एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

Crime News : दोन्ही मुलं तळ्यात बुडून मेल्याचा बनाव, प्रियकरासाठी कुंभाड रचलं; आईनेचं पोटच्या गोळ्यांना संपवलं

Crime News : प्रेमात अडथळा होऊ नये यासाठी आईच आपल्या मुलांच्या जीवावर उठली असल्याचं या घटनेत समोर आले असून दोघा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

संगमनेर : प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पोटच्या दोन्ही मुलांना आईनेच संपवल्याची धक्कादायक घटना संगमनेरमध्ये समोर आली आहे. आईनेच प्रियकराच्या साथीने मिळून दोन मुलांची हत्या केल्याचं समोर आलं आहे. सुमारे दोन महिन्यानंतर पोलिसांना दोन्ही मुलांच्या मृत्यूचं गूढ उकलण्यात यश आलं आहे. आईच आपल्या मुलांच्या जीवावर उठली असल्याचं या घटनेत समोर आलं असून दोघा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

दोन्ही मुलं तळ्यात बुडून मेल्याचा बनाव

दोन महिन्यांपूर्वी संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे दोघा भावंडांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद देखील केली. मात्र हे प्रकरण संशयास्पद असल्याचा संशय गावकऱ्यांना आलेला होता. आता दोन महिन्यानंतर या दोन संख्या भावंडांचा शेततळ्यात बुडून नव्हे तर, घातपात असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. धक्कदायक बाब म्हणजे आपल्या प्रेमात अडथळा असणाऱ्या मुलांना जनमदात्या आईने आणि तिच्या प्रियकरानेच शेततळ्यात ढकलून संपविल्याचं एका साक्षीदाराच्या साक्षीने उघड झालं आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.

दोन्ही मुलं तळ्यात बुडाल्याचा बनाव

17 एप्रिल 2024 रोजी संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे शेततळ्यात बुडून रितेश सारंगधर पावसे (वय 12 वर्ष) आणि प्रणव सारंगधर पावसे (वय 8 वर्ष) या दोघा भावंडांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. वर्षभर अगोदरच मुलांच्या वडिलांचा देखील मृत्यू झाला होता. त्यामुळे त्यांचा सांभाळ आई करत होती आणि मुलांचा देखील शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली होती. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद देखील करण्यात आली  होती. मात्र ग्रामस्थांनी हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय अनेकदा व्यक्त केला. मात्र,पुरावे नसल्याने पोलिस तपासात यश आले नाही.

प्रियकरासाठी आईनेचं पोटच्या मुलांचा काटा काढला

तब्बल दोन महिन्यानंतर एका साक्षीदाराने दिलेल्या जबाबावरून हा अपघात नव्हे तर खून असल्याचं समोर आले असून  या  दोन्ही मुलांचा घातपात जन्मदाती आई कविता सारंगधर पावसे आणि तिचा प्रियकर सचिन बाबाजी गाडे यांनी केला असल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलिसांनी सचिन बाबाजी गाडे  आणि मयत मुलांची आई कविता या दोघांना अटक केली असल्याची माहिती संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांनी दिली आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

अभिनेते अनुपम खेर यांच्या ऑफिसमध्ये घुसले चोर, दरवाजा तोडला; चित्रपटाचे नेगेटिव्ह चोरीला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Exit Poll | रिपब्लिकच्या Exit Poll नुसार महायुतीला 137-157 तर मविआला 126-146 जागाBaramati Public Reaction on Polls : बारामतीकरांनी कुठला दादा निवडला? मतदानानंतर बिनधास्त बोलले!Maharashtra Exit Poll 2024 | तावडेंचा गेम फडणवीसांनी केला? Exit Poll वर सुषमा अंधारेंच प्रतिक्रियाPune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Maharashtra Exit Polls Result : राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
Maharashtra Exit Polls 2024 : भाजप की काँग्रेस? एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार सर्वात मोठा पक्ष कोणता? अजितदादा-ठाकरेंना किती जागा?
भाजप की काँग्रेस? एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार सर्वात मोठा पक्ष कोणता? अजितदादा-ठाकरेंना किती जागा?
Embed widget