लातूर आणि नागपूरमध्ये प्रेमीयुगुलांच्या आत्महत्यांच्या घटनांनी खळबळ, काय होती कारणं?
Maharashtra Crime News: लातूर आणि नागपूरमध्ये दोन प्रेमयुगुलांनी आत्महत्या केल्याच्या घटना उघडकीस आल्यानं एकच खळबळ उडाली आहे.
Maharashtra Crime News: लातूर आणि नागपूरमध्ये दोन प्रेमयुगुलांनी आत्महत्या केल्याच्या घटना उघडकीस आल्यानं खळबळ उडाली आहे. लातूर येथील प्रेमीयुगुलांनी अहमदपूर तालुक्यातील गुगदळ या गावच्या शिवारातील विहीरीत उडी मारुन आत्महत्या केली. तर, नागपूर येथील प्रेमीयुगुलांनी रेल्वेसमोर उडी घेत आपली जीवनयात्रा संपवली आहे. या दोन घटनांनी दोन्ही जिल्हे हादरुन गेले आहेत. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.
लातूर येथील प्रेमीयुगुलांची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
लातूर शहरात वास्तव्यास असलेले वीस वर्षाच्या आतील तरुण-तरुणीनं ( love birds suicides in Latur )अहमदपूर तालुक्यातील गुगदळ या गावच्या शिवारातील विहीरीत उडी मारुन आत्महत्या केली आहे. पाच मार्चपासून हे दोघे घरून बेपत्ता होते. आत्महत्येचे नेमके कारण काय होतं हे अद्याप समोर आलं नाही. याप्रकरणी अहमदपूर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासाला पोलिसांनी सुरुवात केलीय. शवविच्छेदनानंतर दोघाचं मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.
नागपूर रेल्वेसमोर उडी घेत प्रेमीयुगुलांची आत्महत्या
नागपूर जिल्ह्यातील (Love birds suicides in Nagpur) कामठी तालुक्यातील धक्कादायक घटना घडलीय. घरातून पळून गेलेल्या प्रेमीयुगुलांनी रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केलीय. 18 वर्षीय मुलगा आणि 16 वर्षीय मुलगी हे दोघेही एकमेकांवर प्रेम करत होते. दोघे कामठी शहरात जय भीम चौक परिसरात राहत होते. आपल्या मैत्रीला घरच्यांचा विरोध आहे, हे लक्षात आल्यावर 8 तारखेला दोघांनीही कामठी शहरातील जय भीम चौक येथील राहत्या घरातून पळ काढला होता.
तेव्हापासून दोघांचे कुटुंबीय त्यांचा शोध घेत होते. पोलिसांकडे दोघही बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली होती. काल रात्री दोघांनी अहमदाबाद एक्सप्रेस ट्रेन समोर उडी घेत आत्महत्या केली. रात्री मुलाची बाईक रेल्वे रुळाच्या बाजूला सापडल्यामुळे दोघांनी आत्महत्या केली असावी असा संशय बळावला होता. आज पहाटे रेल्वे रुळावर दोघांचे मृतदेह आढळून आले.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
इतर बातम्या