एक्स्प्लोर

Chhatrapati Sambhaji Nagar : लिफ्टमध्ये अडकून 14 वर्षीय मुलाचं शीर धडावेगळे; छत्रपती संभाजीनगरमधील दुर्दैवी घटना

Chhatrapati Sambhaji Nagar News : या घटनेची माहिती मिळताच जिन्सी पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी धाव घेतली.

Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगर शहरातील (Chhatrapati Sambhaji Nagar City) कटकट गेट परिसरात दुर्दैवी घटना समोर आली असून, हॉस्पिटलच्या (Hospital) परिसरात राहत असलेल्या 14 वर्षीय मुलाचे लिफ्टमध्ये डोके अडकून मृत्यू झाला आहे. नववीत शिकणाऱ्या या मुलाचे आई वडील हैदराबादला गेल्याने तो घरी एकटाच होता. घरी तिसऱ्या मजल्यावर खेळत असताना त्याने लिफ्टबाहेर डोके काढले. लगेचच लिफ्ट सुरू होताच त्याचे शीर शरीरापासून वेगळे झाले. या घटनेची माहिती मिळताच जिन्सी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. साकिब इरफान सिद्दीकी (वय 14 वर्षे) असं मृत मुलाचे नाव आहे. 

अधिक माहिती अशी की, साकिब एकुलता एक मुलगा होता. त्याला दोन बहिणी आहेत. साकिबचे वडील इरफान हे टूर्स अँड ट्रॅव्हल्स कार्यालयात काम करतात. त्यांचे मुख्य कार्यालय हैदराबाद येथे आहे. कामानिमित्त त्याचे आई-वडील हैदराबादला गेले आहेत. साकिब हा आजी- आजोबाकड ठेवलेला होता. रात्री तो लिफ्टमध्ये खेळत होता. त्याने खेळता-खेळता लिफ्ट सुरू केली आणि मुंडके बाहेर काढले. तोच, त्याचे मुंडके धडावेगळे झाले. त्यानंतर तेथे एकच धावपळ उडाली. त्याला मदत करण्याचीही संधी कोणाला मिळाली नाही. दरम्यान, रात्री उशिराला जिन्सी पोलिसांना ही माहिती मिळाली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह घाटी रुग्णालयात पाठविला. 

घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

इरफान सिद्दीकी हे ट्रॅव्हल्स कार्यालयात काम करतात आणि त्यांना साकिब एकुलता एक मुलगा होता. त्यामुळे साकिब घरात सर्वांचाच लाडका होता. तसेच आई-वडील बाहेर गेल्यास तो आजी-आजोबांकडे राहत असल्याने, इरफान आणि त्यांच्या पत्नी त्याला सोडून हैदराबादला गेले होते. मात्र लिफ्टमध्ये अडकून साकिबचं दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती मिळताच त्याच्या आई-वडिलांना धक्का बसला. तर सिद्दीकी कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. तर या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

काळजी घेण्याची गरज...

अनेकदा लहान मुलं रडत असल्यास लिफ्टमधील गाणे लावणे, मुलांना लिफ्टमधून खालीवर नेणे असे प्रकार आईवडिलांकडून केले जातात. त्यामुळे मुलांना द्खील लिफ्टची सवय लागती. तर अनकेदा आई-वडील नसताना देखील मुलं लिफ्टसोबत खेळतात. तर अशाप्रकारे दुर्दैवी घटना घडल्यास त्यातून स्वतःला वाचवणे देखील मुलांना शक्य होत नाही. त्यामुळे लिफ्टचा वापर लहान मुलांच्या खेळण्यासाठी करणे टाळले पाहिजे. तसेच लिफ्ट वापरताना मुलांची काळजी घेतली पाहिजे. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Chhatrapati Sambhaji Nagar : विहिरीत आढळला शिर नसलेला मृतदेह; संभाजीनगरच्या बहुलखेडा शिवारातील घटना

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pawan Kalyan Solapur Road Show : पवन कल्याण यांचा सोलापुरात भव्य रोड शो; नागरिकांची तोबा गर्दीSpecial Report Sharad Pawar : 'पवार'फुल खेळीची इनसाईड स्टोरी! 2014 सालची रणनीती काय होती?Special Report Mahayuti CM  Post : महायुतीच्या गोटात नेमकं काय सुरुय? पुढील मुख्यमंत्री कोण होणार?Special Report Pawar VS Dilip Walse Patil : 'गुरू'चा कोप, शिष्य भावूक; पवारांच्या टीकेवर वळसे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget