एक्स्प्लोर

Naxal Attack : पोलीस आणि सुरक्षा दलाची मोठी कारवाई, 12 नक्षलवादी ठार; मोठ्या संख्येनं स्वयंचलित शस्त्रास्त्र जप्त

Gadchiroli Naxal Attack : कोरचोली चकमकीत आतापर्यंत आठ नक्षलवादी ठार, तर बिजापूर येथील चकमकीत चार नक्षलवादी ठार झाले आहेत.

Gadchiroli Naxal Attack : गडचिरोली कोरचोली चकमकीत (Naxal Attack) आतापर्यंत आठ नक्षलवादी ठार (Naxal Attack) झाल्याची मोठी माहिती समोर येत आहे. चकमक स्थळावरून आठ नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. डीआरजी, सीआरपीएफ कोब्रा आणि बस्तर बटालियनच्या जवानांमध्ये अजूनही चकमक सुरू आहे. मंगळवारी सकाळी 6 वाजल्यापासून नक्षलवाद्यांसोबत जवानांची चकमक सुरू आहे. चकमकीत अनेक स्वयंचलित शस्त्रे जप्त करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस आणि नक्षलवाद्यांच्या चकमकीत 12 नक्षलवादी ठार

कोरचोली चकमकीत आतापर्यंत आठ नक्षलवादी ठार झाले तर, दुसरीकडे बिजापूर पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली आहे. चकमकीत चार नक्षलवादी ठार झाल्याची बातमी आहे. मोठ्या प्रमाणात नक्षलवादी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. गांगलूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोरचोली आणि लेंद्राच्या जंगलात चकमक सुरू आहे.ठार झालेल्या नक्षलवाद्यांसोबत घटनास्थळावरून INSAS, LMG, AK47 सारखी स्वयंचलित शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. पोलीस दल अजूनही जंगलात असून परिसरात शोध सुरू आहे.  मात्र पोलिसांकडून अधिकृत पुष्टी नाही.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्षलविरोधी अभियान तीव्र

गडचिरोली पोलिसांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्षल विरोधी अभियान तीव्र करण्यात आलं आहे. शुक्रवारी रात्री उशिरा मिळालेल्या विश्वासार्ह सुत्रांच्या माहितीनुसार, कसनसूर चातगाव दलम आणि छत्तीसगडच्या औंधी दलमचे काही सशस्त्र कॅडर मोहल्ला मानपूर जिल्ह्यातील चुटीनटोला गावाजवळ (एसपीएस पेंढरीपासून 12 किमी पूर्वेला) MH CG बॉर्डरवर तळ ठोकून असल्याची माहिती मिळाली होती. आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विध्वंसक कारवाया करण्यासाठी त्यांची रणनीती असल्याचं समोर आलं. यानंतर पोलीस आणि जवानांनी नक्षलविरोधी सर्च ऑपरेशन सुरु केलं.

अतिरिक्त पोलीस अधीक्षक ऑपरेशन्स यतीश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सी60 युनिट्सच्या नक्षलविरोधी ऑपरेशन सुरू करण्यात आलं. शनिवारी ते 450 मीटर उंच टेकडीवर पोहोचले जिथून नक्षलवादी नुकतेच निघाले होते. डोंगरमाथ्यावरील शोधाच्या ठिकाणी एक मोठं आश्रयस्थान आणि नक्षल छावणी सापडली, ही नक्षलवादी छावणी नष्ट करण्यात आली आणि सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं. मात्र, जंगल आणि उंच टेकड्यांचा फायदा घेत नक्षलवादी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांकडून या भागात शोधकार्य सुरु आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Gadchiroli Naxal : निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नक्षली कारवायांना ऊत; गडचिरोली-छत्तीसगड सीमेवर पोलिसांनी केला नक्षल कॅम्प उद्ध्वस्त

