Nagpur Crime: निर्दयी बापाने फरशीवर आपटलेल्या चिमुकल्याचा मृत्यू, अकरा दिवसाची मृत्यूशी चाललेली झुंज अखेर अपयशी
Maharashtra Nagpur Crime News: पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत निर्दयी बापानं दोन दिवसांच्या बाळाला फरशीवर फेकलं. अखेर अकरा दिवसानंतर बाळाचा मृत्यू झाला आहे.
Maharashtra Nagpur Crime News: पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत निर्दयी बापानं जमिनीवर आपटलेल्या चिमुकल्याचा अकरा दिवसाच्या उपचारानंतर मृत्यू झाला आहे. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयत (Government Hospital Nagpur) चिमुकल्यावर उपचार सुरू होते. चिमुकल्याच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत मारहाण करत गिरीश गोंडाणे या व्यक्तीनं जन्मलेल्या चिमुकल्याला फरशीवर आपटलं. या क्रूर कृत्यामुळं बाळाला गंभीर इजा झाली असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात एनआयसीयुमध्ये उपचार सुरू होते. अखेरीस काल अकरा दिवसांच्या उपचारानंतर बाळाचा मृत्यू झाला. गिरीश गोंडाणे असं निर्दयी बापाचं नाव असून तो अमरावती जिल्ह्यातील (Amravti News) सावर्डीचा रहिवाशी आहे. नागपूर पोलिसांनी या अगोदर गिरीश विरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली होती. आता त्याच्या विरोधात हत्येचे प्रकरण दाखल करण्यात आले आहे.
गिरीश गोंडाणे आणि प्रतीक्षा गोंडाणे हे दोघेही एकाच गावात राहत असून त्यांचा प्रेमविवाह झाला होता. दोघांचा सुखी संसार सुरू होता. पण कालांतरानं दोघांच्या सुखी संसारात संशयाचं भूत शिरलं. त्यानंतर गिरीशनं पत्नीला मारहाण करण्यास सुरू केली. दररोज गिरीश पत्नीवर कोणत्या ना कोणत्या कारणानं संशय घ्यायचा आणि तिला मारहाण करायचा. प्रतीक्षा सगळं काही निमुटपणानं सहन करत होती. काही दिवसांनी प्रतीक्षाला दिवस गेले. अमरावतीहून तिला उपचारासाठी नागपुरात पाठवण्यात आलं.
31 डिसेंबर रोजी प्रतीक्षानं एका गोंडस बाळाला जन्म दिला. त्याच दिवशी रात्री साडेसहा वाजताच्या सुमारास नागपूरच्या शासकीय रुग्णालयात गिरीश प्रतीक्षा असलेल्या बॉर्डमध्ये आला. त्यावेळीही संशयाचं भूत त्याच्या डोक्यात फिरत होतंच. वॉर्डमध्ये प्रतीक्षाजवळ जाऊन त्यानं विचारपूस करण्याऐवजी तिच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. दोघांमधील वाद विकोपाला गेला. त्यानंतर संताप अनावर झालेल्या गिरीशनं मोठमोठ्यानं प्रतिक्षाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तो एवढ्यावरच थांबला नाहीतर त्यानं दोन दिवसांच्या बाळाला उचललं आणि उचलून फरशीवर आपटलं,
इतर महत्त्वाच्या बातम्या :