एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

धक्कादायक! गावातील महिलांना व्हिडिओ कॉल करून करायचा शरीर सुखाची मागणी; आतापर्यंत 30 पेक्षा अधिक महिलांना फोन

Chhatrapati Sambhaji Nagar : व्हिडिओ कॉल गावातील कोणत्या ठिकाणाहून आला याचा अंदाज महिलेच्या पतीला आला आणि आरोपीचा भांडाफोड झाला.

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पाचोड पोलीस ठाणे हद्दीतील मुरमा गावात एक किळसवाणा प्रकार समोर आला आहे. 29 वर्षीय एक तरुण गावातील महिलांना व्हिडिओ कॉल (Video Call) करून त्यांच्याकडे शरीर सुखाची मागणी करायचा. विशेष म्हणजे फोन केल्यावर सात-आठ दिवस फोन बंद करून ठेवायचा. आतापर्यंत त्याने गावातील 30 पेक्षा अधिका महिलांना अशाचप्रकारे व्हिडिओ कॉल आणि फोन कॉल केले आहेत. त्यामुळे मागील काही दिवसांपासून गावातील महिलांमध्ये संतापाचे वातावरण पाहायला मिळत होते. दरम्यान, या तरुणाने अशाच एका महिलेला व्हिडिओ कॉल केला आणि तो कॉल महिलेच्या पतीने उचलला. त्यामुळे व्हिडिओ कॉल गावातील कोणत्या ठिकाणाहून आला याचा अंदाज महिलेच्या पतीला आला आणि आरोपीचा भांडाफोड झाला. या प्रकरणी पोलिसांत आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानेश्वर बाबासाहेब मगरे,(वय 28 ) असे आरोपीचे नाव आहे. 

याविषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पैठण तालुक्यातील मुरमा येथील ज्ञानेश्वर मगरे याची  मुरमा फाटा येथे चहापाणी नाष्ट्याची हॉटेल आहे. दरम्यान, याच हॉटेलमध्ये बसून तो दररोज गावातील वेगवेगळ्या महिलांना व्हिडिओ कॉल आणि फोन कॉल करायचा. त्यानंतर महिलांसोबत अश्लिल भाषेत संवाद करायचा. विशेष म्हणजे मागील चार ते पाच महिन्यापासून सतत हा प्रकार सुरु होता. त्यामुळे गावातील महिलांनी कुटुंबातील सदस्यांना देखील याबाबत माहिती दिली होती. मात्र, व्हिडिओ कॉल केल्यावर ज्ञानेश्वर हा तो नंबर पुढील सात-आठ दिवस बंद ठेवायचा. त्यामुळे त्यावर संपर्क होऊ शकत नव्हता. दुसऱ्यांदा फोन आला नाही म्हणून संबंधित महिला आणि त्याचे कुटुंब देखील त्या गोष्टीचा पुढे कुठेही वाच्यता करत नव्हते. परंतु, दुसऱ्या दिवशी ज्ञानेश्वर हा पुन्हा दुसऱ्या महिलेला फोन करायचा. त्यामुळे गावातील नागरिक यामुळे वैतागले होते. 

असा झाला भांडाफोड...

दरम्यान, ज्ञानेश्वर याने गुरुवारी सायंकाळी पुन्हा एकदा गावातील एका महिलेला व्हाट्सअपवर व्हिडिओ कॉल केला. मात्र, यावेळी त्या महिलेचा पती घरी असल्याने त्यांनी व्हिडिओ कॉल उचलला. तसेच गावातील महिलांना व्हिडिओ कॉल करणारा हाच व्यक्ती असल्याचे त्यांचे लक्षात आले. तर, व्हिडिओ कॉलमध्ये दिसणारे ठिकाण त्यांनी तत्काळ ओळखले आणि मुरमा फाटा येथील हॉटेलमधून कोणीतरी हे कॉल करत असल्याची त्यांची खात्री झाली. त्यामुळे त्यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन शहानिशा केली. दरम्यान, हॉटेल चालक ज्ञानेश्वर मगरेच हा गावातील महिलांना फोन करतो याबाबत देखील त्यांनी खात्री केली. 

गावकरी थेट हॉटेलवर जाऊन धडकले 

दुसऱ्या दिवशी महिलेच्या पतीने गावातील नागरिकांना घडलेल्या प्रकारची माहिती दिली. त्यामुळे अनेक गावकरी थेट त्यांच्या हॉटेलवर जाऊन धडकले. तसेच, त्याला जाब विचारत त्याच्या मोबाईल तपासला. यावेळी गावातील अनेक महिलांचे त्याच्या मोबाईलमध्ये नंबर सेव असल्याचे समोर आले. तसेच, त्याने गावातील आतापर्यंत 30 पेक्षा अधिक महिलांना व्हिडिओ कॉल आणि फोन कॉल केल्याचे देखील समोर आले. त्यामुळे गावातील काही तरुणांनी त्याला चोप दिला. त्यानंतर आरोपी ज्ञानेश्वर बाबासाहेब मगरे गावातून फरार झाला. दरम्यान, शनिवारी दुपारी एका महिलेच्या तक्रारीवरून ज्ञानेश्वर मगरे यांच्याविरुद्ध पाचोड पोलीस ठाण्यामध्ये विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरेश माळीसह गोविंद राऊत हे करत आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Ratnagiri Crime News: व्हिडीओ कॉलवर तरुण झाला नग्न; ब्लॅकमेल करून महिलेनं उकळले 50 हजार!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rashmi Shukla Maharashtra Police | रश्मी शुक्लांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्तीRajkiya Shole | 57 जागा जिंकणाऱ्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद मिळणार का? ABP MajhaJaykumar Gore - Rahul Kool : सर्व पवार 'ही' काळज घेतात..कुल-गोरेंनी सगळंच सांगितलं EXCLUSIVEZero Hour on India Match Wins | भारतानं कांगारूंचा दुसरा डाव 295 धावांत गुंडाळला ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Embed widget