अभिनेते अनुपम खेर यांच्या ऑफिसमध्ये घुसले चोर, दरवाजा तोडला; चित्रपटाचे नेगेटिव्ह चोरीला
Anupam Kher Office Theft : अनुपम खैर यांच्या मुंबईतील कार्यालयात चोरीचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर येत आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर (Anupam Kher) यांच्या कार्यालयावर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. अनुपम खेर यांच्या मुंबईतील कार्यालयात चोरीचा प्रयत्न (Bollywood Actor Anupam Kher Office Theft) झाल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईच्या व्हिरा देसाई रोड येथील खेर यांच्या कार्यालयात दोन चोर चोरीच्या उद्देशाने शिरले. मात्र, अकाऊंट डिपार्टमेंटचा दरवाजा तोडण्यात चोर अपयशी ठरले. दरम्यान, त्यांच्या कार्यालयातून एक चित्रपटाचे नेगेटिव्ह चोरांनी चोरी केल्याचा खेर आरोप यांनी केला आहे. ही चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे.
अनुपम खेर यांच्या कार्यालयावर चोरट्यांचा डल्ला
अभिनेते अनुपम खेर यांच्याकडून अंबोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल (Amboli Police Station) करण्यात आली असून अंबोली पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. यासंदर्भातील माहिती अनुपम खेर यांनी एक्स मीडिया पोस्टवरून दिली आहे. अनुपम खेर यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे की, काल रात्री वीरा देसाई रोडवरील माझ्या कार्यालयात दोन चोरट्यांनी माझ्या कार्यालयाचे दोन दरवाजे तोडून लेखा विभागातील संपूर्ण तिजोरी (जो कदाचित त्यांना तोडू शकला नसावा) आणि आमच्या कंपनीने बनवलेल्या चित्रपटाचे निगेटिव्ह बॉक्स चोरून नेले. आमच्या कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे दिसले. कार्यालयातील लोकांनी चित्रित केलेला हा व्हिडीओ पोलिसांना घटनास्थळी येण्याआधीचा आहे.
अनुपम खेर यांची एक्स पोस्ट
कल रात मेरे वीरा देसाई रोड वाले ऑफ़िस में दो चोरों ने मेरे ऑफ़िस के दो दरवाज़ों को तोड़ा और अकाउंटस डिपार्टमेंट से पूरा सेफ़ (जो शायद वो तोड़ नहीं पाये) और हमारी कंपनी द्वारा निर्मित एक फ़िल्म के नेगेटिव जो एक बॉक्स में थे, चुराकर ले गए।हमारे ऑफिस ने FIR करवा दिया है।और पुलिस ने… pic.twitter.com/aqmjfOINEM
— Anupam Kher (@AnupamPKher) June 20, 2024
19 जून रोजी घडली घटना
अनुपम खेर यांनी एक्स मिडिया पोस्ट व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अनुपम खेर यांच्या कार्यालयाचा दरवाजा वाईट अवस्थेत दिसत आहे. पोस्ट शेअर करताना, त्यांनी म्हटलं आहे की, बुधवारी चोरांनी मुंबईतील त्यांच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला आणि कार्यालयातील महत्त्वाच्या वस्तू चोरल्या. 19 जून रोजी दोन चोरट्यांनी मुंबईतील कार्यालयात घुसून तेथे असलेल्या चित्रपटाचे निगेटिव्ह चोरले. याप्रकरणी त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.