(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Crime News: धक्कादायक घटनांनी मुंबई हादरली; निष्पाप चिमुरडीवर अत्याचार, तर विद्यार्थीनीचा शिक्षकाकडून विनयभंग
Mumbai Crime: मुंबईत दोन वेगवेगळ्या भागात अत्याचाराच्या घटना उघडकीस आल्या आहेत. दोन्ही घटनांमध्ये महाराष्ट्र पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपींना अटक करून तपास सुरू केला.
Maharashtra Mumbai Crime News: दोन वेगवेगळ्या धक्कादायक घटनांनी मुंबई (Mumbai Crime) पुन्हा हादरली आहे. मुंबईत (Mumbai News) बलात्काराच्या दोन वेगवेगळ्या घटना समोर आल्या आहेत. एक घटना वडाळा टीटी पोलीस स्टेशनच्या (Wadala Police Station) हद्दीत घडली आहे, तर दुसरी घटना अँटॉप हिल पोलीस स्टेशनच्या (Antop Hill Police Station) हद्दीत. दोन्ही घटनांमध्ये दोन अल्पवयीन चिमुकल्या नराधमांच्या अत्याचाराला बळी पडल्या आहेत. दोन्ही घटनांमध्ये पोलिसांनी (Mumbai Police) तपासाची सूत्रं वेगानं लवत नराधमांना बेड्या ठोकल्या आहेत.
वडाळ्यात वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार
मुंबईतील वडाळा टीटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 4 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार झाल्याची पहिली घटना उघडकीस आली आहे. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी 23 वर्षीय आरोपीविरुद्ध कलम 376 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. त्याला आयपीसी आणि पॉक्सो कायद्यान्वये अटक करून न्यायालयात हजर करण्यात आलं आहे. यानंतर न्यायालयानं आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे.
वडाळा टीटी पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, चिमुकली एकटी असल्याचं पाहून आरोपीनं तिला एका कारखान्यात नेलं आणि तिच्यावर अत्याचार केला. पीडित मुलीच्या आईनं पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी हा पीडित मुलीच्या ओळखीचाच असून त्याने याचाच गैरफायदा घेतल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
अँटॉप हिल परिसरात 16 वर्ष्यांच्या तरुणीचा विनयभंग
मुंबईतील अँटॉप हिल पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ट्यूशनच्या बहाण्यानं 16 वर्षीय मुलीसोबत शिक्षकानं गैरकृत्य केल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, याप्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरुन आरोपी शिक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अँटॉप हिल परिसरात राहणारी एक 16 वर्षीय तरुणी एका व्यक्तीकडे खासगी शिकवणीसाठी जात होती. ट्युशनच्या बहाण्यानं आरोपीनं मुलीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थिनीनं ट्यूशनला येणं बंद केलं आणि तिच्या कुटुंबीयांना संपूर्ण घटनेची माहिती दिली. मुलीनं वेळीच कुटुंबीयांना घडल्या प्रकारासंदर्बात माहिती दिल्यानं हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच, याप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू केला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :