मुसेवाला याची मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. आप सरकारनं सुरक्षा काढून घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही घटना घडली होती. मागच्या वर्षी झालेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीत मुसेवाला याने मानसा जिल्ह्यातून काँग्रेस कडून निवडणूक लढवली होती. त्यांचा आम आदमी पक्षाच्या डॉ. विजय सिंघला यांनी पराभव केला होता.