Naxal Attack : नक्षलवादी आणि जवानांमध्ये चकमक, लाखोंचे बक्षीस असलेल्या नक्षलवाद्यांचा खात्मा
Gondia Naxal Attack : गोंदिया जिल्ह्याशेजारील मध्यप्रदेशातील बालाघाट, मंडला आणि शेजारील जिल्ह्यात सध्यासुरू असलेल्या नक्षल निर्मूलन मोहिमेत सहभागी सुरक्षा दलाच्या जवानांना मोठे यश आले आहे.
Gondia Naxal Attack: गोंदिया जिल्ह्याशेजारील मध्यप्रदेशातील बालाघाट, मंडला आणि शेजारील जिल्ह्यात सध्यासुरू असलेल्या नक्षल निर्मूलन मोहिमेत सहभागी सुरक्षा दलाच्या जवानांना मोठे यश आले आहे. मध्यप्रदेश (Madhya Pradesh) महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेलगत मोठा घातपात घडवून आणण्याच्या बेताने दबा धरून बसलेल्या दोन नक्षलवाद्यांचा (Naxal) खात्मा करण्यात बालाघाट पोलिसांना यश आले आहे. ही घटना काल 1 एप्रिलच्या मध्यरात्रीच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे या चकमकीत ठार झालेल्या दोन्ही नक्षलवाद्यांवर (Naxal Attack) मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये पोलिसांनी 43 लाख आणि रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. या कारवाई मध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त केला असून या भागात भागात आणखी काही नक्षलवादी असण्याची शक्यता सुरक्षा दलाच्या जवानांनी वर्तवली आहे.
नक्षलवादी आणि जवानांमध्ये चकमक
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्षलग्रस्तभागात पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून नक्षलविरोधी अभियान अधिक तीव्र करण्यात आलं आहे. यांच अनुषंगाने गोंदिया जिल्ह्याशेजारील मध्यप्रदेशातील बालाघाट, मंडला आणि शेजारील जिल्ह्यात सुरू असलेल्या नक्षल निर्मूलन मोहिमेत बालाघाट जवळील केझरी जंगलात काही नक्षलवादी दबा धरून असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. दरम्यान,पोलिसांनी त्या दिशेने शोध घेतला असता अचानक पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या अंधाधुंद गोळीबारात पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर देत नक्षल्यांचा मनसुभा उधळून लावला आहे.
लाखोंचे बक्षीस असलेले नक्षलवाद्यांचा खात्मा
आज मंगळवारी पोलिसांना या भागात शोधमोहीम राबवली असता या घटनास्थळी पोलिसांना दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले. यामध्ये नक्षलवादी नेता डीव्हीसीएम सजंती उर्फ क्रांती, यावर मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये 29 लाख रुपयांचे बक्षीस असून तो मागील अनेक घटनांमध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग असल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच दूसरा नक्षलवादी रघू उर्फ शेर सिंग एसीएम, यावर 14 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर होते. या दोन्ही मृत नक्षलवाद्यांकडून एक एके- 47, एक बारा बोअर रायफल आणि दैनंदिन गरजेच्या वस्तू जप्त करण्यात आल्याची माहिती बालाघाटचे जिल्हा पोलीस अधीक्षक समीर सौरभ यांनी दिलीय. या चकमकीत आणखी नक्षलवादी मारले गेल्याचेही त्यांनी सांगितले. या जंगलात अजूनही शोध मोहीम सुरूच असून आणखी काही नक्षलवादी या परिसर असल्याची शक्यता सुरक्षा दलाच्या जवानांनी वर्तवली आहे.
24 तासातली सलग दुसरी मोठी कारवाई
अशीच एक कारवाई आज गडचिरोलीच्या कोरचोली येथे करण्यात आलीय. पोलीस आणि नक्षल्यांमध्ये झालेल्या चकमकीत (Naxal Attack) आतापर्यंत आठ नक्षलवादी ठार (Naxal Attack) झाले आहेत. चकमक स्थळावरून आठ नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. डीआरजी, सीआरपीएफ कोब्रा आणि बस्तर बटालियनच्या जवानांमध्ये ही चकमक झाली आहे. मंगळवारी सकाळी 6 वाजल्यापासून नक्षलवाद्यांसोबत जवानांची चकमक सुरू आहे. चकमकीत अनेक स्वयंचलित शस्त्रे जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. कोरचोली चकमकीत आतापर्यंत आठ नक्षलवादी ठार झाले तर, दुसरीकडे बिजापूर पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली असून या चकमकीत चार नक्षलवादी ठार झाल्याची बातमी आहे.
इतर महत्वाच्या बातम्या