महत्त्वाच्या बातम्या

Gadchiroli Crime News: संतापजनक... रंगकाम करणाऱ्या नराधमाचा 7 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; वैद्यकीय तपासणीनंतर उघड, आरोपीला बेड्या
संतापजनक... रंगकाम करणाऱ्या नराधमाचा 7 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; वैद्यकीय तपासणीनंतर उघड, आरोपीला बेड्या
Vidhan Parishad Election 2026: विजय वडेट्टीवारांच्या बालेकिल्ल्याला सुरंग; चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली विधान परिषदेत अरुण लखानींचा बिनविरोध विजय; भाजपचा मास्टर प्लॅन यशस्वी, वाचा इनसाईड स्टोरी
विजय वडेट्टीवारांच्या बालेकिल्ल्याला सुरंग; चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली विधान परिषदेत अरुण लखानींचा बिनविरोध विजय; भाजपचा मास्टर प्लॅन यशस्वी, वाचा इनसाईड स्टोरी
गडचिरोलीतील मायनिंग प्रकल्पाला आमचा विरोध, वन्यजीव संरक्षण नियम मोडून जंगल कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घातली जातायेत, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल 
गडचिरोलीतील मायनिंग प्रकल्पाला आमचा विरोध, वन्यजीव संरक्षण नियम मोडून जंगल कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घातली जातायेत, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल 
Arun Lakhani and Supriya Sule: भाजपकडून उमेदवारी मिळालेले सुप्रिया सुळेंचे व्याही अरुण लखाणींचा राजकारणाबाबत अमूल्य सल्ला, म्हणाले...
भाजपकडून उमेदवारी मिळालेले सुप्रिया सुळेंचे व्याही अरुण लखाणींचा राजकारणाबाबत अमूल्य सल्ला, म्हणाले...

व्हिडीओ

Sanbhajinagar District Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीत घराणेशाहीची एन्ट्री? नेत्यांच्या नातलगांचीच चर्चा | ABP Majha
Sai Baba Temple Prasad Adulterated Pedha FDA Raid : साईंच्या भक्तांशीभेसळीचा खेळ | Special Report
Girish Mahajan On Operation Blue Star : महाजनांच्या अमृतसरमधील विधानावरून वाद | Special Report
INDIA Alliance Meeting : पंतप्रधानपदाचा चेहरा जाहीर करा; ठाकरेंची मागणी | Special Report
Nashik Vidhan Parishad Politics : एकाचं फत्ते काम, दुसऱ्याने फोडला घाम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold vs US Dollar : आपण सोनं खरेदी करतो तेव्हा अमेरिकन डॉलर कमकुवत होतो का? समजून घ्या यामागचं चक्रव्यूह!
आपण सोनं खरेदी करतो तेव्हा अमेरिकन डॉलर कमकुवत होतो का? समजून घ्या यामागचं चक्रव्यूह!
अपयशाचं बिल गरिबांच्या माथी मारणे हेच मोदींच्या लुटीचे मॉडेल, LPG सिलेंडरच्या दरावरु राहल गांधींचा हल्लाबोल
अपयशाचं बिल गरिबांच्या माथी मारणे हेच मोदींच्या लुटीचे मॉडेल, LPG सिलेंडरच्या दरावरु राहल गांधींचा हल्लाबोल
Share Market : बाजारात व्ही-शेप रिकव्हरी! ओला इलेक्ट्रिकसह 'हे' 3 शेअर्स ब्रेकआउटमुळे चर्चेत
बाजारात व्ही-शेप रिकव्हरी! ओला इलेक्ट्रिकसह 'हे' 3 शेअर्स ब्रेकआउटमुळे चर्चेत
धोंड्याच्या महिन्यात जावयासह लेकीचाही मान; पुण्यात सुनेलाही धोंडे दान, चक्क चांदीच्या चप्पल भेट
धोंड्याच्या महिन्यात जावयासह लेकीचाही मान; पुण्यात सुनेलाही धोंडे दान, चक्क चांदीच्या चप्पल भेट
आता, माझ्याकडून वाद मिटलाय, विषय संपलाय; सोसायटीमधील पांढऱ्या पट्टीवर अखेर रंगकाम, प्रसाद वेदपाठकची पोस्ट
आता, माझ्याकडून वाद मिटलाय, विषय संपलाय; सोसायटीमधील पांढऱ्या पट्टीवर अखेर रंगकाम, प्रसाद वेदपाठकची पोस्ट
वीज कोसळून बैल मेला, माय जुंपली नांगराला; शेतकरी दाम्पत्याचा पोटात कालवणारा व्हिडिओ व्हायरल, सर्वत्र हळहळ
वीज कोसळून बैल मेला, माय जुंपली नांगराला; शेतकरी दाम्पत्याचा पोटात कालवणारा व्हिडिओ व्हायरल, सर्वत्र हळहळ
IND A vs SL A Highlights : टीम इंडियाने श्रीलंकेच्या हातातील विजय हिसकावला; शेवटच्या 4 षटकांमध्ये सामना फिरवला 
टीम इंडियाने श्रीलंकेच्या हातातील विजय हिसकावला; शेवटच्या 4 षटकांमध्ये सामना फिरवला 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जून 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जून 2026 | मंगळवार
Embed widget